कल्याण खाडीत तीन वर्षाच्या मुलासह तान्ह्या बाळाला सोडून महिला पसार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Kalyan_1  H x W
 



डोंबिवली : कचोरे खाडीमध्ये अडकलेल्या दोन चिमुरडय़ांचा जीव स्थानिक नागरिकांनी वाचविला आहे. यामध्ये एका सहा महिन्यांच्या तान्ह्या बाळाचाही समावेश आहे. हे दोघे खाडीमध्ये याठिकाणी नेमके कसे आले. याबाबत ठोस माहिती नसली तरी एक महिला या दोघांना खाडीतील बेटावर सोडून निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती कोणाकडे ही नाही. कल्याण-ठाकुर्ली रोडवर असणा:या कचोरे गावातील स्थानिक आज या घटनेने पूर्णपणो हादरले आहेत.
 
 
 
 
स्थानिकांना खाडीतील बेटावर दोन लहान मुले आज दिसली. त्यांना पाहून ग्रामस्थांना धक्का बसला. त्यातील एक जण साधरणपणो दोन ते तीन वर्षाचे तर दुसरा अक्षरक्ष सहा महिन्यांचे तान्हे बाळ होते. गंभीर बाब म्हणजे खाडीला भरती सुरू झाली होती. आणि हे दोन्ही चिमुकले असणारे ठिकाण आणि खाडीच्या पाण्यामध्ये अवघ्या काही इंचाचाच फरक राहिला होता. कचोरे गावातील स्थानिक रहिवासी गणोश मुकादम, अमित मुकादम आणि तेजस मुकादम यांनी क्षणाचा ही विलंब न लावता त्यांनी धाव घेत या दोघांना ही सुखरूपपणो खाडीच्या बाहेर काढले. या मुलांना याठिकाणी कोण सोडून गेले? का सोडून गेले? या प्रश्नाची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत. दरम्यान या घटनेची स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली असून या मुलांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.




@@AUTHORINFO_V1@@