‘कोशिश’ - एक आशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |
11_1  H x W: 0
 
 
पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत हजारो नागरिकांना मदत केलीच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमालाही महत्त्व दिले. कोरोनाकाळात लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी ‘कोशिश फाऊंडेशन’च्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
नाव : परेश रामशेठ ठाकूर
 
पक्ष : भाजप
 
पद : सभागृहनेता, पनवेल मनपा
 
संपर्क क्र. : ७०४५००००००

 
 
“महापालिकेचा कामगार गुरव कोरोनामुळे मयत झाला, त्यावेळी दवाखान्यात फोन करून त्याची माहिती घेतली असता, तो कोरोना सुरू झाल्यापासून काम करीत होता. त्याला कोरोना झाला. तो बरा झाल्यावर मनुष्य स्वभावाप्रमाणे जबाबदारीपासून न पळता माणसे कमी आहेत समजल्यावर तो पुन्हा कामाला आला. अनेक जण अडचणीचा गैरफायदा घेत असतात. जास्त पैसे मागतात. अशावेळी गुरवने कोणताही विचार न करता तो पुन्हा कामाला आला. अशा चांगल्या व्यक्तीला मदत केल्यास सकारात्मकता वाढायला मदत होते म्हणून मी, मदत करायला पुढे आलो,” असे सभागृह नेते परेश ठाकूर सांगतात.
पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी कोरोना व ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत पनवेल महानगरपालिका हद्दीत नागरिकांना मदत केलीच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कौशल्य विकास’ कार्यक्रमालाही महत्त्व दिले आहे. कोरोनाकाळात लोकांना मदत करतानाच त्यांना रोजगार उपलब्ध करून कसा देता येईल, यासाठी ‘कोशिश फाऊंडेशन’ म्हणजेच परेश ठाकूर पब्लिक रिलेशन ऑफिसच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.
 
 
रामशेठ ठाकूर विकास मंडळामार्फत लोकांसाठी काम करताना लोकांना भौतिक वस्तू पुरविण्यापेक्षा त्या मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये यावे, यासाठी प्रयत्न ठेवला होता. नगरसेवक झाल्यावर परेश ठाकूर पब्लिक रिलेशन ऑफिस सुरू केले. त्यामार्फत तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. कोरोनामध्ये तरुणांमध्ये भौतिक वस्तू मिळविण्याचे सामर्थ्य यावे, यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कारण या काळात तुम्हाला बोलता येणे, आपले विचार पटवून आपल्याबरोबर इतरांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक असते.
 
 
 
नेतृत्व करून आपल्याला दिलेले काम व्यवस्थित करून आपल्या बरोबरच्यांकडून त्यांना दिलेली कामे व्यवस्थित करून घेणे गरजेचे असते. उद्योजकता विकास झाल्याने मराठी माणूस उद्योजक झाला तर त्यामुळे चार जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, त्यामुळे रोजगार वाढतो. यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रात विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होतो. जनजागृती होते. सेमिनार आणि कार्यशाळेपूर्वी संबंधित व्यक्तीने काही कला-कौशल्य अगोदरच आत्मसात केले, तर त्याचा त्याला फायदा होऊ शकतो. कार्यशाळेच्या माध्यमातून त्याचे नेतृत्वगुण विकसित होऊ शकतात. यासाठी रामशेठ ठाकूर विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष आणि ‘कोशिश फाऊंडेशन’च्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर, अ‍ॅड. चेतन जाधव, चिन्मय समेळ, मयूरेश नेटकर व इतर तरुण कार्यकर्ते काम करीत आहेत.
 
 
“आपल्याला यापुढे कोरोनासोबतच जगायला शिकायचे आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे करताना कोरोना अजून आहे याचे भान ठेवून ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे गरजेचे आहे. ज्यांनी आम्हाला कोरोनामध्ये मदत करण्यासाठी सहकार्य व प्रोत्साहित केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो.” कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जगभर थैमान घातले असताना, युवा नेते परेश ठाकूर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक कोणतीही नसताना अन्नधान्य, अन्नछत्र, मास्क, सॅनिटायझर, रक्तदान शिबिराचे आयोजन, रोगप्रतिकारक शक्ती औषधे, यासोबतच गावी जायला लोकांना मदत केलीच. ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणार्‍यांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम सामाजिक बांधिलकीतून परेश ठाकूर यांनी केले. एक लाखांहून जास्त गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्याबरोबरच ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना तयार अन्न देण्याचे काम केले. त्याचा जवळपास एक लाख 20 हजार नागरिकांना लाभ झाला.
 
 
खारघरमध्ये भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, कीर्ती नवघरे हे ‘मोदी किचन’ची व्यवस्था बघत होते. विशेषत: महिला कार्यकर्त्या स्वत: भाजी कापण्यापासून सगळी कामे करीत होत्या. त्याठिकाणी जेवणाचा दर्जा उतम असल्याने दोन-दोन तास आधीच रांगा लागत होत्या. लोकांचाही प्रतिसाद उत्तम होता. अनेक जण काम करण्यासाठी पुढे येत होते. कोरोनाकाळात रक्ताची गरज लक्षात घेऊन, रक्तदान शिबिरांचे आयोजन, 80 हजार लोकांना मास्क तसेच सॅनिटायझर आणि तेवढ्याच संख्येने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या ‘आर्सेनिक अल्बम-30’ च्या जवळपास 80 हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
 
 
पनवेल महापालिकेचे सभागृहनेते म्हणून ते जबाबदारीने काम करीत असून, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रायगड जिल्हा जलतरण संघटना, अशा विविध संस्था-संघटना माध्यमातून राबविले जाणारे सामाजिक उपक्रम, मेळावे, पक्षबांधणी त्याचबरोबर विविध कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. ते सर्व कार्यक्रम-समारंभाचे नियोजन कौशल्य पद्धतीने हाताळत असतात म्हणून हे सर्व कार्यक्रमे यशस्वी होण्यात परेश ठाकूर यांचा मोलाचा सक्रिय सहभाग असतो.
 
 
राज्यस्तरीय एकांकिका अटल करंडक, मॅरेथॉन, काव्यसंध्या, दिवाळी पहाट, मल्हार महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक तसेच कला, क्रीडा, आरोग्य महाशिबीर, हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असताना यामध्ये परेश ठाकूर यांचे उत्तम नियोजन असते. युवकांसाठी ते सातत्याने विविध उपक्रम हाती घेत त्यांना प्रोत्साहन देत असतात. सामाजिक न्याय आणि संपूर्ण समाजाला सशक्तीकरण करण्याच्या मुख्य उद्दिष्टासह युवानेते परेश ठाकूर नेहमीच कार्यरत असतात. त्यांच्या कार्यातून सर्व जाती-धर्मातील लोकांच्या विकासाचा विचार दिसून येतो. त्यामुळे लोकांवर आलेले संकट आपले मानून ते सतत मदत करीत असतात.


- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@