मदतकार्याचा ‘संतोष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

santosh londhe_1 &nb



कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा काळ हा सर्वांचीच परीक्षा पाहणारा होता. गरिबांपासून ते अगदी धनदांडग्यांपर्यंत कोरोनाची झळ सर्वांनाच बसली. पण, याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागले ते गरीब आणि मध्यमवर्गीयांना. तेव्हा, एरवीही काहीसे दुलर्क्षित असणाऱ्या समाजातील या घटकाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष (आण्णा) लोंढे यांनी मदतीचा हात दिला. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...


संतोष (आण्णा) लोंढे
राजकीय पक्ष : भाजप
पद : अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड मनपासंपर्क क्र. : ९११२२१९९९९


कोरोना ही साधीसुधी आपत्ती नसून जीवघेणी महामारी होती. जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी विकसित देशांपासून ते विकसनशील देशांपर्यंत कुणालाही या आपत्तीचा नेमका सामना कसा करायचा, याची कुठलीही पूर्वकल्पना नव्हती. उपाय एकच होता, तो म्हणजे ‘लॉकडाऊन.’ कारण, त्याशिवाय लोकांचा एकमेकांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटणार होता, कमी होणार होता. अनेक देशांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मग ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उगारले आणि कोरोनाशी अवघ्या जगाची लढाई सुरु झाली. पण, साहजिकच या ‘लॉकडाऊन’मुळे अवघे जनजीवन ठप्प झाले. दळणवळणाचे मार्गही एकाएकी गोठले. परिणामी, एरवी वर्दळ असलेले रस्ते, महामार्ग, बाजारपेठा, रेल्वे स्थानके ओस पडली. रस्त्यावर कुठेही चिटपाखरुही यावेळी दिसत नव्हते, अशी स्थिती. ‘घरी राहा, सुरक्षित राहा’चा सगळीकडे काटेकोरपणे अवलंब सुरु झाला. पण, तरीही ज्यांना कोरोनाने गाठायचे, त्यांना गाठलेच. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोरोनाशी लढा देणे हे रुग्णांसाठीही अतिशय आव्हानात्मक होते. शिवाय डॉक्टरांसाठी आणि एकूणच वैद्यकक्षेत्रासाठी हे एक नवीन आणि खूप मोठे आव्हान समोर होते. रोज याबाबत नवनवीन निष्कर्ष, संशोधन समोर येत होते. जनतेच्या मनातली भीतीही त्याच वेगाने वाढत होती. ही बाब लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी सर्वप्रथम कोरोनाविषयक जनजागृतीवर भर दिला. त्यांची कार्यकर्त्यांची आणि पालिकेची प्रशासकीय यंत्रणाही त्यांनी यासाठी लवकरात लवकर कार्यान्वित केली. परिणामी, कोरोना हा आजार असला तरी तो प्रत्येकवेळी जीवघेणा नाही, याची लोकांना हळूहळू कल्पना येऊ लागली. मास्क, सॅनिटायझेशन, ‘सोशल डिस्टन्सिंग’ याबाबतीतही नागरिकांना माहिती समजत होती आणि मग त्यानुसार या महामारीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनीही बचावात्मक उपाययोजनांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केला.


‘लॉकडाऊन’मुळे गरीब, कामगार, मजूरवर्गासमोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला. रोज चार पैसे कमावून दोन घास पोटात ढकलणाऱ्या गरिबांची तर एकाएकी झोपच उडाली. पदरमोड करुन जगायचे तरी किती दिवस, यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणि बैचेनी वाढत होती. त्यामुळे या गरीब-गरजूंना अनेक कोविड योद्ध्यांनी भरघोस मदत करुन दिलासा दिला. संतोष लोंढेही या कामी अगदी अग्रेसर होते. मूळ प्रश्न होता तो अन्नधान्याचा. कारण, कोरोना नाही झाला, तरी उपासमारीने या लोकांचा नाहक बळी घेतला असता. ही बाब ध्यानात घेता, लोंढे यांनी धान्यवाटप आणि अन्नछत्र सुरु करण्यावर भर दिला. भोसरी परिसरातील गरजू लोकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय पी.एम.टी चौक, बुद्धविहार, शांतीनगर - भोसरी या ठिकाणी दुपारी १२.३० ते १.३० आणि संध्याकाळी ७. ते ८.३० या वेळेत गरजूंना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. प्रभाग क्र. ७ मध्ये गुळवे वस्ती दत्त मंदिर, शांतीनगर बौद्ध विहार, सेवालाल मंदिर परिसरात व्हेज पुलाव वाटप करण्यात आले. तसेच शांतीनगर परिसर, लोंढे तालीम परिसर येथे अन्नधान्याचे वाटपही करण्यात आले. स्वतः प्रभाग क्र. ७ भोसरी येथील गोरगरीब व झोपडपट्टीतील नागरिकांसाठी तीन महिने सलग असा हा अन्नदानाचा सेवाकुंड सुरुच होता. केवळ आपल्या प्रभागाचा विचार न करता, संतोष लोंढे यांनी पिंपरी-चिंचवड शहरामधील ३२ प्रभागांमध्ये अशाप्रकारे अन्नछत्र सुरु करुन हजारो गरजूंची भूक भागविली. पोटाच्या प्रश्नाबरोबरच आरोग्याचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आणि गंभीर होता. कारण, कोणाला, कधी, कशी, कुठे कोरोनाची लागण होईल, याचा अजिबात नेम नव्हता. तेव्हा, कोरोनापासून बचावासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत लोंढे यांनी होमियोपॅथीच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्याप गोळ्या, मास्क, वेळोवेळी हात धुण्यासाठी साबण-सॅनिटायझर यांचे घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण प्रभागामध्ये निर्जंतुकीकरण मोहीम मोठ्या पातळीवर हाती घेण्यात आली.



santosh londhe_1 &nb



आ. महेशदादा लांडगे व आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने कोरोनामध्ये नागरिकांना मी सर्वोपरी मदत केली. यापुढील काळातही गरजूंना अशाचप्रकारे पक्ष आणि प्रशासकीय पातळीवरही आम्ही अशीच मदत करीत राहू.

कोरोना महामारीमध्ये एकाएकी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू लागला. बेडसोबतच रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचीही कमतरता जाणवू लागली. त्यातच सुरुवातीच्या काळात कित्येक खासगी डॉक्टरांनी आपापली क्लिनिक्स बंद ठेवल्याने सरकारी आरोग्य व्यवस्थेकडून नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या. तेव्हा, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून पालिकेची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत होती. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये एक कोविड सेंटर ७०० लोकांच्या क्षमतेच्या बेडसह सुरु करण्यात आले. पीएमआरडी व पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने ८५० लोकांच्या क्षमतेचे जम्बो कोविड सेंटरही उभारण्यात आले. एटो क्लस्टर येथेही ५०० क्षमतेचे बेड उभारण्यात आले. त्याप्रमाणे शहरात पाच हजार नागरिकांसाठी ‘कोविड सेंटर’ चालू केले व नागरिकांच्या ‘कोविड’ चाचण्या करण्यात आल्या.



त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात महामारीची ही आपत्कालीन स्थिती आटोक्यात ठेवण्यात लोंढे यांनी याकामी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचले आणि त्यांनी संतोष लोंढे यांच्यासह संपूर्ण पालिकेच्या आरोग्य विभागाचेही आभार मानले. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून प्रशासकीय पातळीवर आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणून सामाजिक-राजकीय स्तरावरही संतोष लोंढे यांचे मदतकार्य अविरतपणे सुरुच होते. केवळ पालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून न राहता, त्यांनी वैयक्तिक आणि राजकीय मदतीवरही तितकाच भर दिला. आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि या शहराची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, याचे भान त्यांनी कायम बाळगले. महामारीच्या या संकटात अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णालयांची व्यवस्था करण्यापर्यंत कुठलीही ढिलाई राहणार नाही, याकडे संतोष लोंढे यांनी कटाक्षाने लक्ष दिले. नुसती मदत न करता, त्याच्या नियोजनावर, चोख अंमलबजावणीवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. मदतकार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अक्षम्य हलगर्जीपणा कुणाकडूनही होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना, पालिकेत कार्यरत ‘कोविड योद्ध्यां’नाही वेळोवेळी मार्गदर्शन केले.एकूणच संतोष लोंढे यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जबाबदारीला पूर्णपणे न्याय देत, पिंपरी-चिंचवडकरांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या या कार्याला सलाम!
@@AUTHORINFO_V1@@