आम्ही चालवू हा पुढे वारसा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

Swati Gurkhe_1  
 
 
राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात युवा, सुशिक्षित महिला ज्यावेळी सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा आपल्या कार्यशैलीतून समाजावर आलेल्या कुठल्याही संकटावर त्या मात करू शकतात. याची प्रचिती नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती गुरखे-साटम यांनी कोविड महामारी काळात केलेल्या मदतीतून मिळते. महामारी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत समाजव्रत म्हणून त्यांनी केलेल्या मदतकार्याचा हा आढावा...


स्वाती गुरखे-साटम
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेविका
प्रभाग क्र. : १०२ सीबीडी-बेलापूर
संपर्क क्र. : ९८२०८ ७०६१४

नवी मुंबई... देशातील राहण्यायोग्य शहरांपैकी एक अग्रगण्य महानगर. मात्र, कोरोना महामारीने या विभागालाही विळख्यात घेतले. तिथल्या लोकप्रतिनिधींपासून डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारीची भूमिका निभावली. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे स्वाती गुरखे-साटम. त्यांचे वडील अशोक गुरखे यांच्यापासून समाजकार्याची प्रेरणा घेत आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वातीताईंनी ‘कोविड योद्धा’ म्हणून आपल्या मतदारांच्या, समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. बेलापूर विभाग म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांचा, सिडको वसाहत इमारतींनी प्रशस्त अशी लोकवस्ती. मार्च महिन्यात कोरोनाची सुरुवात झाली आणि इथल्या नागरिकांमध्येही घबराट पसरली. माजी नगरसेविका असलेल्या स्वाती गुरखे-साटम यांचा फोन सतत खणखणत असायचा. कधी कुठल्या रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी, तर कुठे उपाशी असलेल्या लेकरांची व्यथा मांडण्यासाठी.
 
 
 
Swati Gurkhe_1  
 
 
 

"माझे वडील अशोक गुरखे यांनी दिलेल्या समाजव्रताचा वसा मी पुढे घेऊन जात आहे. अभूतपूर्व अशा संकटातून आपण सर्वजण जात आहोत. समाजकार्य पूर्वीपासूनच सुरू आहे. मात्र, कोरोना काळात आलेल्या जनतेच्या समस्या सोडवत असताना मला वडिलांची शिकवण कामी आली. याच शिकवणीची प्रेरणा मला कोविड काळात मदतकार्याची ऊर्जा आणि जिद्द देऊन गेली आणि भविष्यातही मी समाजसेवेसाठी अशीच कटिबद्ध असेन." 

 
 
 
 
जनतेच्या सेवेत इतकी वर्षे असताना कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती त्यांनाही नवीन होती. मात्र, कार्यकर्त्यांची टीम उभी करत, सातत्याने ज्या ज्या अडचणी येतील, त्यांच्यावर मात करत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या. भुकेलेल्यांना तृप्त करून, रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होत होता. कोरोना संकट सुरू झाल्यानंतर ‘लॉकडाऊन’मध्ये जेव्हा सर्वप्रथम बाजारपेठा बंद पडल्या होत्या, तेव्हा स्वातीताईंनी ११ हजार मतदार असलेल्या, त्यांच्या सीबीडी-बेलापूरच्या १०२ वॉर्डातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप मोहीम सुरू केली. तांदूळ, डाळ आदी आवश्यक सामग्रीचे किट्स ६०० ते ७०० कुटुंबांपर्यंत त्यांनी पोहोचवले. वॉर्डातील संपूर्ण वस्तीत तीन हजार मास्कचे वाटप केले. स्वातीताईंनी संपूर्ण विभागातील सिडको सोसायट्या आणि अन्य खासगी संकुलांमध्ये ही मोहीम राबविली. त्यानंतर आता कोरोना रुग्ण आढळल्यावर सोसायटीत केल्या जाणाऱ्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रियाही अखंड सुरू ठेवण्यात आली आहे. सेक्टर १-ए, सेक्टर १, सेक्टर २, सेक्टर ३, सेक्टर ९ या विभागातील सर्व मदतकार्याची मोहीम कोरोना नाहीसा होईपर्यंत अशीच सुरूच राहणार आहे. मास्क-सॅनिटायझरपासून ते अन्नधान्य, तसेच स्वस्त दरात भाजी उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न स्वातीताई करत होत्या. भाजी विक्रेते आणि दुकानदारांची भेट घेऊन कोरोनाबद्दल जनजागृती मोहीमही त्यांनी राबविली होती. बाजारपेठेतील दुकानदारांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले.
 
 
 
‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या पाच हजार गोळ्यांचे वाटप, अन्नधान्य वाटप हे त्यांचे कार्यही सुरूच होते. मदत करताना येणाऱ्या अडचणीत आ. गणेश नाईक, आ. मंदाताई म्हात्रे ही दोन व्यक्तिमत्त्व खंबीरपणे पाठीशी उभी होती. अन्नधान्य वाटपासाठी तुटवडा होत असेल, मास्क, सॅनिटायझर आणि ‘आर्सेनिक अल्बम’ आदी साहित्य पुरवण्यात दोघांचीही मदत लाभली होती. मदतीची याचना, रुग्णवाहिकेअभावी अत्यवस्थ रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल करण्याची धडपड, अंगावर शहारे आणणारे प्रसंगही स्वातीताईंनी अनुभवले. एका महिलेने आपल्या पतीला गावावरून रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. तातडीने उपचाराची गरज होती. रात्रीच्या वेळेस स्वातीताईंचा फोन खणखणला. वेळेचे गांभीर्य लक्षात घेत, त्यांनी वरिष्ठांच्या सहकार्याने रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला. बरे होऊन घरी जाताना रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने दिलेले आशीर्वाद हे शब्दांत मांडता येणार नाहीत, असे स्वातीताई सांगतात. हे सर्व मदतकार्य करत असताना, काही घरांतील प्रसंग पाहून स्वातीताईंच्या डोळ्यात अक्षरश: पाणी तरळले. त्या कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवून त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. कोरोनाची भीती होतीच, शिवाय आपला समाज म्हणून जबाबदारीही तितकीच महत्त्वाची होती. या सर्व गोष्टी स्वातीताईंनी लीलया पार पाडल्या.
 
 
 
रुग्ण आढळल्यावर त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही स्वातीताईंना पूर्ण कल्पना होती. ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्यानंतर त्या कुटुंबाला हवी ती मदत पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांनी कार्यकर्त्यांना नेमून दिली होती. कोरोनामुळे समाजात पसरवण्यात आलेले अनेक समज-गैरसमज मोडीत काढण्यासाठी आणि नागरिकांचे शंका-समाधान करण्यासाठी डॉक्टरांतर्फे ‘डिजिटल संवाद’ कार्यक्रमाचेही त्यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत, आपल्या समस्या मांडल्या. संपूर्ण विभागाचे सर्वेक्षण आणि अ‍ॅन्टिजेन टेस्ट शिबीरही स्वातीताईंनी राबविले होते. या सर्व समाजकार्यात त्यांना कुटुंबीयांचाही पाठिंबा होताच. त्यांचे वडील अशोक गुरखे यांनी दिलेले समाजसेवेचे हे बाळकडू स्वातीताईंनी अत्यंत जबाबदारीपूर्वक व नागरिकांमध्ये राहून काम करत पार पाडले. म्हणूनच मनापासून केलेली समाजसेवा हीच ईश्वरसेवा असते, हे स्वातीताईंकडे पाहिल्यावर लक्षात येते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@