मदतीचा ‘भोई’र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

bhoir_1  H x W:


कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगारांच्या व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नगरसेवक सुरेश भोईर भक्कमपणे उभे राहिले. त्यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणाची मदत आपल्या प्रभागासह अन्य ठिकाणीही केली. त्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

सुरेश शिवाजी भोईर
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : १८, पिंपरी-चिंचवड मनपा
संपर्क क्र. : ९८२२०२१८९२


कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो गरीब मजूर कामगार, रोजंदारीवर काम करणारे लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना! त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. माणुसकीच्या नात्याने समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धाव घेणारे आणि समाजाप्रति सेवा देण्यासाठी तत्पर असणारे नगरसेवक सुरेश भोईर यांनी या सर्वांना मदतीचा हात पुढे केला. या मदतकार्यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचीही मोलाची साथ लाभल्याचे ते सुरुवातीलाच अधोरेखित करतात. गरजवंतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे नगरसेवक सुरेश भोईर आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ठरवले, जेणेकरून कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली. सुमारे तीन महिने पाच हजार कुटुंबीयांना रेशन किटचे वाटप नगरसेवक सुरेश भोईर आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केले. संपूर्ण प्रभागांमध्ये मदत पोहोचण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊन आणि सर्व काळजी घेऊन लागेल ती मदत पोहोचण्यासाठी यंत्रणा उभी केली.रेशन किटचे वाटप करताना ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, उत्तम राहावे, यासाठी फळांचेदेखील वाटप करण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असल्यामुळे त्यांना घरपोच औषध वितरणाची व्यवस्थादेखील भोईर यांनी केली.


तसेच वायसीएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व परिचारकांना फळांचेही वाटप केले. कोरोनाच्या या सर्व काळामध्ये हॉस्पिटलमध्ये जीव धोक्यात घालून काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांरची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील २० आरोग्य कर्मचार्यांकची सतत दोन महिने भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. अशा काळात प्रत्येकाची मनस्थिती सुदृढ राहावी, म्हणून त्यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांची आवर्जून विचारपूस भोईर यांनी केली.‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये प्रत्येक जण आपआपल्या घरातच असल्यामुळे नगरसेवक सुरेश भोईर यांनी आपल्या प्रभागामध्ये कार्यकर्त्यांची मदत घेऊन घराघरांत ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे वाटप करून कोरोना विषाणूविषयी जनजागृती करण्याचे कामदेखील केले. ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक २५ हजार गोळ्यांचे वाटपदेखील त्यांनी केले. प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये, वसाहतींमध्ये जाऊन सॅनिटायझर औषधाची फवारणी त्यांनी करुन घेतली. एखाद्या भागामध्ये कोरोना रुग्ण सापडल्यास त्याठिकाणी सर्व काळजी घेऊन, फवारणी करून इतर ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. प्रभागामध्ये कोरोना विरोधात लढण्यासाठी जवळपास तीन हजार मास्कचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी सॅनिटायझरदेखील मोफत देण्यात आले.प्रभागामध्ये सतत २४ तास खडा पहारा देणार्यार पोलीस कर्मचार्यांीना चहा-नाश्त्याचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस कर्मचार्यांलची विचारपूस करून त्यांना लागेल ती मदत पुरवण्याचे कामदेखील भोईर यांनी केले. प्रभागांमध्ये अनेक नागरिकांच्या समस्या होत्या. त्या सोडवण्यासाठी आणि पुरेपूर मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवून त्यांना मदत पुरवली.



bhoir_1  H x W:



गेली अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारण करताना गरीब-वंचित-शोषित, रंजल्या-गांजल्यांना मी मदत केली. त्यांच्या अडीअडचणी, समस्या व्यवस्थित समजून घेतल्या. यापुढेही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपली समाजाप्रतिची जबाबदारी लक्षात घेता, मी अशीच मदत करीत राहीन.



‘लॉकडाऊन’मध्ये सर्वच यंत्रणा ठप्प झाल्यामुळे रक्ताचा तुटवडाही प्रकर्षाने जाणवू लागला. ही बाब लक्षात घेता, प्रभागामध्ये कार्यकर्त्यांच्या बरोबरीने भोेईर यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजनदेखील केले आणि ज्या ठिकाणी आवश्यकता होती, त्या त्या ठिकाणी रुग्णांना रक्तपुरवठा वेळेत होईल, याची काळजी घेतली. जवळपास ६० लोकांनी रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला. प्रभागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली समाजाप्रतिची सेवा समजून रक्तदान उपक्रमात सहभाग घेतला. तसेच अन्य कार्यकर्त्यांनी जेवणाचे डबे गरजूंपर्यंत पोहोचवून या मदतकार्याला हातभार लावला. भोईर यांच्या प्रभागामध्ये कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त अनेक नागरिक वास्तव्याला होते. ‘लॉकडाऊन’ आणि हाताला काम नसल्यामुळे प्रत्येकालाच आपआपल्या गावी जाण्याची घाई होती.अशावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साहाय्याने तेथील कर्मचार्यांाच्या मदतीने अनेकांना ई-पास उपलब्ध करून दिले. ज्यांना शक्य होते, त्यांना प्रवास खर्च देऊन गावी पाठवण्याची व्यवस्था केली गेली.


‘लॉकडाऊन’च्या अगोदर प्रभागामध्ये अनेक समाजोपयोगी कामेदेखील भोईर यांनी हाती घेतली.यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावी-बारावीनंतर पुढे काय, यासारखी व्याख्यानेदेखील आयोजित करून मार्गदर्शन देण्यासाठी टीम उभी केली. तसेच त्यांच्या अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमदेखील राबविले. प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे, ड्रेनेज, कचरा समस्या अशी अनेक अन्य कामेदेखील करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देण्यात आला.‘लॉकडाऊन’ आणि कोविड काळामध्ये सर्व कामांचे नियोजन करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक ठिकाणी योग्य ती मदत पोहोचण्यास मदत झाल्याचे भोईर सांगतात.  नगरसेवक सुरेश भोईर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कैलास राणे, हरिभाऊ मोहिते, सौरभ जगताप, अरुण देवरे, शिवाजी देशमुख, ज्येष्ठ नागरिक असणारे काकादेखील आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आपले समाजसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावले. नगरसेवक सुरेश भोईर यांना मदतकार्यादरम्यान गरजूंनी उत्तम प्रतिसाद दिला. या गरजूंच्या मनात आपल्यासाठीही कोणीतरी झटत असल्याची भावना यावेळी निर्माण झाली.असा हा कोरोना आपत्तीचा काळ कोणीही विसरू शकत नाही. मात्र, या कठीणकाळात सुरेश भोईर आणि त्यांच्यासारख्या ‘कोविड योद्धा’ म्हणून राबलेल्या लोकप्रतिनिधींमुळे समाजात माणुसकीचे दर्शन झाले.

- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@