कोरोनाशी दोन हात करणारे योद्धे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
madhuri bolkar _1 &n

कोविड महामारीच्या काळात जे समाजसेवक प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले होते, त्यांना कोरोना संसर्गापेक्षा आपल्यास कोरोना झाल्यास मदतकार्य थांबण्याची देखील चिंता सतावत होती. अशाच एक ‘कोरोना योद्ध्या’ म्हणजे माधुरी गणेश बोलकर. त्यांना व त्यांच्या पतीला कोरोना संसर्ग होऊन देखील त्यांनी आपल्याद्वारे करण्यात येत असलेल्या मदतकार्यात कोणत्याही स्वरूपाचे विघ्न येणार नाही, याची विशेष काळजी घेतली. त्यांच्या मदतकार्याचा हा परिचय...


माधुरी गणेश बोलकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका तथा शहर चिटणीस
भाजप प्रभाग क्र. : १० (अ)
संपर्क क्र. : ९०११४४१००९

 


कोरोना काळात जाहीर करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ हे सर्वांसाठीच तसे त्रासदायक ठरले. मात्र, ‘लॉकडाऊन’ शिवाय अन्य कोणताही पर्याय हा कोरोना थोपविणे कामी नव्हता हे तितकेच खरे. कोरोना काळात मदतकार्य करणार्‍या नागरिकांना या काळात सर्वाधिक धोका हा कोरोनापासूनच होता. स्वतःला संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे हे एका आव्हानच या काळात सर्वांसमोर होते. जगाच्या पटलावर कोरोनाचा उपद्रव झाल्यावर आणि भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. त्याच वेळी म्हणजेच दि. २१ मार्च २०२० पासून त्यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या आरोग्य रक्षणार्थ ‘हायड्रोक्लोरोफाईड’ या औषधाची फवारणी करण्यास सुरुवात केली. कोरोनाचे असणारे विदारक स्वरूप बोलकर यांनी जाणल्याने त्यांनी सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती.
 
 

 

सामाजिक स्थिती बदलली गेल्याने अनेकांना आरोग्य रक्षणाच्या उपायाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचीही निकड या काळात भासू लागली. हीच गरज ओळखून बोलकर यांनी सुमारे ८०० पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले. त्यात त्यांनी तेल, गहू, पीठ, साखर, मसाल्याचे पदार्थ आदींचे वाटप केले. सुमारे दहा हजारपेक्षा जास्त कुटुंबांना त्यांनी ‘आर्सेनिक’ गोळ्यांचे वाटप करत, त्या कुटुंबांना आरोग्यकवच उपलब्ध करून दिले. तसेच, गरजू महिलांना साड्या व विविध वस्त्रांचे वाटप करत त्यांनी वस्त्रदानासही या काळात महत्त्व दिले. दिवसागणिक विविध सामाजिक समस्या या काळात पुढे येत होत्या. त्यातच रोजगार जाणे, आर्थिक उपलब्धता नसणे, घरातील सामान संपणे, नवीन किराणा मालासाठी हाती पैसे नसणे, रस्त्यावरून जाताना सर्वकाही बंद असल्याने अन्नाची उपलब्धता न होणे आदी समस्या बोलकर यांना जाणवू लागल्या. त्यामुळे बोलकर यांनी दि. 1१८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ‘अटल भोजन’ या नावाने अन्नछत्राची उभारणी केली. या माध्यमातून त्यांनी दररोज साधारणत: १,५०० नागरिकांना अन्नदान केले. याचा लाभ जवळपास ३० हजार नागरिकांना झाला. बोलकर यांनी आपल्या प्रभागातील अशोकनगर, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला, सातपूर कॉलनी आदी भागांत मदतकार्य केले. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेकामी ‘रॅपिड टेस्ट’ करण्यासदेखील उत्तेजन दिले. दररोज साधारण १४० ‘रॅपिड टेस्ट’ त्यांनी या काळात केल्या. त्यात साधारण २० टक्के नागरिक हे कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून येत असत. त्या सर्वांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य बोलकर यांनी केले.

 
 
madhuri bolkar _1 &n

अशा प्रकारची महामारी ही भविष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा समाजातील सक्षम नागरिकांनी गरजू नागरिकांना कायम मदत करणे आवश्यक आहे. मानव धर्म जोपासून मानवाने मानवाची अविरत सेवा कारवी. त्यामुळे आपण कोणत्याही संकटाचा मुकाबला अगदी सहजपणे करू शकतो

 
 
हे सर्व कार्य करत असताना बोलकर दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. मात्र, तरीही या दाम्पत्याच्या मनी त्याही काळात नागरिकांचा विचार घोळत होता. सुश्रुषा पूर्ण झाल्यावर व योग्य ते उपचार घेतल्यावर त्या पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. याकामी त्यांना काका शिंदे, शेषराव सोनवणे, हंसराज पवार, तेजस्विनी जगताप, भूषण पाटील, भाग्यश्री शिंदे, राधिका विसपुते, स्वतःची ‘सप्तशृंगी बहु-उद्देशीय संस्था’ आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक संस्थांचा सहभाग न घेता बोलकर यांनी स्वतः या मदतकार्याचे शिवधनुष्य पेलेले, हे विशेष. बोलकर यांच्या मदतीचा अश्वमेध केवळ प्रभागातील नागरिकांच्या प्रति न थांबता, त्यात परराज्यातील नागरिकांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यांची मदत केली. याकामी त्यांचा जवळपास १३ ते १४ लाख रुपयांच्या पुढे निधी खर्ची आला.
 

बोलकर यांचे मदतकार्य हे जवळपास प्रत्येक बाबतीत होत असल्याने त्यांच्याकडे गरजवंतांची संख्या अधिक होती. त्यामुळे मदत प्राप्त करण्याकामी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा न उडू देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. तसेच, सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंकाही बोलकर यांना होती. मात्र, लोकांचा उदंड प्रतिसाद त्यांना लाभला. पैशाची कमतरता जाणविण्याचीही भीती होतीच. या सर्वावर बोलकर यांनी कार्यकर्ते, मित्र परिवार यांच्या साथीने मात केली.

 
 

मदतकार्याचा हेतू हा शुद्ध असल्याने आणि मनापासून बोलकर या कार्यात कार्यरत असल्याने त्यांना सरकारी पातळीवर मोलाचे सहकार्य लाभले. पोलीसदलालाही जेवण उपलब्ध करून देण्याचे कार्य या काळात बोलकर यांनी पार पाडले. माधुरी बोलकर यांच्या सासू मीराबाई बोलकर, पती गणेश बोलकर यांचा अविरत असणारा पाठिंबा त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. तसेच, समर्थ व स्वामिनी या त्यांच्या दोन लहान मुलांनीदेखील आईच्या या कार्यात खारीचा का होईना, वाटा उचलला होता. माधुरी बोलकर यांचे पती गणेश यांनी, त्यांना आपण समाजाचे देणे लागत असून मदतकार्यात कोठेही मागे हटायचे नाही, असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना साथ दिली. तसेच, भाजप पक्षपातळीवर शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेशाचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री जयकुमार रावल यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन बोलकर यांना लाभले.

 

 
आगामी काळातही बोलकर गरजू नागरिकांना मदत करण्याचा मानस व्यक्त करतात. तसेच त्यांच्या प्रभागात यापुढील काळातदेखील अविरत सॅनिटायझरची फवारणी त्या सुरू ठेवणार आहेत, तसेच बोलकर यांचे संपर्क कार्यालयदेखील यापुढील काळात नागरिकांच्या सेवार्थ अविरत आपले कार्य करणार आहेकोरोना महामारीचे रौद्ररूप हे सर्वांनाच त्रासदायक असे आहे. चांगल्या घरातील वरिष्ठ नागरिक, लहान मुले हे अन्न मागण्यासाठी येत असल्याचे पाहून बोलकर यांचे मन हेलावले होते. समृद्ध घरांवरही कोरोनाची वाईट छाया पसरत असल्याचे पाहून बोलकर या याकाळात कमालीच्या भावूक झाल्या होत्या. अनेक गरजू नागरिकांनी, बोलकर यांच्यामार्फत वेळेत मदत प्राप्त झाल्याने बोलकर यांचे धन्यवाद मानले. वेळेला मदत करणे आणि स्वतः कोरोनाबाधित असतानाही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत कार्यरत राहणे, यामुळे माधुरी बोलकर यांनी खर्‍या अर्थाने सेवकाचे कर्तव्य पार पाडले, असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच त्यांच्या प्रभागातील नागरिक आजही त्यांच्या कार्याचे स्मरण करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@