वंचितांचा आधारवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Ashok Vade_1  H
 
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नातीगोती, आप्तस्वकीय किंबहुना मित्रपरिवारांमध्येही वितुष्टयेण्याचे अनेक प्रसंग घडले. अशा सुन्न वातावरणात सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचा धडाही कोरोना महामारीने साऱ्यांना शिकवला. या ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार, गरजू व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे बोईसर येथील भाजप उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे संपूर्ण बोईसरवासीयांसाठी वंचितांचा आधारवड ठरले आहेत.


अशोक वडे
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजप उपाध्यक्ष, पालघर
लोकप्रतिनिधी पद : कृषी सभापती, पालघर जि. प
संपर्क क्र. : ९६७३२ २०९९९

 
 
स्थानिकांसह परप्रांतीय स्थलांतरित मजुरांसाठी सदैव मदतीचा हात देणारे भाजप नेते भाजप उपाध्यक्ष अशोक वडे यांनी, पंचायत समिती सदस्या सलोनी वडे हिला सोबत घेत माणुसकीच्या नात्याने अनेक गरजूंना अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, होमियोपॅथिक औषधांचे वितरण केले. सर्वांचे आधारवड बनलेल्या या बाप-लेकीच्या कर्तृत्वाचा हा छोटासा प्रयत्न...
 
देशात व राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर भीतीच्या सावटाखाली मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ची सुरुवात झाली. प्रसारमाध्यमातून धडकणाऱ्या बातम्यांनी तर कोरोनाची दहशत आणखीन पसरू लागली होती. त्यामुळे कोरोनाच्या धास्तीने सर्वचजण घाबरून गेल्याने भीतीमुळे कुणीही घराबाहेर पडत नव्हता. तेव्हा आपला तालुका हाच आपला परिवार मानून अशोक वडे यांनी स्वतःचा वैयक्तिक विचार न करता, जबाबदारीचे भान राखत स्वतःला हरतर्‍हेच्या मदतकार्यात झोकून दिले. मदतीसाठी प्रत्येकाच्या हाकेला ’ओ’ दिली. एखादी अडचण किंवा मदतीसाठी फोन आला की, क्षणाचाही विलंब न करता, दिवस-रात्र न पाहता, कोणी सोबत येण्याची वाट न पाहता, वेळप्रसंगी स्वत:ची गाडी काढून, तळमळीने मदतीसाठी अशोक वडे व कुटुंबीय धावून गेले. वडे यांचा लोकसंपर्क दांडगा असल्याने प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, शिपाई-सफाईगार असो की, सामान्य नागरिक, ज्येष्ठ असो की तरुण वर्ग, महिला असो की आदिवासी आश्रम शाळेतील बालक-बालिका अगदी भाजी विक्रेते आणि व्यापारी वर्गालाही त्यांनी आपल्या उत्साही स्वभावाने या कठीण काळात मदतीचा हात दिला.
 
कोविड काळात बोईसर परिसरातील वंजारवाडा भागात घरोघरी अशा २०० कुटुंबांना प्रत्येकी एक लीटर सॅनिटायझर वाटप केले. दि. २२ मार्च ते १३ जूनपर्यंत हे सॅनिटायझर वाटप सुरू होते. अनेकजण घरी येऊनदेखील सॅनिटायझर घेऊन जात होते. याचदरम्यान स्वखर्चातून दोन मॅन्युअल व एक विद्युत फवारणी पंप आणि जंतुनाशके श्रीरामनगर, रजत पार्क, साईनाथ नगर, वंजारवाडा, इंद्रप्रस्थ, होळीपाडा, सुतारपाडा नेमिनाथ, अवधनगर, काटकरपाडा, कादरी बाग, लक्ष्मण कॉम्प्लेक्स, बोईसर भाजी मार्केट आणि शंभु भाजी मार्ट आदी परिसरातील गृहसंकुले व सोसायट्यांना पुरवले. बजाज प्रा.लि.च्या सहकार्याने एक हजार लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू केले. या उपक्रमासाठी लागणारे स्वयंसेवक तसेच, धान्य-भाजीपाला आदी लागेल ते सहकार्य करून भोजन पोहोचवण्याचेही काम केले. पाटीलपाडा शिगाव येथे १५० कुटुंबीयांना, तर कॅम्लीन नाका, ७० बंगला, कोलवडे नाका व इतर ठिकाणी वसलेल्या मजुरांना आणि डी. सी. टेक्सटाईल्समधील १५ कामगारांना पाच किलो तांदूळ, डाळ, तेल, साखर, चहा पावडर, साबण, बिस्कीट- वेफर्स आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
 
 
Ashok Vade_1  H
 
 
 

"मी गेली ३५ वर्षे समाजकारणाशी जोडले गेलो असल्याने जनताजनार्दनाचा कायम आशीर्वाद लाभला आहे. ग्राममपंचायत सभासद ते पंचायत समिती सदस्य व पालघर जिल्हा परिषदेत कृषी समितीचे सभापती म्हणून यशस्वी कारकिर्द राबवत आहे. मुलगी सलोनी वडे हीदेखील पंचायत समिती सदस्य आहे. माझ्या भागातील बोईसर ग्रामपंचायतीचा सरपंचसुद्धा भारतीय जनता पक्षाचाच आहे."

 
 
बोईसरमधील काही गाव ‘कंटेनमेंट झोन’ घोषित झाल्यानंतर तेथील रहिवाशांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू व जिन्नससह पिण्याच्या पाण्याचीही मोफत व्यवस्था केली. तसेच, कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेत सर्व परिसरात वारंवार जंतुनाशकांची फवारणी करून घेतली. ‘कोविड-१९’ मदतनिधी म्हणून पीएम फंडसाठी नागरिकांच्या सहकार्यातून १ लाख, २५ हजारांचा निधी सुपूर्द करण्यात आला. ३ एप्रिल रोजी मध्य प्रदेशच्या खासदारांनी मदतीसाठी संपर्क साधला असता तत्काळ वडे यांनी मध्य प्रदेशच्या १५ मजुरांना मोफत धान्यवाटप केले. बोईसर येथील परराज्यातील तब्बल पाच हजार मजूर व कामगारांना आपल्या राज्यात परतण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणी मोफत करून ई-पास देण्याचे मोलाचे काम अशोक वडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. ऐन वेळेस गावी निघालेल्या एक हजार कामगारांनाही त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी मदत केल्याचे वडे यांनी सांगितले.
 
मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे आजार अथवा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, म्हणूनच सामान्य नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक प्रतिकारशक्तीवर्धक किटचे तसेच ’आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे विनामूल्य वितरण वडे यांनी केले. त्याचप्रमाणे, आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरे आयोजित करून कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या बरोबरीने कोविडशी सामना केला. या शिबिरातून गोळा झालेले रक्त गरजूंना मिळावे, यासाठी महाराष्ट्र ब्लड बँकेत जमा केल्याचे अशोक वडे यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसेवक अशोक वडे आणि सलोनी वडे यांनी बोईसरमध्ये भव्य सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना अनेक भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांचीदेखील विशेष उपस्थिती होती. सेवा सप्ताहात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर तसेच कोरोना रुग्णांना फळे व बिस्किटे यांचे वाटप केले. अनाथाश्रमात तसेच, वृद्धाश्रमातील वृद्ध व लहानग्यांना कपडे, फळे व बिस्किटे, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. घरकाम करणाऱ्या घरेलू महिला कामगारांना ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन’ व पथविक्रेत्यांसाठी ‘आत्मनिर्भर पथविक्रेता योजनें’तर्गत लाभ मिळवून देण्यासाठीही अशोक वडे यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर, गरजूंना मदतीसोबतच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रमदेखील भाजपच्या माध्यमातून अशोक वडे यांनी राबविले.
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@