‘राम’कृपा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

RAMJI _1  H x W
 
 
 

कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रामजी बेरा यांनी प्रभाग क्रमांक ५, खारघर परिसरामध्ये आपले योगदान दिले. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे गरीब कुटुंबांवर भीषण परिस्थिती उद्भवली. यावेळी बेरा यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
नाव : रामजी गेला बेरा
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : नगरसेवक, पनवेल मनपा
प्रभाग क्र. : ५, खारघर
 
 
 
 
 
पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर परिसर हा उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांची ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखला जात असला, तरी या परिसरात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे आहेत. कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्यावर, या लोकांचा रोजगार बंद झाला. त्यामुळे रोज कमवून खाणार्‍या कुटुंबांची उपासमार होऊ लागली. यावेळी अनेकजण प्रभाग ५ मधील नगरसेवक रामजी बेरा यांना भेटून ‘आमच्यासाठी काही तरी करा, आम्हाला मदत मिळवून द्या’ म्हणून विनंती करू लागले. त्यावेळी रामजी बेरा यांनी त्यांना स्वत: धान्य वाटप केले.
 
 
 
नगरसेवक रामजी बेरा यांनी आपले कार्यकर्ते आंबाभाई पटेल, दीपक शिंदे, अनिल साबणे, रमेश पटेल, वालजी पटेल आणि इतरांमार्फत खारघरमधील सेक्टर १२ मधील सोसायटीतील गरीब आणि गरजू नागरिकांची माहिती गोळा केली. त्यांना एकाच वेळी न बोलवता, प्रत्येकाला वेळ देऊन त्या ठिकाणी जाऊन मदतीचे वाटप केले. सेक्टर १३ मध्ये मजुरी करणारे आणि घरकाम करणार्‍या महिला मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांना सोसायटीत प्रवेश बंद केल्याने त्यांचे काम बंद झाले होते. त्याचा परिणाम त्यांना घरात खायचे वांदे झाले होते. अशा लोकांना धान्याच्या किट ज्यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, मीठ, गव्हाचे पीठ आणि कांदे-बटाटे असलेले आपल्या कार्यकर्त्यांमार्फत वाटप केले.
 
 

RAMJI _4  H x W 
 
“रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी कोरोनामध्ये लोकांना मदत करण्याचे काम केले. मला कोरोना झाल्यावर लोकांच्या वेदना समजल्या. त्यामुळे लोकांनी बाजारपेठ सुरू झाल्यावर केलेली गर्दी पाहून असे वाटते की, कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी लोकांनी अजूनही मास्क वापरणे आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे गरजेचे आहे.”
 
सोसायटीमध्ये राहणारे काही नागरिक नोकरी गेल्याने घरात काही नसल्याने अत्यंत वाईट अवस्थेत होते. त्यांच्या घरात खायलाही काहीच नव्हते. पण, सोसायटीत चांगल्या घरात राहत असल्याने ते असे धान्याच्या किट घ्यायला येऊ शकत नव्हते. अशा लोकांची माहिती मिळाल्यावर नगरसेवक रामजी बेरा यांनी स्वत:च्या गाडीतून धान्याच्या किट नेऊन त्यांना दिल्या. याशिवाय कोरोनापासून सुरक्षा म्हणून एक हजार मास्कचे वाटप, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून १२०० बॉटल्स ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. याशिवाय त्यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीला दिले.
 

RAMJI _3  H x W 
 
 
 
रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना तयार अन्न देण्याचे काम केले जात होते. त्याचा जवळपास १ लाख, २० हजार नागरिकांना लाभ झाला. खारघरमध्ये भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, अभिमन्यु पाटील, वासुदेव पाटील, कीर्ति नवघरे यांच्यासोबत त्यांनी ‘मोदी किचन’ची व्यवस्था सांभाळली होती. नगरसेवक रामजी बेरा यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील, पत्नी, पाच भाऊ आहेत. या सर्वांचा त्यांना या कामात सहकार्य आणि पाठिंबा होता.
 
 
- नितीन देशमुख


RAMJI _2  H x W
@@AUTHORINFO_V1@@