लोकसेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |
Nitn Patil _1  
 
 
 
 
कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांनी समाजकार्य केले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 
 
 
नाव : नितीन जयराम पाटील
 
राजकीय पक्ष : भाजप
 
पद : पनवेल शहर सरचिटणीस
 
प्रभाग : पनवेल महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक
 
संपर्क क्र. : ९३२१२१२९१९
 
 
 
कोरोना सुरू झाल्यावर पहिले १५ दिवस नगरसेवक नितीन पाटील हे स्वत:देखील घरातच होते. पण, आ. प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केले. त्यावेळी नितीन पाटील यांनी घराबाहेर पडून लोकांना मदत करायला सुरुवात केली. पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. आ. प्रशांत ठाकूर यांनी आपल्याला नेहमी उपयोगी पडणार्‍यांची यादी तयार करण्यास सांगितली. त्याप्रमाणे यादी तयार केली. त्यांना अन्न-धान्याच्या किटचे वाटप सुरू केले.
 
 
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. रुग्णालयात गरम पाण्याच्या किटल्या कमी पडत असल्याचे समजल्यावर त्यांनी विविध रुग्णालयांना अशा ५० किटल्या दिल्या. नगरसेवक नितीन पाटील यांचे शालेय शिक्षणही पनवेलमध्येच झाल्याने त्यांचे अनेक मित्र पनवेलमध्ये आहेत. त्यातील काही नोकरी-व्यवसाय करतात, तर काही रिक्षा चालवतात. रिक्षाचालक आणि व्यवसाय करणार्‍यांचे एकाएकी उत्पन्न बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबांची अवस्था बिकट होती. त्यांची माहिती घेऊन त्यांना नितीन पाटील यांनी मदत केली. त्यावेळी त्यांना अनेक सोसायट्यांमध्ये माहिती घेत असताना एका सोसायटीमध्ये वन बीएचकेमध्ये राहणारी व्यक्ती इलेक्ट्रिशियनचे काम करायची. पण, ‘लॉकडाऊन’मुळे हाताला काम नसल्याने त्यांच्या घरात रोजच्या जेवणाचेही वांदे झाले होते.
 
 
 
 
 

Nitn Patil _2   
 
 
 
“आरोग्य विम्याबाबत जागृती करून लोकांना ती पॉलिसी काढण्यास मदत करणार आहे. याशिवाय शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याबाबत लोकांना माहिती देणे, केशरी कार्ड असून मदत मिळत नाही, तर महात्मा फुले योजनेचे कार्ड काढण्याची गरज असल्याची लोकांना माहिती नाही, आदींबाबत लोकांमध्ये जागृती करून त्यांना कार्ड काढण्यास मदत करणार आहे.“
 
 
 
मग काय, पाटील यांनी ताबडतोब त्या कुटुंबाला मदत पाठवून दिली. सोसाट्यांमध्ये राहणारी, रोजंदारीचे काम करणारी लोकं ज्यावेळी ‘मोदी किचन’ सुरू झाल्यावर जेवणासाठी रांगेत उभी राहायची, त्यावेळी त्यांना वाईट वाटायचे. दिसणारी गरिबी वेगळी; ती झोपडपट्टीमध्ये दिसते, पण सोसायटीमध्ये राहणारे सगळेच पैसेवाले नसतात, याची जाणीव कोरोनाने करून दिली. कळंबोलीचे सरचिटणीस राजेंद्र बनकर ‘मोदी किचन’मध्ये जेवण वाटायला असायचे. त्याठिकाणीच त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे निधन झाले. समाजकार्य करताना त्यांचा झालेला मृत्यू नगरसेवक नितीन पाटील यांच्या मनाला लागला.
 
 
 
कोरोनामध्ये लोकांना रुग्णालयांत दाखल होण्यासाठी सगळ्यात जास्त मदतीची गरज लागत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आ. प्रशांत ठाकूर यांना त्यासंबंधी माहिती गोळा करून कोणत्या रुग्णालयामध्ये किती रुग्णशय्या आहेत, याची यादी तयार करून दिली होती. त्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक केली होती. त्यांच्याशी संपर्क करून मदत मागायला येणार्‍याला बेड उपलब्ध करून देण्यास रात्री-अपरात्री नगरसेवक नितीन पाटील मदत करीत होते. तारा येथील संतोष पाटील यांची परिस्थिती गंभीर होती. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिल्यामुळे आज ते बरे झाल्याचे समाधान त्यांना आहे.
 
 
 
 
माजी नगरसेवक आप्पा तेरडे यांचे नवी मुंबईमध्ये कोरोनावर उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचा पत्ता पनवेलमधील असल्याने त्यांचे दहन करण्यास तेथून पनवेलला पाठवण्यात आले. पनवेल महापालिका त्याला परवानगी देत नव्हती. त्यांचा जावई नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडे आल्यावर त्यांनी महापालिकेतील अधिकार्‍यांना समजावल्यावर मध्यरात्री दहन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले. त्यांचे कार्यकर्ते महेश सरदेसाई, बाबू डिसोझा, च्ंद्रकांत पाटणे, विजय वाघ, प्रमोद वैत, प्रसाद कंधारे यांची त्यांना चांगली मदत झाली. कोरोना काळात नगरसेवक नितीन पाटील सकाळी घरातून बाहेर पडत ते रात्री उशिरा घरी परत येत. त्यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नीचीही साथ होती. आपला पती समाजकार्य करीत असल्याने त्यांनी कधीही याबाबत तक्रार केली नाही की त्यांना कधी अडवले नाही.
 
 
 
भविष्यात प्रत्येक कार्यकर्त्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असून कार्यकर्त्याने फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही, तर प्रत्येक वेळी कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी मदतीसाठी सज्ज असले पाहिजे. आपल्या भागातील सोसायटीतील लोकांचा डेटा त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. म्हणजे कोरोनासारखी आपत्ती आल्यास मदत करणे शक्य होईल, असे नगरसेवक नितीन पाटील यांना वाटते.



 
 
- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@