सेवायोगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |
article on covid yodha yogita nagargoje

nagargoje_1  H


‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, गरीब, कामगार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध पातळीवर मदतकार्य राबविले. त्यांच्या मदतकार्यामुळे कित्येकांचे ‘लॉकडाऊन’च्या काळातील आयुष्य अगदी सुसज्ज होण्यास मदत झाली. तेव्हा, योगिता नागरगोजे यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका
प्रभाग क्र. : ११, कृष्णानगर, पिंपरी-चिंचवड
संपर्क क्र. : ९५५२५२१२९३



मार्च महिन्याच्या २३ तारखेला ‘लॉकडाऊन’ झाले. यादरम्यान सर्वसामान्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी आपल्या प्रभागामध्ये सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये त्यांचे पती ज्ञानेश्वर नागरगोजे यांनीदेखील त्यांची उत्तम साथ दिली. संपूर्ण प्रभागामध्ये पूर्ण दक्षता घेऊन झोपडपट्टीवासीय, स्थलांतरित कुटुंब, विद्यार्थी या सर्वांना त्यांनी मदत केली.सर्व नियमांचे पालन करून प्रत्येकाला दोन वेळच्या जेवणाची सोय करुन दिली. समाजातील शोषित, दुर्बल घटक दोन वेळच्या जेवणापासून वंचित राहू नये, हा प्रामाणिक प्रयत्न नगरसेविका नागरगोजे यांनी केला. जिथे त्यांना दोन वेळचे जेवण पोहोचविणे शक्य नव्हते, तिथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरीब जनतेला धान्यवाटप केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात प्रभागातल्या तीन ठिकाणी सर्व नियमांचे पालन करून मुंढे यांनी भाजीमंडई सुरू केली. मंडईत येणार्‍या प्रत्येकाला हातावर सॅनिटायझर देऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याची विनंती केली जायची. कोरोना होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी याची जनजागृतीदेखील या काळामध्ये नगरसेविका योगिता नागरगोजे आणि टीमने केली.प्रभागातल्या प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप करून त्यांना या गोळ्यांच्या उपयुक्ततेविषयी त्यांनी माहिती दिली. या सर्व कामांमध्ये सर्व कार्यकर्ते समाजसेवा म्हणून आपली व आपल्या कुटुंबाची पूर्ण खबरदारी घेऊन काम करत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे पोलीस कर्मचार्‍यांना, सफाई कामगारांना तसेच अनेक गरजूंना दोन वेळा वाटप केले. प्रभागातल्या अनेक सोसायट्यांमध्ये आणि वसाहतीमध्ये जाऊन सॅनिटायझर व औषध फवारणी त्यांनी केली. एखाद्या सोसायटीमध्ये जर कोरोना रुग्ण आढळला, तर त्या ठिकाणी दोन-दोन वेळा सॅनिटायझर फवारणी करण्यात आली, जेणेकरून दुसर्‍या व्यक्तीला त्रास होऊ नये आणि तो विषाणू तेथेच रोखला जावा. तसेच त्यांच्या प्रभागामध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून विशेष प्रयत्नदेखील त्यांनी केले.


कोरोना रुग्ण सापडला तर त्याच्यासाठी रुग्णवाहिकेची सोयही त्यांनी करुन दिली. तसेच या काळामध्ये रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांंना सहजासहजी बेड्स उपलब्ध होत नव्हते. तेव्हा, संबंधित रुग्णाला बेड मिळवण्यासाठी धडपड करणे आणि त्याच्या उपचारांविषयी वेळोवेळी त्याच्या कुटुंबीयांना माहिती देणे, हे कर्तव्यही नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने निभावले. तसेच कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजीदेखील नगरसेविका योगिता नागरगोजे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते घेत होते.प्रभागातले सफाई कर्मचारी, तसेच सतत २४ तास ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणारे सर्व लोक हे समाजासाठी, सर्वसामान्यांसाठी, ‘लॉकडाऊन’च्या या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करत होते. अशा कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कामाला प्रोत्साहन देऊन त्यांचा सत्कारही नागरगोजे यांच्यातर्फे करण्यात आला.‘लॉकडाऊन’मुळे अनेक ठिकाणी रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवत होता. ही बाब लक्षात घेता, नगरसेविका नागरगोजे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित केले. ज्यांना रक्ताची आवश्यकता होती, अशा ठिकाणी त्वरित ते पुरवण्यात आले. प्रभागातल्या अनेक वयोवृद्ध व्यक्तींना घरपोच औषध वितरणाची व्यवस्थादेखील त्यांनी केली.


nagargoje_1  H


समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच सामान्यांचा आधारवड बनून काम करण्यासाठी मी नेहमी सक्षम, तत्पर राहीन व सामान्य जनतेचा आवाज म्हणून काम करेन. प्रभागातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभी राहीन.



नागरगोजे यांच्या प्रभागामध्ये अनेक ठिकाणांहून कामानिमित्त, शिक्षणानिमित्त विद्यार्थी दाखल झाले होते. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना घरी जाणे अवघड होते. अशा लोकांना पोलीस ठाणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून गावाकडे जाण्यासाठी पासेस उपलब्ध करून दिले. वेगवेगळ्या अधिकार्‍यांचे सहकार्य यावेळी मिळाले. एखाद्या व्यक्तीकडे घरी जाण्यासाठी पैसे नसतील, तर आर्थिक मदतदेखील नगरसेविका नागरगोजे यांनी केली.हे सर्व काम करत असताना, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार महेशदादा लांडगे तसेच आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, लेखा समिती अध्यक्ष सचिनदादा पटवर्धन प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव दादा खाडे, अमित गोरखे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे नागरगोजे सांगतात.


या प्रभागामध्ये रस्ते, ड्रेनेजची कामे, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन ही कामे केली जातात, तसेच समाजोपयोगी कामांवर अधिक भर देण्यात येतो. या भागातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन त्यांचे कौतुकही केले जाते. अनेक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नागरगोजे यांच्या माध्यमातून खाऊवाटपदेखील केले जाते. एखाद्या रोजंदारीवर काम करणार्‍या व्यक्तीला कामाची आवश्यकता असल्यास, त्याला काम मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातात. हे सर्व काम एकट्याचे नसून सर्व कार्यकर्ते मिळून करत आहेत. नागरगोजे यांचे संपूर्ण कुटुंब समाजसेवेसाठी नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत आहे. प्रकाश धोंडे, यशवंत कन्हेरे, महादेव कवितके, वैभव सरोदे, बालाजी कानवटे, शिवानंद चौगुले, चिंतामण परदेशी, राजेंद्र कुलकर्णी, उमेश गारगोटे, अभिजीत जोशी, विजय घोडके, संजय रोकडे, विनोद रोकडे, डॉ. मीनाक्षी शिंदे, संदीप खरात, दिनेश काकडे या सर्व कार्यकर्त्यांची नागरगोजे यांना याकामी मोलाची साथ लाभली.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@