धर्म सेवेचा, कर्म सेवेचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

barse_1  H x W:



कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये सेवा देणार्याi अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत, त्यांना लागेल ती मदत देत, प्रियांका बारसे यांनी केली. माणुसकीच्या नात्याने अन्नदान, औषधे, मास्क, सॅनिटायझर यांची गवळीनगरसह अन्य गरजेच्या ठिकाणी त्यांनी मदत देऊ केली. त्यांच्या या मदतीचा अनेकांनी लाभ घेतला आणि बारसे यांचे आभारही मानले. तेव्हा, प्रियांका बारसे यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख...

प्रियांका प्रवीण बारसे
राजकीय पक्ष : भाजप
प्रभाग क्रमांक : ५, नगरसेविका,पिंपरी-चिंचवड मनपा
संपर्क क्र. : ९८५०९३२१०१



सध्या कोरोना नावाचा विषाणू संपूर्ण जगभर थैमान घालत असून, भारतातही या आजाराने मोठे भीषण रूप धारण केले आणि पिंपरी-चिंचवड महानगरक्षेत्रही या विषाणूच्या तडाख्यातून बचावले नाही. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हापासून ‘लॉकडाऊन’ झाले, तेव्हापासून सर्वत्र जनजागृतीची मोहीम प्रियंका बारसे आणि टीमने हाती घेतली. या सर्व कामांमध्ये त्यांचे पती प्रवीण बारसे यांनीदेखील त्यांना मदत केली. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ‘लॉकडाऊन’ झाले, तेव्हा कोरोना विषाणू काय आहे? तो पसरतो कसा? यावर उपाय काय? याविषयी प्राथमिक माहिती केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार त्यांनीही नीट समजून घेतली आणि मग लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती केली. आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी? रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे वाढवायला हवी? ‘सोशल डिस्टन्सिंग’ म्हणजे काय? आणि याचा वापर कशासाठी? ही माहिती त्यांनी लोकांना समजावून सांगितली. मास्क, सॅनिटायझर वापराची उपयोगिताही त्यांनी नागरिकांना पटवून दिली. खासकरुन अगदी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशी सगळी माहिती सर्वसामान्य जनतेला देणे, हे खरं तर आवश्यकच होते. पिंपरी-चिंचवडमधील गवळीनगर प्रभाग क्रमांक ५च्या नगरसेविका प्रियांका बारसे आणि स्वयंसेवकांनी दारोदार जाऊन याविषयीची जनजागृती केली.



कोरोना विरुद्ध लढण्यासाठी गवळीनगरच्या प्रभाग क्र. ५ मध्ये ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक सोसायट्यांमध्ये डॉक्टरांचे पथक घेऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली गेली. याठिकाणी डॉक्टरांच्या बरोबरीने स्वतः प्रियांका बारसे या जागोजागी जाऊन तपासणीसाठी लोकांना विचारणा करत होत्या. स्वतः मुख्याध्यापक व नगरसेविकाही असल्यामुळे लोकांना ही माहिती सोप्या शब्दांत समजावून सांगणे हे प्रियांका यांच्यासाठी अगदी सोपे होते. तसेच ज्यांना कोणाला कोरोनासदृश लक्षणे आढळली त्यांची बारसे यांनी स्वतंत्र व्यवस्था केली. त्यामुळे कोरोना विषाणूला काही प्रमाणात खीळ बसली. यावेळी लोकांना औषधोपचारही मोफत देण्यात आले. यंत्रणा लावून प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये सॅनिटायझर फवारणीही त्यांनी करुन घेतली. कोरोनाच नाही तर इतर कोणतेही आजार आपल्या प्रभागात पसरू नये, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. प्रियांका बारसे यांनी प्रभागातल्या लोकांना सॅनिटायझरचे वाटपही केले.वाढत्या आजारामुळे रक्तपेढ्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली होती. ही गरज लक्षात घेऊन, प्रियांका बारसे यांनी त्यांच्या प्रभागांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले. यामध्ये ४३ नागरिक आपली सेवा म्हणून रक्तदानासाठी पुढे आले आणि ज्या रुग्णांना आवश्यकता असेल, त्या ठिकाणी रक्त पोहोचविण्याची व्यवस्थाही यंत्रणेच्या माध्यमातून केली गेली.



barse_1  H x W:


गेली ३५ वर्षे शिक्षणाच्या आणि आता राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच जनतेच्या सेवेसाठी मी उभी राहिली आहे आणि यापुढेही राहीन. शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण हे माझे काम करण्याचे आवडीचे विषय आहेत. माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे हे सर्व काम करणे मला शक्य झाले. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे.


‘लॉकडाऊन’चा फटका रोजंदारीवर काम करणार्याी महिलांनाही बसला. या महिलांना बारसे यांच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. तसेच आरोग्य कर्मचार्यांना, गरजू होतकरू असलेल्या सुमारे ८०० कुटुंबांना धान्याचे वाटप नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या माध्यमातून केले गेले. कोरोना या कालखंडामध्ये ‘कोविड योद्धे’ म्हणून काम करणार्याय पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळेतील शिक्षकांना २५ लाखांचे विमाकवच मिळविण्यासाठी मनपा आयुक्ताची मंजुरी मिळवून त्यांना ते सुरक्षाकवच देण्यात आले. जेणेकरून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सोय व्हावी, हा उद्देश त्यामागे होता. भोसरी परिसरातील २५ शाळांना नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या माध्यमातून ११० सॅनिटायझरचे स्टॅण्ड वाटप केले. या बरोबरीने सॅनिटायझर, मास्क वाटप केले, जेणेकरून या सर्व गोष्टींचे वाटप करताना कोरोना विषाणू रोखला जाईल, असाच दृष्टिकोन होता.



‘लॉकडाऊन’च्या या काळात मजुरांचे खाण्याचे हाल मोठ्या प्रमाणावर होत होते. त्यांना चहा, बिस्कीट आणि नाश्त्याची आठ दिवसांची सोय स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आली होती. शाळेत मिळणार्या् शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून गरजू पालकांना तांदूळ देण्यासाठी राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मंजूर करून घेत, तांदूळ घरपोच पाठविण्यासाठी बारसे यांनी यंत्रणा राबविली.प्रियांका बारसे यांच्या प्रभागामध्ये कोणी कोरोना रुग्ण आढळला, तर त्याच्यावर सर्व औषधोपचार व्हावेत, त्यांची दवाखान्यात योग्य ती काळजी घेण्यात यावी, यासाठी सतत फोनवर संपर्कात राहून त्यांची सोय करण्यात आली. एखादा रुग्ण अधिक आजारी असेल, त्याला ऑक्सिजनची गरज असेल, तर मोठ्या रुग्णालयामध्ये बेड व ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी लावलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याची सोय करण्यात आली आणि तो रुग्ण बरा झाल्यानंतर त्याचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी त्याच्या मनाला उभारी, प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करत राहिल्या. खरंतर सामान्य जनतेसाठी सतत झटणार्याय नगसेविका प्रियांका बारसे यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून ‘पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन’, ‘शिव बुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’, ‘आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या वतीने सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नगरसेविका असणार्या प्रियांका बारसे यांची शिक्षण समिती सदस्यपदी निवड झाली आहे. आपल्या कामाला झोकून देऊन सतत काम करत राहणे व त्या कामामध्ये १०० टक्के प्रामाणिक राहणे, हीच प्रेरणा प्रियांका बारसे यांची सतत राहिली आहे. कोरोनाव्यतिरिक्त महिलांचे प्रश्न विविध बचतगटांच्या माध्यमातून प्रबोधन करत किंवा कोणत्याही अडचणी असतील, तर त्या सोडविण्यावर अधिक भर देऊन, त्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी त्या धडपडत राहिल्या आहेत. घरकामगार महिलांची संघटनादेखील सुरू करून त्या माध्यमातूनही प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी भर दिला आहे. या सर्व कामांमध्ये अनुराधा दौंड, अनुजा मनसुख, कान्होपात्रा थोरात, सोनाली शेंडे अशा अनेक कार्यकर्त्यांनी या सर्व कामांमध्ये पुढाकार घेऊन हातभार लावला आहे. समाजामध्ये गरीब व प्रामाणिक माणसाला न्याय मिळावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून हे काम कसे उभे करता येईल, यासाठी मी नेहमीच सर्वसामान्यांचा आवाज म्हणून कायम उभी राहणार आहे, असे बारसे अभिमानाने सांगतात.


- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@