समाजयोद्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

१ _1  H x W: 0


कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अजय बहिरा यांनी प्रभाग क्र. २० मध्ये आपले योगदान दिले. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे एकूण अनेकांना मदतीची गरज होती. ही बाब ओळखून त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत या प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...


नाव : अजय तुकाराम बहिरा

राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष

पद : नगरसेवक

प्रभाग क्र. : २०

संपर्क क्र. : ९८१९७१५६५७ 

 
 
 
 
‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर अजय बहिरा यांचा कोरोना रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यावेळी ते स्वत: १५ दिवस दवाखान्यात होते. त्यांच्या कुटुंबातील चौघांनाही कोरोना झाल्यावर त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. घरीच काय, घराजवळूनही कोणी जायला घाबरायचे. अगदी वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती होती. यावेळी अभिजीत ढवण आणि त्यांचे मित्र घरी लागणारे सामान आणून देत होते. त्यांच्या पत्नीने यावेळी सगळी जबाबदारी स्वीकारून त्यांचे काम पुढे सुरू ठेवले.
 
 
या प्रसंगानंतर त्यांनी ठरवले की, ज्या घरात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण असेल, त्यांना मदत करायची. आजपर्यंत ते काम सुरू ठेवले आहे. ‘पॉझिटिव्ह’ रूग्णाच्या घरी फोन करून त्यांना काय हवे नको ते विचारून अजय बहिरा व त्यांचे कार्यकर्ते ते घरी पोहोचवतात. औषधाची फवारणी करून घेतात. लोक त्यांना म्हणतात, “तुम्ही अजून पूर्ण बरे झालेले नसताना कशाला ही कामे करता?” पण, कोरोनाने आपल्याला हे शिकवल्याचे अजय बहिरा सांगतात. त्यांच्या पत्नीचेही म्हणणे आहे की, “आपल्यावर जी वेळ आली, ती दुसर्‍यावर येऊ नये, यासाठी मदत करा.” त्यामुळे त्यांच्या पत्नीचाही या कामात त्यांना पाठिंबा होता.
 

१ २_2  H x W: 0 
 
 
 
 
"लोकांनी कोरोनाची भीती न बाळगता पनवेलमध्ये कोणतीही काळजी न घेता फिरण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता थंडी सुरू होईल. त्यामुळे आता कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे गाफिल न राहता आपली स्वत:ची आणि कुटुंबाची ही काळजी घ्या. कोणताही सण साजरा करताना फक्त कुटुंबाबरोबरच साजरा करावा."
 
 
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. २० चे नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांच्या प्रभागात मुख्यत: नवीन पनवेलमधील सेक्टर १५, १६, पोदी, काळुंद्रे आणि पनवेलमधील तक्का परिसर येतो. या भागात मच्छीविक्रेते, छोटे-मोठे धंदे करणारे आणि रोजंदारीवर काम करणार्‍यांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे शासनाने ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्यावर प्रभागातील अनेक लोकांचा रोजगार बंद झाल्याने रोज कमवून खाणार्‍या कुटुंबांची उपासमार होऊ लागली. त्यावेळी नगरसेवक अजय बहिरा या लोकांच्या मदतीला धावून गेले. अशा लोकांना धान्याच्या किट ज्यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, मीठ, गव्हाचे पीठ आणि कांदे-बटाटे असलेले आपल्या कार्यकर्त्यांमार्फत वाटप केले.
 
 
सोसायटीमध्ये राहणारे काही नागरिक नोकरी गेल्याने घरात काही नसल्याने अत्यंत वाईट अवस्थेत होते. त्यांच्या घरात खायला काहीच नव्हते, पण सोसायटीत चांगल्या घरात राहत असल्याने ते असे धान्याच्या किट घ्यायला येऊ शकत नव्हते. अशा लोकांची माहिती मिळाल्यावर नगरसेवक अजय बहिरा यांनी त्यांच्या घरी धान्याच्या किट्स नेऊन दिल्या. याशिवाय पक्षातर्फे ‘मोदी किचन’च्या माध्यमातून रोज २५० लोकांना जेवण दिले. आदिवासी वाडी, वैदू वाडी व तक्का गाव येथील २५०० लोकांनाही धान्याचे किट दिले. सोसायटीमधील सुरक्षा रक्षकांनाही सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.
 

१ २_2  H x W: 0 
 
 
तक्का परिसरातील गरीब मुस्लीम कुटुंबांना वैयक्तिक मदत केली. गरीब कुटुंबातील रुग्णांना औषधे पुरवण्याचे काम केले. पनवेल शहर मंडलला ७,५०० रुपये आणि महापौर निधीला दोन महिन्याचे मानधन दिले. ख्रिश्चन संस्थेकडून ३०० किट मिळवून त्याचे आदिवासींना वाटप केले. प्रभाग क्रमांक २०च्या बाहेर राहणार्‍या काही कुटुंबांनाही त्यांनी मदत केली. कोरोना काळात मुस्लीम समाजाचे रमजानचे रोजे होते. यावेळी ८० मुस्लीम कुटुंबांना रोजे सोडण्यासाठी फळांचे वाटप केले. शरद जोशी, शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, हरून शेख, मुकेश बहिरा यांनी मदत केली. महापालिकेच्या कर्मचार्‍यांनाही सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.
 
 
एक दिवस त्यांना जेवण दिले. कोरोनापासून सुरक्षा म्हणून आतापर्यंत एक हजार मास्कचे वाटप, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सॅनिटायझरचे वाटप, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून १२०० बॉटल्स ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. अनेक लोकांना कोरोना चाचणीबाबत काही माहिती नव्हती, किती पैसे लागतील, याची भीती वाटायची. त्यांची महापालिकेतर्फे टेस्ट करून घेण्यास मदत केली. रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करीत आहेत. तेव्हा, अजय बहिरा यांच्या या सेवाकार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
 

- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@