जनसामान्यांचा ‘कोविड योद्धा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Gopi _1  H x W:



कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात सामान्य जनतेची या महामारीच्या विळख्यापासून सुरक्षित राहून जगण्याचा संघर्ष सुरु झाला. जनसामान्यांच्या या संघर्षाला शासकीय यंत्रणांसोबतच अनेक नेतेमंडळी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तिमत्त्व यांनी पाठबळ दिले. असेच एक समाजसेवेचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी. त्यांच्या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
नाव : संजय दिनकार भोपी
 
राजकीय पक्ष : भाजप
 
पद : नगरसेवक, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती
 
संपर्क क्र. : ९३२२२४५६१८
 
 
कोरोना काळात नागरिकांना खंबीरपणे आधार देणारे व वेळेची तमा न बाळगता अहोरात्र नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर संजय भोपी यांनी फक्त प्रभागातीलच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठीही मदतीचा ओघ अविरत चालूच ठेवला. माजी खासदार व रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने, तसेच वेळप्रसंगी स्वखर्चाने अनेक अत्यावश्यक लोकहितोपयोगी उपक्रम नियोजनपूर्वक प्रभावीपणे राबविण्यात कोणतीही कसूर केली नाही. कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासोबतच जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी त्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे.
 
आरोग्यविषयक तसेच इतर अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळाव्यात, याकरिता प्रशासकीय यंत्रणांना फक्त निवेदन देऊन न थांबता सातत्याने त्याचा पाठपुरावा करत त्या सर्व सुविधांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात संजय भोपी यांचे मोलाचे योगदान आहे. सातत्याने जाहीर करण्यात येणारे सामान्यांच्या आकलन शक्तीबाहेरचे क्लिष्ट शासन नियम व अटी तसेच ‘लॉकडाऊन’ नियमांतील बदल यामुळे संभ्रमित व गोंधळलेल्या नागरिकांना अचूक मार्गदर्शन करत दिलासा देण्याचे त्यांचे कसब हे त्यांच्या शांत व संयमी स्वभावाची प्रकर्षाने जाणीव करून देते.
 
एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणजे आजूबाजूला लोकांचा गराडा, हे जणू समीकरणच झाले असून संजय भोपी हेदेखील याला अपवाद नाहीत. परिसरात वावरत असतानाही स्थानिकांच्या समस्या वा सूचनांना ते नेहमीच प्राधान्य देत असल्याकारणाने त्यांच्या अवतीभोवती कायमच गर्दी असते. अशा परिस्थितीत कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे गर्दी टाळण्याच्या महत्त्वपूर्ण शासन आदेशाचा मान राखत, आधुनिक युगातील व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक इ. प्रभावी समाजमाध्यमांचा कल्पकतेने वापर करत त्यांनी आपला जनसंपर्क फक्त अबाधितच ठेवला नाही, तर तो अधिकच दृढ बनविला.
 
आपले समाजकार्य हे फक्त नागरिकांपुरतेच मर्यादित न ठेवता, सध्याच्या बिकट प्रसंगी अतिशय महत्त्वपूर्ण घटक ठरलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सुरक्षितेसाठी ते नेहमीच आग्रही राहिले. मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रसार रोखणे हे जरी मुख्य आव्हान असले तरी संजय भोपी यांनी हे आव्हान लीलया पेलत प्रभागातील इतर समस्यांकडे जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही. मान्सूनपूर्व झाडांची छाटणी व परिसरातील नालेसफाई, प्रभागातील पाणीविषयक तसेच कचराविषयक समस्यांची गंभीर दखल घेत त्यांचे तत्काळ निवारण करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. अनपेक्षितपणे झालेल्या वादळी वार्‍यामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करणे असो की कोलमडलेले विजेचे खांब पुन्हा उभे करणे असो, संजय भोपी यांनी स्वतः जातीने हजर राहून प्रशासकीय यंत्रणांमार्फत सदरचे काम पूर्ण करून घेण्यात कोणतीही दिरंगाई केली नाही.
 

Gopi _2  H x W: 
 
माजी खासदार व रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शन व सहकार्यानेच आम्ही कोरोना महामारीच्या संकटकाळात मदतकार्य केले. याकामी कार्यकर्त्यांचीही खूप मोलाची साथ आम्हाला लाभली. पक्षाने आणि नागरिकांनाही आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
 
कोरोना काळातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आलेख बघता लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनी दाखविलेल्या विश्वासास त्यांनी किंचितही तडा जाऊ दिला नाही. ‘माझा परिसर हेच माझे कुटुंब’ हेच मनी ठेवून आपलेपणाने या कुटुंबाची पूर्ण काळजी घेण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळे स्थानिकांच्या मनात त्यांना ‘आपला नगरसेवक’ म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे.
 
 
आता जरा वेध घेऊया संजय भोपी यांच्या ‘लॉकडाऊन’मधील काही निवडक कार्याचा ः* आंतरजिल्हा तसेच आंतरराज्य प्रवासासाठी आवश्यक ई-पासची सुविधा व मार्गदर्शन. * खांदा कॉलनी विभागातील सर्व सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून संपूर्ण परिसरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण फवारणी. * खांदेश्वर पोलीस ठाण्यामधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना अत्यावश्यक असलेल्या हॅण्डसॅनिटायझरचे वाटप. * कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, याकरिता रोटरी क्लब, खांदा कॉलनी येथे योग्य ती खबरदारी घेत दोन वेळा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. * परिसरातील नागरिकांसाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप. * घरगुती गॅस वाटपाबाबत तक्रारींची तातडीने दखल घेत स्वत: प्रत्यक्ष हजर राहून सर्वांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करीत सुरळीतपणे गॅस सिलिंडरचे वाटप.
 
 
* भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्यावतीने तसेच काही ठिकाणी स्वखर्चाने गरजूंना अन्नधान्य वाटप. पनवेल महानगरपालिकेला आर्थिक पाठबळ म्हणून स्वतःचे दोन महिन्यांचे मानधन पनवेल महानगपालिका ‘मेअर रिलिफ फंड’ या साहाय्यता निधीत जमा. * खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवठा दुकानांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांची यादी बनवून सदर यादी खांदा कॉलनीतील नागरिकांसाठी व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रसिद्ध * कोरोना संशयित रूग्णांसाठी ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ मागणीचा यशस्वी पाठपुरावा. * नाभिक समाज व रिक्षाचालक यांना अन्नधान्य व मास्क वाटप. * संजय भोपी प्रतिष्ठान व श्रीजी संघ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने खांदेश्वर पोलीस ठाणे येथील कर्मचारी वर्गासाठी चहा व नाश्ता यांची सोय.
 
नगरसेवकांमधला समाजसेवक संजय भोपी यांनी आपल्या लक्षवेधी कर्तृत्वाने सिद्ध करत सर्वांसमोरच एक आदर्श ठेवला आहे. सदैव लोकहितासाठी कार्यतत्पर असलेल्या या आपल्या नगरसेवकाला त्यांच्या अवर्णनीय कार्याबद्दल मानाचा त्रिवार सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा...
 
- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@