‘लक्ष्मणा’चे रामकार्य

    08-Dec-2020   
Total Views |


lashman jagtap _1 &n




कोरोनाकाळात लोकप्रतिनिधींनीही तितक्याच तळमळीने सर्वस्तरातील नागरिकांचा विचार करत मदतकार्यात सहभाग घेतला. गरिबांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांना हवी ती मदत या काळात चिंचवडचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांनीही केली. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फौजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात मदतकार्यासाठी सक्रिय होती. तेव्हा, आ. जगताप यांनी केलेल्या मदतकार्याचा परिचय करून देणारा हा लेख...



लक्ष्मण पांडुरंग जगताप

 

राजकीय पक्ष : भाजप

पद : आमदारमतदारसंघ : चिंचवड विधानसभा

संपर्क क्र. : ९८२२०५९४५९



कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात समाजातील सर्वच घटकांचे आयुष्य पणाला लागले. गरिबांपासून ते अगदी श्रीमंत व्यावसायिकांपर्यंत कोरोनाचा सगळ्यांनाच विविध पातळीवर आणि कमी-अधिक तीव्रतेने फटका बसलाच; पण खासकरून मजूरवर्ग, कामगार या संकटात अधिकच भरडले गेले. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांच्या रोजीरोटीचे वांदे झाले आणि पुन्हा आपल्या गावी माघारी फिरण्याचे त्यांचे मार्गही बंद होते. अशावेळी या गरजूंच्या मदतीला विविध पातळीवर ‘कोविड योद्धे’ धावून आले. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलिसांपासून ते लोकप्रतिनिधींचाही समावेश होता. अगदी नगरसेवकांपासून ते खासदार, मंत्रिमहोदयापर्यंत आपापल्या विभागात प्रत्येक लोकप्रतिनिधीचे मदतकार्य सुरूच होते. या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर एक सक्षम यंत्रणा अगदी अल्पकाळात उभी केली आणि त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही केली. त्यामुळे एरवी लोकप्रतिनिधी लोकांमध्ये दिसतच नाही, असे म्हणणार्‍यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यातूनच उत्तर दिले आहे.



. लक्ष्मण जगताप यांनी ‘कोविड’ काळात मदतकार्य व्यापकस्तरावर हाती घेतले. सर्वप्रथम या महामारीच्या काळात अल्पावधीत जाणवू लागला तो रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा. नेमकी ही बाब लक्षात घेता, आ. जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली. त्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय व ससून हॉस्पिटल येथे रक्त पुरविण्यात आले. रावेत, किवळे, मामुर्डी-साईज्योत हॉस्पिटल, आदर्शनगर, किवळे चिंचवडेनगर, प्रेमलोक पार्क-भुलेश्वर मंदिर, चिंचवडेनगर, चिंचवड, चिंचवडगाव, तालेरानगर, केशवनगर-सरदार गावडे कमर्शियल, कालिकामाता मंदिराजवळ, तानाजीनगर, चिंचवड गाव, काळेवाडी, विजयनगर-ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय, काळेवाडी थेरगाव- नगरसेविका अर्चनाताई बारणे यांचे संपर्क कार्यालय थेरगाव, गणेशनगर- संतोष मंगल कार्यालय, थेरगाव, मोरया मंगल कार्यालय, थेरगाव पुनावळे, वाकड- रां. वाकडकर यांचे जनसंपर्क कार्यालय, विशाल कलाटे यांचे जनसंपर्क कार्यालय पिंपळे निलख, वेणूनगर-संस्कृती सोसायटी, पिंपरी-चिंचवड मनपा शाळेशेजारी, कस्पटे वस्ती, वाकड रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर-विठ्ठल-रखुमाई मंदिर नखाते वस्ती, रहाटणी पिंपळे सौदागर-पृथ्वीराज मंगल कार्यालय, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, जुनी सांगवी, नवी सांगवी-रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव अशा जवळपास मतदारसंघातील कानाकोपर्‍यात आयोजित शिबिरांना रक्तदात्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


‘लॉकडाऊन’च्या काळात खासकरून गरीब, मजूरवर्गाच्या तोंडचा घासच हिरावला गेला. अन्न म्हणून शिजवायचे तरी काय, या प्रश्नाने अनेकांनी काही रात्री उपासमारीत काढल्या. जगताप यांच्या मतदारसंघातही गरिबांची तीच स्थिती. तेव्हा, ही बाब ध्यानात घेऊन जगताप यांनी शहरातील खानावळ, हॉटेल बंद असल्याने शिक्षणासाठी बाहेरगावाहून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना, तसेच सांगवी रुग्णालयातील परिचारिका व कामगार मजुरांना रोजचे दुपार व सायंकाळचे मोफत जेवणाचे डबे पुरविले. शहरातील साडेचौदा लाखांहून अधिक लोकांना दोन वेळचे जेवण पुरविण्यात आले. या सर्वांनी आ. जगताप यांचे यासाठी आभार व्यक्त केले. रोजच्या जेवणाबरोबरच कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’काळात पिंपरी-चिंचवड शहरात घरोघरी जाऊन सात हजारांहून अधिक नागरिकांना किराणा वस्तूंचे किटही पोहोचविण्यात आले. याकामी आ. लक्ष्मण जगताप यांना कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.


pune_1  H x W:

राजकारण म्हटले की, लोकांची सेवा करणे हे क्रमप्राप्त. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मिळून कोरोना काळातील मदतकार्य यशस्वीपणे राबविले. तेव्हा, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ हीच माझी या कामामागची प्रेरणा.


‘लॉकडाऊन’ काळात कित्येकांच्या रोजगार-व्यवसायावर कुर्‍हाड कोसळली. हाताशी जमवलेले चार पैसेही बघता बघता संपले. त्यामुळे या काळात पूर्णपणे मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा काही जणांनी स्वयंरोजगाराचाही मार्ग निवडला. आ. जगताप यांनी या ‘लॉकडाऊन’काळात ही बाब लक्षात घेता, महिलांना मास्क बनविण्याचे काम देऊन हाताशी रोजगार उपलब्ध करून दिला. याच काळात वृत्तपत्र विक्रेत्यांसमोरही उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा, शहरातील वृत्तपत्रविक्रेत्यांना अन्नधान्य व सॅनिटायझरचे वाटपही आ. जगताप यांनी केले. 
‘लॉकडाऊन’काळात केशकर्तनालयांनाही टाळे लागले. त्यामुळे केशकर्तनालयाचे मालक आणि कर्मचार्‍यांवरही उपासमारीची वेळ आली. आ. जगताप यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी बंद असलेल्या शहरातील केशकर्तनालयातील कर्मचार्‍यांना एक महिन्याचे २,२०० अन्नधान्याच्या किटचे वाटप केले आणि दिलासा दिला. तसेच कोरोना ‘लॉकडाऊन’काळात कोणीही उपाशी राहू नये, याकरिता शहरातील ज्या रेशन कार्डधारकांना रेशन मिळण्यात अडचणी येत होत्या, त्या रेशन कार्डधारकांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले.

 



कोरोना संसर्गजन्य कालावधीत नागरिक, पर्याय नसल्याने भाजीपाला आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडायला लागले. हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरले असते. त्यामुळे या काळात जेवढी गर्दी कमी करता येईल, त्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक होते, म्हणूनच नागरिकांनी भाजीपाला आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी घराबाहेर न पडता, त्यांनाच त्यांच्या दारी भाजीपाल्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आ. जगताप यांनी केले. त्याअंतर्गत ‘भाजीपाला आपल्या दारी’ हा सामाजिक उपक्रम राबवून शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला, किराणा साहित्याचा पुरवठा करण्यात आला, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षावाल्यांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात आमूलाग्र योगदान आहे ते बांधकाम मजुरांचेही. त्यामुळे शहरात अडकून पडलेल्या बांधकाम मजुरांनीही आ. जगताप यांनी मदतीचा हात दिला. शहरातील इमारत बांधकाम मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यात आले. कोरोनाच्या उपचाराकरिता जगताप यांच्या आमदार निधीतून एकूण ५० लाख रुपयांच्या वैद्यकीय सामग्रीचा पुरवठाही करण्यात आला. तसेच जिल्हा रुग्णालयास ४७ लाख रुपयांचे व्हेंटिलेटर व तीन लाख रुपयांचे सॅनिटायझरदेखील उपलब्ध करण्यात आले. शिवाय कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपामध्ये मोफत मास्क पुरविण्यात आले. त्यामुळे आ. लक्ष्मण जगताप यांनी सर्व पातळीवर, स्तरावर व्यापक मदतकार्य हाती घेतले आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. त्यांच्या या मदतकार्याला सलाम!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची