लोकसेवा सर्वोपरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

khadye_1  H x W


लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, त्यावर मार्ग काढून वैशाली खाडये यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये व्यापक मदतकार्य हाती घेतले. कोरोना काळात अन्नधान्य, औषधे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था खाडये यांनी केली. लोकसेवेचे अंगीकारलेले व्रत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास आणले. तेव्हा, कोरोनाच्या काळात वैशाली खाडये यांनी केलेल्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....

वैशाली प्रशांत खाडये
राजकीय पक्ष : भाजप
पद : युवती सहसंयोजक, भाजयुमो
प्रभाग क्र. : ९, पिंपरी-चिंचवड मनपा, स्वीकृत नगरसेविका
संपर्क क्र. : ९८२३२५३५६४


कोरोना महामारीचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढतच गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी ‘लॉकडाऊन’ घोषित केला व नंतर तीनच दिवसांत दि. २६ मार्चपासून वैशाली खाडये आणि भाजपचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने समाजसेवेसाठी उभे राहिले. तेव्हापासून ते आजतागायत सर्वसामान्यांसाठी खाडये व त्यांचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. पिंपरी-चिंचवड प्रभाग क्रमांक ९ मधील जे स्थलांतरित विद्यार्थी होते, त्यांच्यासाठी दोन वेळेच्या जेवणाची सोय खाडये यांनी केली. तसेच सफाई कामगारांच्या जेवणाची, नाश्त्याचीही त्यांनी सोय केली. कारण, कडक ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे सफाई कर्मचारी सतत स्वच्छतेच्या कामामध्ये व्यस्त होते आणि खासकरुन उन्हाळ्यामुळे त्यांच्यावर अधिक ताण पडत होता. उन्हाची दाहकता कमी व्हावी, म्हणून ताक व सरबताची सोय वैशाली खाडये यांनी प्रथमतः केली. मुंबई-पुणे महामार्गावर फुटपाथवर राहणार्या गरीब-गरजूंची दोन वेळच्या जेवणाची सोयही खाडये यांनी केली. ही सेवा संपूर्ण ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये त्यांनी पुरवली. तसेच २४ तास अहोरात्र आपले कर्तव्य बजावणार्या पोलीस कर्मचार्यांवनाही खाडये यांनी मदतीचा हात दिला. पोलीस कर् सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज, सरबत, चहा, पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम खाडये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड भागातील भटक्या-विमुक्त जमातीच्या नागरिकांचे या काळात प्रचंड हाल होत असल्याची माहिती खाडये यांना मिळाली. ही बाब लक्षात घेता, या सर्व १२७ कुटुंबांना एक महिन्याचा किराणामाल घरपोच पोहोचविण्याचे काम त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खाडये यांनी केले.


सुरुवातीच्या काळामध्ये ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यामुळे लोकांना कोरोनाविषयी योग्य ती माहिती देऊन त्यांच्या ज्ञानात भर घालणे अत्यावश्यक होते. ही बाब ध्यानात घेता, रिक्षावर स्पीकर लावून प्रत्येक सोसायटीमध्ये जनजागृती करून लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी करण्याचे काम खाडये यांनी केले. त्यासोबतच नागरिकांनी नेमकी या महामारीच्या काळात कोेणती काळजी घ्यावी, याविषयीची त्यांना माहिती देऊन जनजागृतीपर कार्यक्रमही राबविले. “हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, आवश्यक असल्यावरच घराबाहेर पडा,” अशी माहिती देत वैशाली खाडये खुद्द सर्व प्रभागभर फिरल्या. त्यानंतर प्रभागांमध्ये जेवढ्या सोसायटी आहेत, त्या ठिकाणी मोफत सॅनिटायझेशनची औषध फवारणी केली, जेणेकरून विषाणू असेल तर नष्ट होऊन, त्या ठिकाणी स्वच्छता राखता येईल. यासाठी सातत्याने वैशाली खाडये प्रयत्नशील होत्या. पिंपरी गावातून जवळपास १०० गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन देण्याचे काम त्यांनी केले. वाकड येथे ७० बिहारी मजूर कुटुंबांनाही अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गरिबांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कलाकारांचेही ‘लॉकडाऊन’काळामध्ये प्रचंड हाल झाले. त्यावेळेस ‘पिंपरी-चिंचवड कलाकार असोसिएशन’ने केलेल्या मागणीनुसार त्यांना मदत देण्यात आली. अशा जवळपास ७० कलाकारांना मदत केल्याचे वैशाली खाडये यांना समाधान वाटते. ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पूर्णपणे भान राखत खाडये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत अभियान प्रभागात राबविले. भाजीमंडई, किराणा दुकानदार, दूध डेअरी तसेच सर्व नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे महत्त्व पटवून देऊन त्यांना हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप त्यांनी केले. हे सर्व वैशाली खाडये यांचे एकट्याचे काम नसून, सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र सर्वसामान्यांसाठी अशाचप्रकारे झटत होते. जनजागृतीपण कार्यक्रमांवर यावेळी खाडये यांनी भरपूर भर दिला आणि त्याचा नक्कीच फायदा झाल्याचे खाडये सांगतात.


khadye_1  H x W

आगामी काळात अनेकविध समाजाभिमुख कामे हाती घेऊन प्रभाग स्वच्छ, सुंदर व सर्वगुणसंपन्न करण्यावर मी अधिकाधिक भर देणार आहे. आम्हाला या सर्व मदतकार्यांत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन असेच लाभत राहो, हीच सदिच्छा.

प्रभाग ४४ मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे रेशनही खाडये यांनी देऊ केले. तसेच सॅनिटायझर, फेस शिल्ड, हॅण्डग्लोव्हज, आयुर्वेदिक काढा-पावडर यांचे वाटपही केले. त्यांचा उत्साह वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, म्हणून कोविड योद्ध्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही या काळामध्ये खाडये यांनी आयोजित केला होता. आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, तो स्वतः तयार करून सात हजार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही वैशाली खाडये यांनी प्रभागामध्ये केले.प्रभागांमधील सोसायट्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणार्याप सर्व नेपाळी बांधवांनाही त्यांनी अन्नधान्यवाटप केले. ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये प्राधान्याने हातावर पोट असणार्याप कष्टकरी लोकांसाठी अन्न आणि अंगावर कपडा हाच उद्देश ठेवून खाडये लोकांसाठी झटत राहिल्या. शहरातील ४२ तृतीयपंथीयांनी मदत मागितली असता, वैशाली खाडये यांनी त्यांना एक महिन्याचे रेशन उपलब्ध करुन दिले. तसेच २४ तास रुग्णवाहिकेची सेवाही प्रभागामध्ये चालू होती. कोरोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे कामही खाडये यांनी नेटाने केले. त्या रुग्णाचा जीव बचावला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्याचबरोबर वैशाली खाडये यांनी १७ रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला.


शहरात आकुर्डी व चिखली या दोन ठिकाणी खाडये यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून खरं तर त्यांना विविध मदतीसंदर्भात सतत फोन येत राहिले. अगदी कोणत्याही व्यक्तीला त्यांनी मदतविना रिकाम्या हाताने पाठविले नाही. या काळात स्थलांतरित लोकांना ई-पास उपलब्ध करून दिले. तसेच बस करून ‘लॉकडाऊन’ काळामध्ये २४ तास त्या कार्यकर्त्यांबरोबर समाजकार्यासाठी धावपळ करत होत्या. कारण, जर कार्यकर्तेच हाताशी नसतील, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मदतकार्य काम करणेच शक्य नाही. वैशाली खाडये यांच्या मदतीतून संत तुकाराम पोलीस चौकी या ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिली, तसेच हॅण्डग्लोव्हजचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान असल्याचे त्या सांगतात. कोरोनाकाळातील मदतकार्याव्यतिरिक्तही वैशाली खाडये त्यांच्या प्रभागातील सर्वच लोकहिताच्या कार्यक्रमांमध्ये आघाडीवर असतात. तसेच विद्यार्थ्यांची फीवाढ, त्यामुळे पालकांना येणारा आर्थिक ताण, याविषयी देखील वैशाली खाडये यांनी आवाज उठविला आहे. ‘लॉकडाऊन’अगोदर, ‘तीन तलाक’, ‘कलम ३७०’ नक्की काय आहे, याविषयी खाडये यांनी विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सर्वांमध्ये त्यांचे मोठे बंधू माजी नगरसेवक राजेश अण्णा पिल्ले यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
@@AUTHORINFO_V1@@