गरजवंतांचा आधारस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Baban _1  H x W





कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक बबन मुकादम यांनी मदतकार्य केले. कोरोनामुळे समाजातील विविध स्तरातील लोकांसमोर अनेकविध प्रश्न उपस्थित झाले. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदत ही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 
 
 
नाव : बबन नामदेव मुकादम
राजकीय पक्ष : भाजप 
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : ८, नगरसेवक
संपर्क क्र. : ९८१९८६३०६०
 
 
 
 
बबन मुकादम यांनी कोविडकाळात मोठ्या प्रमाणात आपल्या प्रभागात मदतकार्य उभे केले. त्याविषयी विचारले असता ते म्हणतात की, “आपण निवडणुकीच्या काळात महिनाभर फिरत असतो. ज्या लोकांनी आपल्याला या प्रभागातून निवडून दिले, त्यांचा आपल्यावर हक्क आहे. पाच वर्षे आपण त्यांच्या उपयोगी पडणे गरजेचे आहे. त्यांची छोटी-मोठी कामे आपण करतोच; पण कोरोनामुळे त्यांच्यावर आलेले संकट मोठे होते. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार बंद झाला, घरात खाण्यास काही नाही, अशावेळी साहजिकच त्यांची अपेक्षा असणार की, आपल्या नगरसेवकाने आपल्याला मदत केली पाहिजे.”
 
 
अशा या बबन मुकादम यांचा आज अनेक वर्षे राजकारणात असूनही असल्याने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर पूर्ण विश्वास असून ते त्यानुसारच कार्यरत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागात आणि इतर प्रभागातील लोकांना मदत करायला सुरुवात केली.
 
 
कोरोना सुरू झाल्यावर सुरुवातीला नगरसेवक बबन मुकादम हे स्वत: आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता, बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केल्यावर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुकादम यांना नेहमी विविध कामांसाठी उपयोगी पडणार्‍यांची यादी तयार करण्यास सांगितली. त्याप्रमाणे मुकादम यांनी यादी तयार केली. त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप सुरू केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले.
 
 
बबन मुकादम यांच्या, “भाताण या गावातील संजय पाटील या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होत आहे. रात्र निघू शकत नाही, त्याला दवाखान्यात बेड मिळवून द्या,” असा रात्री १० वाजता फोन आला. बबन मुकादम यांनी महापालिकेतील अधिकारी शेटये यांच्याकडे संपर्क साधून त्याला बेड उपलब्ध करून द्यायची विनंती केली. रुग्णवाहिकेची सोय करून रात्री १ वाजता त्याला ‘देवांशीश’मध्ये नेले. तिथे टेस्ट केल्यावर त्याचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला. डी. वाय. पाटील रुग्णालयात जागा नसल्याने त्याला ‘एमजीएम’मध्ये दाखल केले.
 
 
त्या ठिकाणी २०-३० दिवस त्याला ठेवले. पण, यश आले नाही. हा ३८ वर्षांचा तरुण त्यांच्या अत्यंत जीवाभावाचा असल्याने, याचे त्यांना जास्त दु:ख झाले. त्यानंतर त्यांनी ‘कोविड’ रुग्णाला आवश्यक असणारी इंजेक्शन बाजारात जास्त किमतीला मिळत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या गरीब रुग्णाला घेणे शक्य होत नसल्याने महापालिकेतील अधिकार्‍यांजवळ संपर्क साधून त्यांना कमी किमतीत उपलब्ध करून देऊन अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत केली.
 
 
 
Baban _3  H x W
 

 
"‘कोविड’ हा संपूर्ण जगात आहे. हा क्षण पुन्हा कोणाच्या आयुष्यात येऊ नये. जनतेला खूप हाल भोगावे लागले आहेत. ‘कोविड’ अजून संपलेला नाही. पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे, यासाठी लोकांच्यात जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण भविष्यात करणार आहोत."
 
 
 
 
नगरसेवक बबन मुकादम यांची पत्नी प्रिया मुकादम यांचे या मदतकार्यात चांगले सहकार्य लाभले. त्या स्वत: यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण सभापती राहिलेल्या असल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघात महिला बचतगटाचे मोठे संघटन उभे केले आहे. बचतगटातील महिलांचेही त्यांना सहकार्य मिळाले. त्या बबनदादांना, “तुम्ही चांगले काम करीत आहात. पण, तुम्ही स्वत:ची काळजी घ्या,” असे नेहमी सांगायच्या. दोन्ही मुलांचे आणि भावांचेही सहकार्य मिळाले. याशिवाय त्यांचे कार्यकर्ते प्रकाश मुंबईकर, नरेश पवार, पाटील आणि महिला कार्यकर्त्या पाटील मॅडम यांचे नेहमी सहकार्य मिळत होते.
 
 
 
Baban _2  H x W
 
 
 
 
 
महापालिकेच्या आयुक्तांपासून ते कचरा गोळा करणारे आणि फवारणी करणार्‍यांपर्यंत सगळ्यांनी त्यांना सहकारी केल्याचे ते आवर्जून सांगतात. बबन मुकादम यांच्या प्रभागात परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात होते. ‘लॉकडाऊन’मुळे काम बंद पडल्यावर त्यांचे हाल होत होते. त्यांना रेशन दुकानावर धान्य मिळत नव्हते. तेव्हा बबनदादांनी स्वतः रेशन दुकानात जाऊन त्यांना धान्य मिळवून दिले. त्यांना आपल्या गावाला जाण्यासाठी विशेष रेल्वेमध्ये व्यवस्था करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले. त्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली. अशा या बबनदादांच्या कार्यामुळे कित्येकांना कोविडकाळात एक मूलभूत आधार मिळाला.
 


- नितीन देशमुख
@@AUTHORINFO_V1@@