सर्वसामान्यांचा आधारस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

chinchawade_1  



कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत भाजप शहर उपाध्यक्ष व ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य शहरांमध्येही ठिकठिकाणी केली. या मदतकार्यामुळे हजारो नागरिकांना अगदी आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळाला. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


शेखर बबनराव चिंचवडे
राजकीय पक्ष : भाजप
पद : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष
प्रभाग क्र. :१७, पिंपरी-चिंचवड मनपा
संपर्क क्र. : ९८८१४९०१२३


कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला गोरगरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणार्‍या महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना. अशा सर्वांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धाव घेणार्‍या शेखर चिंचवडे यांनी प्रत्येकाला मदतीचा हात पुढे केला. या सर्व कामांमध्ये त्यांची पत्नी नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांनीदेखील त्यांची साथ दिली. सुरुवातीला गरजवंतांना दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे चिंचवडे दाम्पत्याने ठरवले, जेणेकरून कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. शक्य त्या आणि मागेल त्या प्रत्येकाला मदत करण्याचे काम त्यांनी केले. अशाप्रकारे शेखर चिंचवडे आणि करुणा चिंचवडे यांच्यासह ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’ व इतरांनी मिळून ‘लॉकडाऊन’काळात १,७०० कुटुंबीयांना रेशन किटचे वाटप केले.प्रभाग क्रमांक १७ मध्येही मदत पोहोचविण्याची दक्षता त्यांनी घेतली. मदत केलेले बहुतांश हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे, वृत्तपत्र विक्रेते, महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि मराठीजनांबरोबर अन्य राज्यातील स्थलांतरित झोपडपट्टीवासीयांचाही समावेश होता.



हे सर्व करत असताना गोरगरीब, हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य लोकांसाठी रोज ७०० नागरिकांना भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप व ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’ यांच्या सहयोगाने सलग ४० दिवस मोफत अन्नदान करण्यात आले. हे सर्व काम करत असताना कार्यकर्ते आपल्या आरोग्याची खबरदारी घेऊन, या कामासाठी ते झटत होते. कोणताही माणूस अन्नाशिवाय राहू नये, हा प्रामाणिक उद्देश होता. अन्नाबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी फळांचे वाटप करण्याचेही भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी ठरविले व त्यानुसार प्रभागातील १०० घरांमध्ये फळाचे वाटप केले. तसेच वायसीएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स व परिचारकांनाही फळाचे वाटप केले. तसेच ४० पत्रकार बंधू, तंत्रज्ञ यांनादेखील अन्नधान्य किटचे वाटप केले. हे करत असताना रुग्णालयात जीव धोक्यात घालून काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रभागातील आरोग्य कर्मचार्‍यांची स्वतंत्र जेवणाची व्यवस्थाही दोन महिने करून दिली.प्रभागांमधील कोरोनाकाळामध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटणार्‍या पोलीस प्रशासन, आरोग्य सफाई, कर्मचारी, डॉक्टर, परिचारकिक, वीज वितरण कर्मचारी, औषधविक्रेते, किराणा दुकानदार अशा ४०० नागरिकांना ‘कोरोना योद्धा सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे प्रोत्साहन वाढावे व त्यांच्या कामाची दखल घ्यावी, हा प्रामाणिक हेतू शेखर चिंचवडे यांचा होता.


chinchawade_1  



मी समाजकार्य करत असताना राजकारणात आलो. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे व तळागाळातील नागरिकांना पुढे आणणे, हा प्रामाणिक हेतू ठेवून मी काम करत आहे. यापुढील काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहीन.


या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना भाजीमंडईमध्ये भाजी स्वस्त दरात मिळावी म्हणून प्रयत्न केले. महापालिकेच्या द्वारे उभारण्यात आलेल्या मंडईमध्ये विक्रेत्यांना हॅण्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले व नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचेही आवाहन केले. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक घरामध्ये जाऊन कोरोना रोखण्याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रभागांमध्ये कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करून त्यांना योग्य ते उपचार मिळावे, यासाठी प्रयत्नदेखील केले. कोरोनाग्रस्त भागामध्ये सॅनिटायझर औषध फवारणीही करून घेतली. एखादा रुग्ण सापडल्यास त्यांना वायसीएममध्ये बेड उपलब्ध करून देऊन डॉक्टरांच्या माध्यमातून त्या रुग्णाची चौकशी केली. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊन त्यांच्या घरचे रेशन भरून दिले. ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’च्या शेकडो सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे घरोघरी वाटप केले. सतत २४ तास खडा पहारा देणार्‍या पोलीस बांधवांना स्वतःची काळजी घेण्यासाठी मेडिकल किटचेही वाटप करण्यात आले. ‘लॉकडाऊन’मुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना ‘ई-बुक’ सुविधा उपलब्ध करून दिली आणि ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्वही पटवून सांगितले.दरम्यान, कोरोनाकाळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, शेखर चिंचवडे आणि ‘शेखर चिंचवड यूथ फेस्टिवल’ यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यामध्ये ६१ लोकांनी रक्तदान करून आपली समाजाप्रतिची सेवा दिली.



कोरोनाव्यतिरिक्त ‘शेखर चिंचवडे यूथ फेस्टिवल’च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रमही घेतले आहेत. यामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. जवळपास दीड हजार झाडे त्यांनी लावली आहेत. तरुणाईला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते, तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी मार्गदर्शन सत्राचेही नियोजन केले जाते. याव्यतिरिक्त प्रभागांमध्ये रस्ते, ड्रेनेजची कामे, कचरा समस्या व अन्य कामांकडे ते स्वतः लक्ष घालून काम करून घेतात.या सर्व कामांमध्ये कमलाकर गोसावी, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर, कृष्णा वाघमारे, तेजस शेळके व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवत आपली समाजाप्रतिची सेवा दिली, तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरी-चिंचवड शहराचे आमदार महेश लांडगे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका करुणा चिंचवडे हे मदतकार्य करताना त्यांना गरजूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यांच्या मनात आपल्यासाठीही कोणीतरी झटत असल्याचा विश्वास निर्माण झाला. कोरोना आपत्तीचा काळ कोणीही विसरू शकत नाही. मात्र, यात समाजातील माणुसकीचे दर्शन झाले व ही माणुसकी यापुढेही दिसली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@