मदतीचे ‘भुज’बळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Manoj Bhujbal _1 &nb
 

 
 
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग १७ चे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी कोरोनाकाळात मदतकार्य हाती घेतले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. यावेळी त्यांनी उत्कर्ष कला क्रीडा मंडळ व स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 

अ‍ॅड. मनोज कृष्णाजी भुजबळ
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,
भाजपप्रणित अखिल भारतीय अधिवक्ता परिषद तालुका अध्यक्ष
प्रभाग क्र.: १७, नगरसेवक, पनवेल मनपा
संपर्क क्र. : ९८२०४६२६२९
 
 
 
 
कामोठ्यातील एका ज्युनिअर महिला वकिलाच्या वडिलांना कोरोना झाल्यानंतर बेडची आवश्यकता होती. ती आणि तिचा छोटा भाऊ अनेक ठिकाणी फिरले. पण, त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. अ‍ॅड. मनोज भुजबळ वकील संघटनेचे अध्यक्ष असल्याने तिने रात्री १.३० वाजता त्यांना फोन केला. “साहेब, माझ्या वडिलांना बेड मिळत नाही, काही तरी करा.” नगरपालिकेचे अधिकारी शेटये यांच्यामार्फत खारघर येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये त्यांना बेड मिळवून दिला. त्यांना बरे वाटल्यावर तिचा फोन आला. तिने, “पप्पा, पप्पा साहेबांशी बोला,” सांगितले. त्यावेळी त्या मुलीला तिचे वडील मिळाल्याचा झालेला आनंद मोठा होता. तिच्या वडिलांनी, “तुम्ही, आम्हाला मदत केलीत म्हणून मी आज आहे,” सांगून, मनोज भुजबळ यांचे आभार मानले. हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचे ते सांगतात.
 
 
नवीन पनवेलमधील भुजबळ कुटुंब हे नेहमी लोकांच्या अडीअडचणीला, मदतीला धावत असते. भारतीय जनता पक्षाचे काम करायला लागल्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हे समाजाला नेहमी मदत करण्यासाठी धडपडणार्‍या व्यक्ती आहेत. आपले नेतृत्व जर लाखो रुपये खर्च करीत असतील, तर आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेने अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी कोरोनाकाळात लोकांना आपल्या ‘उत्कर्ष कला क्रीडा मंडळा’मार्फत आणि स्वत: मदतीला सुरुवात केली. त्यांच्या प्रभागात आठ झोपडपट्ट्या येतात. तेथील लोकांचा रोजगार बंद झाल्याने त्यांचे खायचे वांदे झाले होते. सुरुवातीला त्यांना जेवण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर किराणा सामानाच्या किटचे वाटप केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या गोळ्यांचे १२ हजार लोकांना वाटप केले.
 
 

Manoj Bhujbal _3 &nb 
 
 
 
"कोरोनावर लस सापडली असे सांगितले जात असले, तरी प्रत्येकाची कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञच साशंक आहेत म्हणून भविष्यात प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे आवश्यक आहे."
 
 
 
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील एका मोठ्या सोसायटीतील टूबीएचकेमध्ये राहाणारे कुटुंब. घरात नऊ वर्षांच्या छोट्यापासून ९० वर्षांच्या पणजीपर्यंतची सहा माणसे, पतीचे निधन झाल्याने घरात कर्ता पुरुष नाही. ती, तिची दोन लहान मुले, सासू, सासरे आणि ९० वर्षांची आजेसासू. ती खासगी शाळेत नोकरी करून घर चालवते. कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’मुळे पगार नाही, घरात खायला काहीच नाही. मोठ्या सोसायटीत राहत असल्याने मदत कोण देणार आणि मागायची कशी, असा प्रश्न तिच्यापुढे पडलेला. अखेर दोन लहान मुलांची आणि सासू-सासर्‍यांची अवस्था पाहून तिने आपल्या एका सहकारी मैत्रिणीला परिस्थिती सांगून मदत मागितली. ती सहकारी मैत्रीणही ‘लॉकडाऊन’मुळे नवी मुंबईत अडकली होती. नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना त्याची माहिती मिळताच त्यांनी पाठविलेली मदत पाहून तिचे डोळे पाणावले.
 
 
 
 
पनवेल तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष असल्याने ज्युनियर वकिलांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांचे होणारे हाल पाहून, बार कौन्सिलकडून तीन वेळा किट मागवून अशा गरजवंत वकिलांना त्याचे वाटप केले. कमी पडले, तेव्हा स्वत: खरेदी करून ४०-४५ वकिलांना दिले. आजूबाजूच्या चाळीत राहाणार्‍यांना औषधासाठी मदत तर दिलीच; पण विजेचे बिल भरले नाही म्हणून विजेचे कनेक्शन तोडायला आल्यावर वीजबिल भरण्यासाठीही पैसे दिले. जो गरजवंत आला, तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या प्रभागातील आहे किंवा परप्रांतीय आहे का, असा कुठलाही विचार न करता त्यांनी मदत केली. परप्रांतीय मजुरांना गावाला जाण्यासाठी पोलीस स्टेशनमधून पास काढून देण्यासाठी लागणारे फॉर्म भरून देण्याची आपल्या कार्यालयात सोय केली.
 
 
 
 

Manoj Bhujbal _2 &nb 
 
 
 
 
नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या पत्नी प्रीती, दोघे बंधू, पुतण्या अ‍ॅड. प्रशांत भुजबळ आणि पुतण्याची पत्नी अ‍ॅड. सुरेखा यांना कोरोना झाला. त्यांचे धडधाकट असलेले मोठे बंधू अशोक भुजबळ आठ दिवसांत कोरोनामुळे गेले. त्यावेळी आपण सतत बाहेर फिरत असल्यामुळे तर कोरोना आपल्या घरात आला नाही ना, अशी शंका त्यांना वाटत राहिली. पण, घरातील कोणीही त्यांना काम करायला अडवले नाही, तर ते नसताना कोणी मदत मागायला आले तर मदत करीत होते. त्यांचे चालक दिलीप गोरे व बेंजामीन खराडे, पुतण्या राकेश भुजबळ, अजित लोंढे, किशोर शिंदे, क्रांती चितळे, देवीदास भुजबळ आणि अ‍ॅड. प्रशांत भुजबळ हे त्यांना सतत मदत करीत होते. त्यांच्याबरोबर सगळीकडे जात होते. या कामात त्यांना शासकीय अधिकारी, महापालिका अधिकारी आणि पोलिसांचे नेहमीच चांगले सहकार्य मिळाले.
 
 
 
कोरोनाकाळात बेड उपलब्ध होत नसल्याने ज्यांची कोठे ओळख नव्हती, असे सामान्य कुटुंबातील रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत होते, त्यांची या रुग्णालयांनी लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करताना त्यांनी ‘महात्मा फुले जन आरोग्यसेवे’चा लाभ भविष्यात केशरी कार्डधारकांना घेता यावा, यासाठी त्यांची नोंदणी करून त्यांना या योजनेचे कार्ड काढून देणार असल्याचे सांगितले.
 

- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@