‘केशव’दूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

keshav gholave_1 &nb


कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात गरीब कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत भाजपचे पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक आणि उपमहापौर केशव घोळवे यांनी माणुसकीच्या नात्याने मास्क, सॅनिटायझर वाटप केले. तसेच अन्नदान, औषध वितरणाची मदत प्रभागासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक ठिकाणी केली. त्यांनी हाती घेतलेल्या मदतकार्यामुळे अनेकांना आधार मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख...


केशव हनुमंत घोळवे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगसेवक/उपमहापौरप्रभाग क्र.: १०, शाहूनगर, पिंपरी-चिंचवड
संपर्क क्र. : ९८८१२५७९२५


कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो गरीब, मजूर कामगार, रोजंदारीवर काम करणारे पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला. परिणामी, समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धाव घेणार्याव उपमहापौर केशव घोळवे यांनी मदतीचा हात पुढे केला. यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची उत्तम साथ मिळाली. सुरुवातीला गरजवंतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे केशव घोळवे यांनी ठरविले, जेणेकरून कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. शक्य तेवढी आणि मागेल त्या प्रत्येकाला मदत करण्याचे निश्चित केल्याने घोळवे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीदेखील आपली निःस्वार्थीपणाची सेवा दिली. संपूर्ण प्रभाग, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात मदत पोहोचावी, यासाठी दक्षता घेतली. मदत केलेल्यांमध्ये बहुतांश हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे वृत्तपत्रविक्रेते, महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि मराठीजनांबरोबरच अन्य राज्यातील स्थलांतरित झोपडपट्टीवासीयांचाही समावेश होता.



प्रभागांमध्ये आणि अन्य ठिकाणी ज्यांची जेवणाची सोय नव्हती, अशा प्रत्येकाला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था गोळवे यांनी करून दिली. कोणीही उपाशी राहू नये व प्रत्येकाला अन्न मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. जवळपास दररोज चार हजार लोकांपर्यंत दोन वेळेच्या जेवणाची पाकिटे लोकांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोळवे पोहोचवित होते. ज्या ठिकाणी अन्न पोहोचविणे शक्य नव्हते, त्या ठिकाणी रेशन किटचेदेखील त्यांनी वाटप केले. रेशन किटचे वाटप करताना ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्याचेही घोळवे यांनी ठरविले व त्याप्रमाणे जवळपास ३०० ज्येष्ठ नागरिकांना ते दिले. ही सर्व मदत करताना वायसीएम हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचार्यांवनाही फळांचे वाटप करण्यात आले. काम करताना दवाखान्यात जीव धोक्यात घालून काम करणार्यार आरोग्य कर्मचार्यां ची गैरसोय होऊ नये, म्हणून परिसरातील आरोग्य कर्मचार्यांाची सतत दोन महिने भोजनाची व्यवस्था महिला बचतगटाच्या माध्यमातून गोळवे यांनी केली. या सर्व कामांमध्ये अनेक कार्यकर्ते निःस्वार्थीपणे केशव घोळवे यांच्याबरोबर काम करत होते.


अन्नधान्य रेशन किटचे विनामूल्य वितरण करताना प्रभागातील जवळपास २५० गृहनिर्माण संस्थांना स्वस्त दराने भाजीवाटपाचे कामही केशव घोळवे यांनी केले. पिंपरी-चिंचवडकरांच्या सोईसाठी व सुरक्षेसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे अंतर राखून प्रत्येकाच्या हातात सॅनिटायझर देऊन कोरोना रोखण्याविषयी जनजागृतीही त्यांनी या माध्यमातून केली.प्रभागातील अनेक सोसायट्यांमध्ये त्यांनी जंतुनाशक फवारणी करून घेतली. प्रभागांमध्ये जर कोणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी दोन वेळा जंतुनाशक फवारणी करून तो परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नही केशव घोळवे यांनी केले. एखादा रुग्ण आढळल्यास त्या व्यक्तीला बेड उपलब्ध करून देऊन त्याची विचारपूस डॉक्टरांच्या माध्यमातून करून घेतली जायची, तसेच त्याच्या कुटुंबीयांना रेशन देऊन त्यांना मानसिक आधारही या काळामध्ये दिला. प्रभागामध्ये कामानिमित्त, व्यवसायानिमित्त अनेक लोक परिसरात राहतात. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना घरी जाणे अशक्य होते, त्यावेळेस सर्व नियमावली पाळून महानगरपालिकेच्या अधिकार्यांपच्या माध्यमातून त्यांना ई-पास उपलब्ध करून दिले. त्यांना गावी जाण्यासाठी बसेसचीही सोय करुन देण्यात आली. दरम्यान, ‘लॉकडाऊन’मुळे नियमित व्यवहार ठप्प पडल्याने रक्ताची आवश्यकता असणार्याय अन्य आजारांच्या रुग्णांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. रक्तपेढ्यांकडील रक्तसंकलन कमी झाले व रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली. हे लक्षात घेता, उपमहापौर केशव घोळवे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५० लोकांनी रक्तदान केले. यात अनेक कार्यकर्त्यांनी आपली समाजाप्रतिची सेवा म्हणूनही रक्तदान केले व या रक्तसंकलनाने इतर आजारांच्या रुग्णांनाही रक्त उपलब्ध झाले.

keshav gholave_1 &nb



मी गेली अनेक वर्षे समाजकार्य करत असल्यामुळे मला पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांनी उपमहापौरपदापर्यंत पोहोचविले. समाजातील तळागाळातील वंचित, शोषित लोकांचे प्रश्न समजून घेऊन यापुढे काम करणार आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोेचण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन.


प्रभागांमध्ये व अन्य ठिकाणी मास्कचे मोफत वाटपही करण्यात आले. काही ठिकाणी सॅनिटायझरचेही मोफत वाटप करण्यात आले. अनाथाश्रमातील लोकांची पूर्ण खबरदारी घ्यावी म्हणून त्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात आली.शहरातील हातगाडी, रिक्षावाले व रोजंदारीवर काम करणार्या. सर्व लोकांचे आर्थिक गणित बिघडले होते, त्यांनाही रेशन पुरविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. प्रभागांमधील अनेक सोसायट्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी कचरापेटीचेही वितरण केले. प्रभागातील नाले, गटारे साफ करण्यासाठी केशव घोळवे यांनी स्वतः पुढाकार घेतला.कोरोनाव्यतिरिक्त प्रभागांमध्ये अनेक समाजोपयोगी कामेही हाती घेतली. यामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रमही झाले आहेत. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले होते. अशा प्रभागातील विविध उपक्रमांना नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे सर्व काम करत असताना, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये समाजाप्रतिची सेवा म्हणून आपला सहभाग नोंदविला. काम करत असताना ज्या लोकांना प्रामाणिक गरज होती, त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर एक प्रकारचे समाधान या कामातून मिळाले.उपमहापौर केशव घोळवे यांना मदतकार्य करताना गरजूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यांच्या मनात आपल्यासाठीही कोणीतरी झटत असल्याचा विश्वास निर्माण झाला, तर कोरोना आपत्तीचा काळ कोणीही विसरू शकत नाही. मात्र, यात समाजातील माणुसकीचे दर्शन झाले व माणुसकी यापुढेही दिसली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@