मदतीचा भक्कम ‘दुर्ग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

durg_1  H x W:

गेली अनेक वर्षे समाजसेवा आणि राजकारण करत असताना ‘लॉकडाऊन’ काळामध्ये गरीब, कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत, भाजपचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री राजू दुर्गे यांनी आपल्या समाजसेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा परिचय करुन दिला. त्यांनी आपल्या प्रभागात केलेल्या सेवाकार्यामुळे कित्येकांच्या चेहर्‍यावर हास्य उमलले. तेव्हा, दुर्गे यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

राजाभाऊ दुर्गे
राजकीय पक्ष : भाजप
पद : जिल्हा महामंत्री, माजी नगरसेवक
कार्यक्षेत्र : पिंपरी-चिंचवड मतदारसंघ
संपर्क क्र. : ९८९०२००२००
पिंपरी-चिंचवडसारख्या मोठ्या शहरामध्येही सर्वसामान्यांना ‘लॉकडाऊन’चा मोठा फटका बसला. यामध्ये गरीब, मजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेला सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागले. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न काही जणांसमोर उभा ठाकला. यावेळी समाजाप्रतिची सेवा देण्यासाठी जिल्हा महामंत्री राजू दुर्गे आधारस्तंभाप्रमाणे उभे राहिले. समाजबांधवांना धीर देण्यासाठी ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मिळून कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा धैर्याने सामना केला. जे रोजंदारीवर काम करणारे होते, त्यांच्या जेवणाची आबाळ जाणवू लागली, त्यावेळेस भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराचे महामंत्री राजू दुर्गे आणि सर्व कार्यकर्ते मिळून मोफत जेवणाची व्यवस्था केली. प्रभाग क्रमांक १४ मध्ये अनेक गरीब व वसाहतींमधील लोक आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दोन वेळचे अन्न घरपोच देण्याची व्यवस्था केली. जवळपास दोन महिने तीन हजार लोकांना जेवणाची व्यवस्था केली.ज्या ठिकाणी जेवण देणे शक्य नाही, त्या ठिकाणी आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या सहकार्याने अन्नधान्याचे किट जवळपास एक हजार लोकांपर्यंत पोहोचविले. काही घरांमध्ये जाऊन राजू दुर्गे आणि कार्यकर्त्यांच्या टीमने मिळून घरपोच किट पोहोचविले. खडीमशीनमधील लोकांना अन्नाची गरज तसेच रेशन पुरविण्याची गरजही भागविली.


कोरोनाविरोधात लढण्यासाठी जवळपास दोन हजार मास्क वाटपदेखील दुर्गे यांनी या काळात केले. वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, यांना चहा-बिस्कीटचे वाटपदेखील केले. प्रभाग क्रमांक १४ मध्ये कोरोनाविषयी प्रचंड भीती मनामध्ये होती, त्यावेळेस राजू दुर्गे आणि त्यांच्या टीमने मिळून कोरोना रोखण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली.एखादा कोरोना रुग्ण सापडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून, त्याला बेड उपलब्ध करून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी डॉक्टरांशी फोनवरून संपर्कात राहत होतो. रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या घरचे काळजीत पडायचे, त्यांना धीर देण्याचे कामदेखील दुर्गे आणि टीमने केले. प्रभागातल्या अनेक सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर फवारणी करून घेतली. फवारणी करत असतानाच प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहनही केले. काही सोसायट्यांमध्ये सॅनिटायझरचेही वाटप केले.


याच काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना रक्तदान शिबीर आयोजित करून अनेकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्लाझ्मा डोनेशनचेही कॅम्प आयोजित केले गेले. ज्या व्यक्तीला कोरोना झाला होता, त्या व्यक्तीने प्लाझ्मादान केले. अनेक दवाखान्यांच्या समस्यादेखील दुर्गे यांनी स्वतः लक्ष घालून सोडवल्या. सामान्यांचा आवाज बनून त्यांनी या समस्यांवर मात केली. हे काम करत असताना आपल्याला कोरोना होईल आणि रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागेल, असा विचार कधीही मनात न आणता अगदी प्रामाणिकपणे त्यांनी सेवा दिली. दुर्गे यांच्या प्रभागामध्ये नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त अन्य कामानिमित्त राहणारी लोकंही अडकून पडली होती. त्यांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी दुर्गे यांनी महानगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या मदतीने अनेक लोकांना ई-पास मिळवून दिले. ज्यांच्याकडे गावी जाण्यासाठीदेखील खिशात चार पैसे नव्हते, त्यांचे स्वतः पैसे देऊन गाडीची व्यवस्था दुर्गे यांनी करून दिली. घरोघरी जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक आणि शासनमान्य ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे वाटपदेखील त्यांनी केले. अशा जवळपास आठ हजार गोळ्यांचे वाटप केल्याचे दुर्गे सांगतात.



durg_1  H x W:


समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर व सक्षम राहीन. समाजाने व सर्वसामान्य जनतेने मला नेहमीच भरभरून प्रेम, आशीर्वाद दिले आहेत, त्यांचे इमान राखणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहीन.

प्रभागातल्या वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यानंतर तो भाग पूर्णपणे सील केला जायचा. तिथल्या वस्तीमधील लोकांची त्यामुळे गैरसोय होत होती, हे दुर्गे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांची समस्या सोडविण्यावर त्यांनी प्रथम लक्ष दिले. त्यांच्या या समस्येचे निराकरण केल्यामुळे तेथील तणाव काही प्रमाणात निवळला.‘लॉकडाऊन’मुळे बहुतांशी नागरिक आपआपल्या घरीच असल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहावे व त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी अनेक कार्यकर्ते रोज फोनवरून त्यांच्याशी संवाद साधत होते. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असल्यामुळे त्यांना औषधे घरपोच पाठविण्याची सोयदेखील दुर्गे आणि त्यांच्या टीमने केली.याच काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढत असल्याचे दिसले, त्यानुसार प्रत्येकाला त्याविषयी माहिती देऊन ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांना योग्य ती सोय उपलब्ध करून दिली.


कोरोनाव्यतिरिक्त अनेक उपक्रम प्रभाग क्र.१४ मध्ये त्यांनी राबविले आहेत. प्रभागांमध्ये अनेक आरोग्य शिबिरांचे देखील आयोजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरीब, वंचितांना अन्नधान्याचे वाटपदेखील केले. प्रभागातल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दहावी व बारावीनंतर करिअर मार्गदर्शनविषयी व्याख्याने आयोजित केली, असे विविध उपक्रम, आंदोलने दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी २४ तास दुर्गे यांचे कार्यालय त्यांनी खुले ठेवले आहे. प्रत्येक काम सर्वसामान्यांसाठी तळमळीने केल्यामुळे मानसिक समाधान यातून लाभल्याचे दुर्गे सांगतात.या सर्व कामांमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, तसेच आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य दुर्गे यांना लाभले आहे. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री राजू दुर्गे आणि असंख्य कार्यकर्ते समाजसेवेसाठी आणि समाजाप्रतिची माणुसकी दाखवत कोरोनाकाळात सर्वसामान्यांचा आधार म्हणून उभे राहिले.
-सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@