
सीरम इंस्टीट्युटने ठरवली कोरोना लसीची किंमत
मुंबई: सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोविड -१९ लस कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज केला आहे. व असा अर्ज करणारी ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे.
पंतप्रधान मोदींनी भारतवासीयांसाठी खुशखबर देत, येत्या काही आठवड्यात कोरोनावरची लस भारतात उपलब्ध होईल असं म्हटलं होतं. आणि आता सीरम इन्स्टिट्युटने ह्या लसीची किंमतही ठरवली असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय बनावटीची असणाऱ्या कोविशिल्डची किंमत २५० रुपये असू शकते, असे म्हटले जात आहे.
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार झालेल्या ह्या लसीच्या एका डोसची किंमत १००० रुपये असली तरी भार्त्वासियांसाठी मात्र ही लस केवळ २५० रुपयात उपलब्ध होऊशकते अशी माहिती सीरम इन्स्टिट्युटच्या अदार पूनावाला यांनी दिली.