मदतीचे ‘तुषार’ सिंचन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

tushar kamothe_1 &nb



कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात सामान्य जनतेसाठी, तसेच गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना भाजपचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तुषार कामठे यांनी मदतीचा हात दिला. माणुसकीच्या नात्याने मास्क, अन्नदान, सॅनिटायझर, फळवाटप, औषध वितरण अशी सर्वतोपरी मदत गरजूंना निःस्वार्थपणे मदत केली. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


तुषार गजानन कामठे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवकप्रभाग क्र. : २६, विशालनगर, पिंपळे निलख, पिंपरी-चिंचवड
संपर्क क्र. : ९९६०९९९९९८



कोरोना कालखंडात सर्वाधिक फटका बसला तो गरीब मजूर, कामगार शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष अशा सर्वसामान्य जनतेला. २३ मार्चनंतर सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर झाले. त्यानंतर शासनाची यासंबंधीची नियमावली नीट समजून घेऊन तुषार कामठे यांनी नियोजन केले. सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना किराणा सामान, दूध, औषधे यांचे नियोजनपूर्वक वाटप प्रभागांमध्ये त्यांनी सुरु केले. तुषार कामठे यांनी शासकीय मार्गदर्शनानुसार प्रभागात भाजीमंडईची स्थापना केली. या मंडईत सर्वसामान्य जनता ठरलेल्या वेळेत भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असे. या ठिकाणी तंतोतंत ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सॅनिटायझरचा वापर, त्या ठिकाणी सतत केला जायचा. कोणालाही कोरोना होऊ नये, याची दक्षता पूर्णपणे घेतली जात होती.या सर्व कामांमध्ये प्रशासकीय लोकांनीदेखील कामठे यांना सहकार्य केले. पोलीस, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील कर्मचार्यांदचीही कामठे यांना मदत मिळाली.



महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण असताना त्यावर जास्त भार नको म्हणून तुषार कामठे आणि टीमने सर्व प्रभागामध्ये स्वतः जाऊन सोसायटी सॅनिटायझर करून घेतल्या. सर्व ठिकाणी स्वच्छता कशी राहील, याची पूर्ण दक्षता घेतली जात होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार, तुषार कामठे आणि टीमने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या गोळ्यांचे वाटप करून त्याविषयी माहिती देऊन कोरोना होऊ नये, याची काळजी घेण्यास सांगितली. जवळपास २५ हजार गोळ्यांचे वाटप केले.प्रभागातल्या एखाद्याला कोरोना झालाच, तर आसपासची लोक त्यांना मदत करण्यास धजावत नसत. त्या क्षणाला तुषार कामठे यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी किराणा, दूध, भाजीपाला असे सर्व साहित्य पुरविण्याचे काम त्यांनी केले. त्यांना मानसिक धीर देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कामठे यांच्या माध्यमातून करण्यात आले.


tushar kamothe_1 &nb



मी अनेक वर्षे राजकारणात असून समाजातील वंचित, शोषित, रंजल्या-गांजल्या लोकांना आधार देत कार्यरत राहणार आहे. त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेऊन, त्यातून मार्ग काढून त्या सोडविण्यावर अधिक भर यापुढे मी देणार आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत माझी सेवा पोहोचावी, एवढी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.


कोरोनाकाळात ज्यांना कोणीच वाली नव्हते किंवा जे फुटपाथवर झोपायचे, अशा लोकांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था तुषार कामठे आणि टीम यांनी केली. कोणाचे हाल होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणा काम करत होती.‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये लोकांना गावी जाण्यासाठी त्यांची सोय व्हावी, यासाठी महानगरपालिकेमधून त्यांना पास मिळवून देऊन त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनीदेखील पास मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.सर्वसामान्यांचे काम करत असताना, स्वतः तुषार कामठे यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. पण, तरीदेखील हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी काय केलं पाहिजे, याविषयी आपल्या कार्यकर्त्यांना ते वारंवार सूचना देत असत. देवाच्या कृपेने आणि सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने ते लवकर यातून बाहेर पडले आणि पुन्हा जोमाने सामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी पुन्हा कामाला लागले. यादरम्यान, त्यांनी स्व:त प्लाझ्मादानही केले.वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीही रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी स्वखर्चातून रोज ५० लीटर दुधाचे वाटप तुषार कामठे यांनी केले. तसेच अनेक वेळा फळवाटपही केले. या सर्व कामातून एक मानसिक समाधान लाभावे आणि यातून रुग्ण बरा व्हावा, अशी प्रामाणिक इच्छा त्यांची होती.



tushar kamothe_1 &nb



कामठे म्हणतात की, “भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शन सातत्याने मला लाभले आहे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी समाजसेवेच्या वाटेवर अग्रेसर होतो. तसेच कार्यकर्त्यांमध्ये तेजस शिंदे, आशिष बालवडकर, तुषार देशमुख, अमोल कामठे, आदित्य इंगवले हे सर्व मित्र सातत्याने माझ्या पाठीशी, माझ्याबरोबर काम करत होते. हे सर्व काम एकट्याचे नाही, तर सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून समाजाप्रतिची सेवा नोंदविली आहे.”एखाद्या व्यक्तीला कोरोना झालाच तर त्या व्यक्तीला बेड मिळत नसेल, ऑक्सिजन मिळत नसेल, तर अशा व्यक्तींना पूर्ण सहकार्य करून त्यांना उपलब्ध करून देण्याचं कामदेखील तुषार कामठे यांनी केले.कोरोनाव्यतिरिक्तही कामठे यांनी आजपर्यंत वेगवेगळे उपक्रम राबविले. त्यामध्ये झाडे लावण्यासंबंधी तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप, असे अनेकविध उपक्रम तुषार कामठे यांनी आपल्या प्रभागांमध्ये राबविले. या सर्व समाजरूपी सेवांमधून कामठे यांनी सामाजिक ठसा उमटविला आहे आणि समाजाप्रति असणारी सेवा दिली आहे. यापुढील काळातदेखील ते आपली सेवा देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहेत.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@