खांदा कॉलनीतला खमका नगरसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Eknath Gaikwad _1 &n
 
 
 
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१५ चे नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात आपले योगदान दिले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...





एकनाथ रामदास गायकवाड
 
राजकीय पक्ष : भाजप, पनवेल खांदा कॉलनी विभागीय अध्यक्ष
 
पद : नगरसेवक
 
प्रभाग क्र. : १५
 
संपर्क क्र. ९८२०४२९२९६
 
 
 
 
कोरोना सुरू झाल्यावर सुुरुवातीचे काही दिवस नगरसेवक एकनाथदादा गायकवाड हे स्वत: आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केले. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. आ. प्रशांत ठाकूर यांनी आपल्याला नेहमी उपयोगी पडणार्‍यांची यादी तयार करण्यास सांगितली. त्याप्रमाणे यादी तयार केली. त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप सुरू केले.
 
 
 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप केले. खांदा कॉलनीतील प्रत्येक सोसायटीत जाऊन तेथे सॅनिटायझरची फवारणी केली. याशिवाय आदिवासीवाडी आणि झोपडपट्टीतही जंतुनाशकाची तीन वेळा फवारणी करून घेतली. खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील सकाळच्या वेळेत कामावर येणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना घरून लवकर निघावे लागते. पोलीस स्टेशनला आल्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून १०-१२ तास कोठेही ड्युटी करावी लागते. यावेळी त्यांना जेवण मिळत नाही. हॉटेल बंद असल्याने खायलाही मिळत नाही. त्यांची अडचण लक्षात आल्यावर नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांना रोज नाश्ता देण्यास सुरुवात केली.
 
 
 
  
खांदा कॉलनीतील नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांना त्यांचा शेख नावाचा कार्यकर्ता ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे समजले. त्याला रुग्णालयात बेड मिळत नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने दादांनी महापालिकेच्या उपायुक्तांना फोन केला. रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून त्याला उपजिल्हा रुग्णालयात बेड मिळवून दिला. दुसर्‍या दिवशी त्याची परिस्थिती खालावली, पल्स मिळत नसल्याने त्याला आयसीयूची गरज होती. उपजिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने चेतन गायकवाड यांना फोन केला. त्यांनी दुपारी १ वाजल्यानंतर आयसीयू बेड उपलब्ध करून दिला. पण, त्याचा मृत्यू झाला. आपला चांगला कार्यकर्ता कोरोनामुळे गेल्याचे दुःख दादांना झाले.
 
 
 
 

Eknath Gaikwad _4 &n
  
 
"खांदा कॉलनीत कोरोनामुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे मी, सर्वांना विनंती करतो की, आपल्या केंद्र सरकारने आपल्याला जे नियम घालून दिले आहेत, त्याचे लोकांनी पालन करावे. व्यापार्‍यांनीही ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करावे. शासनाचे नियम हे आपल्या चांगल्यासाठी आहेत."
 
 
 
 
खांदा कॉलनी सेक्टर ७ मध्ये असलेल्या मंगल ट्रस्टच्या मुलींच्या वसतिगृहात असलेल्या मुलींना मदतीची गरज असल्याचे समजल्याने नगरसेवक एकनाथदादा गायकवाड त्या ठिकाणी गेले असता, त्या मुलींची अवस्था बिकट होती. त्या ठिकाणी त्यांना खायला काही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आ. प्रशांत ठाकूर यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी धान्याचे किट पाठवून दिले. त्यामुळे मुलींची जेवणाची सोय झाली. त्यावेळी जागामालकाला भाडेही दिले नसल्याने जागामालक जागा खाली करायला सांगत होता. कोरोनामध्ये या मुली कुठे जाणार, म्हणून ही माहिती प्रशांत ठाकूर यांना दिली. त्यांनी मालकाला जागेचे भाडे देण्याची व्यवस्था केल्याने त्या २५ मुलींना तेथे सुरक्षित राहता आले.
 
 
 
 

Eknath Gaikwad _2 &n 
 
 
 
 
नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांना घरातून त्यांच्या या कामात चांगले सहकार्य होते. मनोहर व सचिन हे भाऊ या कामात मदत करीत होते. त्यांच्या पत्नीचीही चांगली साथ होती. ती दादांना, “तुम्ही चांगले काम करीत आहात, हे पुण्याचे काम आहे. पण, तुम्ही स्वत:ही काळजी घ्या,” असे नेहमी सांगायची. चंदा महाडिक, संजय कांबळे, अनीता रासकर, प्रमिला यादव, जांभळे, गोपीनाथ मुंढे, मोतीराम कोळी, पवार आणि भाजपचे युवा अध्यक्ष, असे अनेक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मदत करीत होते. दादा स्वत: ‘पॉझिटिव्ह’ झाले, त्यावेळी दवाखान्यात रुग्णाची श्वास घेताना होणारी अवस्था पाहिल्यावर त्यांना जाणीव झाली की, लोकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
 
 
 
 
त्यावेळी बरे झाल्यावर त्यांनी कोरोनासाठी लोकांची जागृती करायला सुरुवात केली. त्यासाठी महापालिकेच्या आणि आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांची त्यांनी मदत घेतली. त्यांच्या या कोविडकाळातील मदतीने कित्येकांचे जगणे निश्चितच सूकर केले.खांदा कॉलनीत कोरोनामुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाला. त्यांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे मी, सर्वांना विनंती करतो की, आपल्या केंद्र सरकारने आपल्याला जे नियम घालून दिले आहेत, त्याचे लोकांनी पालन करावे. व्यापार्‍यांनीही ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करावे. शासनाचे नियम हे आपल्या चांगल्यासाठी आहेत.




 
- नितीन देशमुख

@@AUTHORINFO_V1@@