मदतीचे ‘अमर’कार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Amar Patil _1  
 



कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक अमर अरुण पाटील यांनी मदतकार्यात आपले योगदान दिले. ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यांवर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही या प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 
नाव : अमर अरुण पाटील
 
 
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
 
 
प्रभाग क्र. : ६, नगरसेवक, पनवेल मनपा
 
 
कोरोना सुरू झाल्यावर सुरुवातीला नगरसेवक अमर पाटील हे स्वत: आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. आ. प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता, बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केल्यावर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली.
 
 
त्यांना अन्न-धान्याच्या किटचे वाटप सुरू केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप पोलीस ठाण्यामधील कर्मचार्‍यांना केले. पाण्याच्या टँकरमध्ये सॅनिटायझर भरून प्रभाग क्र. ७ मधील सोसायट्यांच्या गेटवर फवारणी केली.
 
 
भारतीय जनता पक्षाच्या कळंबोलीतील ६५ प्रमुख कार्यकर्त्यांनी महिनाभर पुरेल, अशा धान्याच्या किटचे वाटप केले. ‘मोदी किचन’च्या माध्यमातून लोकांना जेवण दिले. प्रभागात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांची आणि परप्रांतीय लोकांची वस्ती आहे. त्यातील अनेक जण गावी गेले, पण जे इथेच होते त्यांना ही घरोघर जाऊन धान्याच्या किटचे वाटप केले. पहिल्यांदा स्वत:मार्फत आणि दुसर्‍या वेळी रामशेठ ठाकूर विकास मंडळामार्फत केले.
 
 
‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे ७८०० लोकांना वाटप केले. चार हजार मास्कचे वाटप केले. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि कार्यकर्ते भूषण जले, गौरव नाईक, प्रशांत ननावारे, प्रकाश शेलार, दीपक शेलार आणि राजेंद्र बनकर यांचे चांगले सहकार्य मिळाले. यामधील राजेंद्र बनकर यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 

Amar Patil _2   
 

"लोकांनी स्वत: काळजी घ्यावी, वारंवार हात धुवावे, मास्क वापरावा, उगीच बाहेर फिरायला जाऊ नये, पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ आली, तर कोणालाही परवडणार नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी."
 
 
नगरसेवक अमर पाटील हे धान्यवाटप करण्यासाठी प्रभागातील सोसायटीत फिरायचे, त्यावेळी अनेक मध्यमवर्गीय लोक धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहत. ते पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी ठरवले की, कोरोना असेपर्यंत आपल्याला शक्य होईल तोपर्यंत लोकांना मदत करीत राहायचे. त्यांना घरातूनही चांगली साथ होती. वडील मधुमेहाचे रुग्ण असल्याने सावधतेने काम करा, एवढीच त्यांची अपेक्षा होती.
 
नगरसेवक अमर पाटील यांचे कार्यकर्ते राजेंद्र बनकर हे रस्त्यावर उभे राहून, लोकांमध्ये मिसळून मदत करीत असताना, त्यांना त्रास होऊ लागल्यावर खांदा कॉलनीतील दवाखान्यात दाखल करून तपासणी केली असता, रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून खूप धावाधाव केली. आ. प्रशांत ठाकूर यांनीही खूप प्रयत्न केले. अखेर नाईलाजास्तव पनवेलमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळत नसल्याचे अनेक जणांनी सांगितले होते, पण नाईलाज होता. दुर्दैवाने, ते खरे ठरले.
 
रात्री त्यांचा मृत्यू झाला. लोकांसाठी आपण एवढे केले, पण आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला चांगले रुग्णालय न मिळाल्याने, त्याचा झालेला मृत्यू अमर पाटील यांच्या मनाला चटका लावून गेला. त्यामुळे मग आपल्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याला त्रास होऊ नये, यासाठी त्यांची काळजी घेऊन त्यांना मास्क, ग्लोव्हज वापराची सक्ती केली.
 

- नितीन देशमुख
 
@@AUTHORINFO_V1@@