भरतभाईंची मदतभरारी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Bharat Rajput_1 &nbs
 
 
 
मुंबई आणि आसपासच्या शहरांबरोबरच पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. डहाणूचा शहरी-ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. रोजंदारीवर काम करणार्‍यांपासून ते विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत हे या काळात गरजूंच्या मदतीसाठी धावून गेले. तेव्हा, भरतभाईंच्या या मदतभरारीचा घेतलेला हा आढावा...

भरत राजपूत
राजकीय पक्ष : भाजप
पद : विभागीय उपाध्यक्ष, ठाणे व पालघर जिल्हा
लोकप्रतिनिधी पद : नगराध्यक्ष, डहाणू नगर परिषद (प्रभाग क्र. ४)
संपर्क क्र.: ९८९०९ १५३५१

 
 
कोरोनामुळे मार्च महिन्यात पहिला ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला आणि देशभरात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. शहरांबरोबरच गावखेड्यांमधील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते. लोकांना काय करावे, काय करु नये, याविषयी काहीच कल्पना नव्हती. त्यातच वैद्यकीय सुविधा, औषधोपचारांसाठी जवळच्या शहरांवर अवलंबून असलेल्या रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या चिंतेत तर यामुळे आणखीनच भर पडली. डहाणूमध्ये तर शेजारच्या गुजरात राज्यात कामानिमित्त गेलेले हजारो खलाशी, मजूर अडकून पडले होते. त्यांचे परतीचे मार्ग एकाएकी बंद झाले. अशा परिस्थितीत नेमकी मदत मागायची तरी कुठे, यामुळे हे लोक आणि इथे डहाणूमध्ये त्यांचे कुटुंबीय अक्षरश: चिंतातुर होते. पण, डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या भरतभाईंनी यासाठी कुठलाही विलंब न करता, त्वरित पुढाकार घेतला आणि मजूर, खलाशांना सुखरुप डहाणूमध्ये परत आणले.
डहाणू तालुक्यात बोटीने पोरबंदर, कच्छ, जामनगर येथे गेलेले खलाशी आणि मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले होते. रेल्वेसेवाही बंद होती. रस्त्यांवरील वाहतुकीवरही निर्बंध होते. अशा वेळी भरतभाईंनी पुढाकार घेऊन तब्बल साडे तेरा हजार खलाशी, मजुरांना डहाणूमध्ये परत आणण्याचे शिवधनुष्य हाती घेतले. खरंतर एवढ्या मोठ्या संख्येने या सर्वांना डहाणूमध्ये परत आणणे हे खूप मोठे आव्हानच होते. परंतु, भरतभाईंनी आपल्या लोकांना या संकटसमयी अजिबात वाऱ्यावर सोडले नाही. त्यांच्यासाठी वाटेल ती मदत करायची, हाच निर्धार भरतभाईंनी केला आणि या सर्वांना बोटीतून डहाणूमध्ये टप्प्याटप्प्याने परत आणले. या सगळ्यांना फक्त डहाणूमध्ये बोटीने सोडून भरतभाई थांबले नाहीत, तर या सगळ्यांचे बंदरात उतरल्यावर संपूर्ण सॅनिटायझेशन करण्याबरोबरच त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. तसेच या सर्व गरजूंना त्यांच्या घरी खासगी वाहनांची व्यवस्था करुन पोहोचविण्याचे कामही भरतभाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. भरतभाईंनी या कामात जातीने लक्ष घातले आणि कोणाचीही कोणतीही गैरसोय होणार नाही, याकडे आवर्जून लक्ष दिले. परिणामी, या खलाशी, मजुरांनी भरतभाईंचे मन:पूर्वक आभार मानले.
 
 
Bharat Rajput_1 &nbs
 
 

 "मी कुठलंही कार्य पदासाठी, माझ्या कौतुकासाठी करत नाही. नगराध्यक्ष, नगरसेवक नसतानाही मी समाजकार्यात पुढाकार घेत होतो. माझे वडीलही नगरसेवक होते. त्यामुळे मला लहानपणापासून समाजसेवेचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. तेच माझ्या समाजकार्यामागील प्रेरणास्रोत आहेत."

 
 
 
कोरोनाच्या काळात मजुरांबरोबरच विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या आरोग्याचाही बिकट प्रश्न निर्माण झाला. सामान्य रुग्णालये, दवाखानेही कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे हाल झाले. त्यातही ज्यांना डहाणूबाहेर उपचारांसाठी प्रवास करावा लागत होता, त्यांची मोठी गैरसोय झाली. भरतभाईंच्या ही बाब लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अशा सर्व रुग्णांसाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांची तातडीने सोय करुन दिली. परिणामी, गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना डहाणूबाहेर जाणे आणि परत घरी वाहनाने येणे शक्य झाले. यामध्ये कर्करोगाचे रुग्ण, लकव्याने ग्रस्त असलेले रुग्ण, डायलिसिस रुग्ण यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच गरोदर स्त्रिया आणि अपंग व्यक्तींनाही भरतभाईंनी उपलब्ध करुन दिलेल्या या सुविधेचा मोठा लाभ झाला. रात्री-अपरात्री आणि अगदी लागेल तेव्हा आणि लागेल तितक्या वेळा, या सर्वांना भरतभाईंनी वाहनाची सोय, औषधं उपलब्ध करुन दिली. असाच एक अनुभव म्हणजे, एका कर्करोगग्रस्त महिलेची तब्येत अत्यंत खराब होती. सरकारी दवाखान्यांतही मुंबईत उपचारांसाठी जाणं शक्य नव्हतं. तेव्हा, भरतभाईंनी स्वत:च्या खासगी वाहनाने त्या महिलेला मुंबईतील कर्करोग रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली. त्यासाठी पास बनवून घेतला. तसेच १५-२० वेळा त्यांना रुग्णवाहिका, खासगी वाहनाने केमोथेरपीसाठी मुंबईतील रुग्णालयात पोहोचवून त्या महिलेला जीवनदान दिले. या महिलेप्रमाणेच अशा अनेक रुग्णांच्या मदतीला भरतभाई अगदी भावासारखे धावून गेले.
अशाच प्रकारे गरजूंच्या मदतीत कुठलीही कुसूर राहणार नाही, याची सर्वोपरी दक्षता भरतभाईंनी घेतली. आपल्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी तळागाळात मदतकार्य हाती घेतले. इमारतींपासून ते पाड्यांपर्यंत स्वच्छता आणि सॅनिटायझेशनवर भर दिला. जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, म्हणून भरतभाईंनी कटाक्षाने लक्ष दिले. कोरोनाच्या या काळात खासकरुन गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचेही प्रचंड हाल झाले. ही बाब ओळखून काही दिवस नव्हे, तर चक्क तीन महिने भरतभाईंनी कार्यकर्त्यांमार्फत दारोदारी मोफत जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप केले. या दरम्यान स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या १००-१५० पोलिसांचीही नाश्त्यापासून जेवणापर्यंतची सोय भरतभाईंनी केली. डहाणू पोलीस ठाण्यात रेनकोट वाटपही केले. फक्त डहाणू शहरातच नव्हे, तर शहराबाहेरही भरतभाईंच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज जनसेवेसाठी तैनात होती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले आणि समाजकार्यासाठी सदैव सज्ज राहण्यास सांगितले. कोविड दरम्यानच्या या मदतकार्यात सरकारी यंत्रणेचेही संपूर्ण सहकार्य लाभल्याचे भरतभाई सांगतात. तसेच त्यांच्या या मदतकार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेल्या कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवाराचेही आभार मानायला ते विसरत नाहीत.
खरंतर भरतभाई हे नगरसेवक, नगराध्यक्ष होण्यापूर्वीपासूनच तसे समाजसेवेत अग्रेसर होते. त्यांचा मुळी पिंडच समाजसेवेचा. त्यात भारतीय जनता पक्षासारख्या समाजाशी नाळ जोडलेल्या पक्षात त्यांनी आपल्या समाजकार्याने एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आगामी काळातही जनतेसाठी याच ध्येयाने आणि जिद्दीने काम करत राहण्याची इच्छा ते बोलून दाखवतात. त्यांच्या या कार्याला सलाम आणि त्यांचे हे समाजकार्य असेच बहरत जावो, ही सदिच्छा.
@@AUTHORINFO_V1@@