आहे ‘मनोहर’ म्हणूनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Manohar _3  H x
 




पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १४ चे नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात आपले योगदान दिले. कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यांवर परिणाम झाल्याने, अनेक कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

 
 
नाव : मनोहर जानू म्हात्रे
 
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
 
प्रभाग क्र. : प्रभाग १४, नगरसेवक, पनवेल मनपा
 
संपर्क क्र. : ९७६९५१०७७७

कोरोनामध्ये मदत करताना ती व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, याचा मनोहर म्हात्रे यांनी विचार केला नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते औषधे आणून देण्यापर्यंत सर्व कामे म्हात्रे यांनी केली. त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्तेही आपला नातेवाईक बरा झाल्यावर, ‘तू होतास म्हणून आज माझा भाऊ वाचला’ असे म्हात्रे यांना भेटून सांगत होते. त्यावेळी आपण केलेल्या कामाचे समाधान त्यांना वाटे. अशाप्रकारे मनोहर म्हात्रे यांनी कुठलाही भेदभाव न करता, सर्व रुग्णांना मदत केली. डॉक्टरांना सांगून बर्याच रुग्णांचे लाखो रुपयांचे हॉस्पिटलचे बिल कमी करून दिले. त्यानंतर बरा झाल्यावर तो रुग्ण मनोहर म्हात्रे यांना भेटून ‘तू होतास म्हणून मी वाचलो’ असे सांगत असे. त्यावेळेला आपल्या कष्टाचे चीज झाले, असे त्यांना वाटत असे.

 
  
 

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. १४चे नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे यांनी त्यांच्या वडिलांकडूनच समाजसेवेचा वसा घेतला. त्यांचे वडील पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. ते लोकांमध्ये जाऊन काम करायचे. त्यामुळे आपणही असे काम करावे, असे त्यांना पहिल्यापासून वाटायचे. कोरोना सुरू झाल्यावर सुरूवातीला नगरसेवक मनोहर म्हात्रे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. आ. प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता, बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केल्यावर आपल्या आजूबाजूच्या लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप सुरू केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझरचे वाटप, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप पोलीस ठाण्यामधील कर्मचार्‍यांना केले.

 
 

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या मोठ्या भावालाही कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला मिळणारी वागणूक ही वाळीत टाकलेल्या कुटुंबासारखीच होती. त्यांच्या घरी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना म्हात्रे यांच्याकडे जाऊ नका, असे सांगण्यात येत होते. एका कर्मचार्‍याला तर तिच्या घरमालकांनी म्हात्रे यांच्याकडे कामाला गेलीस, तर घर सोडून जावे लागेल, असेच सांगितल्याने ती कर्मचारी कामावर हजर राहू शकली नाही.

 


Manohar _2  H x 

"या महामारीच्या काळात लोकांनी स्वच्छता राखली पाहिजे. ‘सोशल डिस्टन्सिंग’, मास्क वापरणेही तितकेच आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे घेतली पाहिजे. स्वत:च स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे."

 

फक्त त्यांचे काही मित्रच घरी येत होते. त्यावेळी घर सांभाळायचे की प्रभागातील लोकांना मदत करायची, अशी द्विधा अवस्था झाली होती. मग त्यांनी आ. प्रशांत ठाकूर यांचा आदर्श घेऊन काम सुरू ठेवले. त्यांनी आपल्या भावाला प्रथम सामान्य नागरिकाप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या भावावर यापूर्वी शस्त्रक्रिया झालेली असल्याने डॉक्टरांनी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पालिकेच्या माजी स्थायी समितीचे अध्यक्ष असूनदेखील म्हात्रे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. डॉ. येमपल्ले यांनी म्हात्रे यांच्या भावाचे मागील अपघाताचे रिपोर्ट पाहून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रुग्णवाहिका मिळवतानाही मित्र आणि उपायुक्त संजय शिंदे यांनी मदत केल्याचे म्हात्रे सांगतात. अशाप्रकारे वेळीच उपचार मिळाल्याने म्हात्रे यांचा भाऊ आज सुखरुप आहे.

 
 

मनोहर म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाला या कोरोनाकाळात सहन कराव्या लागलेल्या यातना, त्यांना आजही अस्वस्थ करुन जातात. त्यामुळेच त्यांच्या पत्नीचा म्हात्रे यांच्या कामाला काहीसा विरोधही होता. पण, आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपले मदतीचे काम सुरूच ठेवले. यामध्ये त्यांना राकेश म्हात्रे, प्रवीण पाटील, विनोद भगत, सतीश पाटील, भास्कर भगत आणि रवींद्र पाटील हे कार्यकर्ते सतत प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असायचे.

 
 

खांदेश्वर रेल्वे स्थानकानहून ये-जा करण्यासाठी ४५० रिक्षा आहेत. हे बहुसंख्य रिक्षावाले मोठा खांदा आणि धाकटा खांदा गावातील रहिवासी. पण, ‘लॉकडाऊन’मुळे त्यांचा धंदा बंद असल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अनेकांना तर घरात खायलाही काही शिल्लक नव्हते. त्यांना प्रथम धान्याच्या किटचे वाटप केले. यावेळी तो स्थानिक आहे की भाडेकरू आहे, असा भेदभाव न करता, किटचे वाटप करण्यात आले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फतही आलेले किट त्यांना देण्यात आले.

 
 

Manohar _1  H x 
 
 

पोलीस कर्मचारी कोरोनाकाळात मोठा धोका पत्करून अहोरात्र कार्यरत होते. कामोठा, खांदेश्वर आणि पनवेल शहर पोलीस स्थानकामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटपही म्हात्रे यांनी केले. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण हॉस्पिटल आणि जनसेवा आश्रमात फळांचेही वाटप केले.

 
 

या काळात रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळत नव्हती किंवा मिळाली तरी त्यासाठी १०-१५ हजार भाडे आकारले जात होते. पण, बहुतांश नागरिकांना नोकरी-धंदा नसताना एवढे भाडे देणे शक्य नसायचे. त्यावेळी मनोज चव्हाण हे मात्र मनोहर म्हात्रे यांच्या शब्दांवर पाच-सहा हजारांत रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायचे. तसेच पक्षनेतृत्वाकडूनही म्हात्रे यांना नेहमीच चांगली मदत मिळत होती.

 
 
आ. प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेल्यास ते लगेच मदत करीत असत. शासकीय अधिकारी विशेषत: महापालिकेतील अनिकेत जाधव यांना कोणतेही काम सांगितले की, लगेच काम व्हायचे. डॉक्टरांची चांगली साथ मिळत होती. आशा सेविकांच्या कामाचेही म्हात्रे यांनी विशेष कौतुक केले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, गुरुद्वाराकडूनही त्यांना या काळात मदत मिळत होती. तेव्हा, त्यांच्या या कार्याला सलाम!
 

- नितीन देशमुख

@@AUTHORINFO_V1@@