अनुभवाची शिदोरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Suraj Patil_1  
 
 
कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांपासून ते अगदी लोकप्रतिनिधींचाही कस लागला. कारण, ही परिस्थिती, हे संकट नवीन होते व त्याच्याशी नेमका कसा सामना करायचा, याची फारशी कुणाला कल्पनाही नव्हती. पण, या कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीला भाजप नेते सुरज पाटील धावून गेले. गरजूंच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा कोरोनाकाळातील मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

सुरज बाळाराम पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : कुकशेत गाव, सेक्टर ६, सारसोळे गाव
संपर्क क्र. : ९९२०६ ८१७३२

 
 
 
कोरोना वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात हळूहळू वाढू लागला. ‘लॉकडाऊन’ जाहीर होताच नागरिक आपल्या घरीच अडकून पडले. उत्पन्नाचे सर्वच मार्ग ‘लॉकडाऊन’काळात एकाएकी ठप्प पडल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तर बसलाच; परंतु रोजंदारीवर काम करणारे मजूर, गरीब, कामगारवर्ग यात सर्वाधिक भरडला गेला. अशा सर्वच नागरिकांच्या मदतीला धावून जात नवी मुंबईतील भाजप नेते सुरज पाटील यांनी सर्वप्रथम आपल्या प्रभागात सॅनिटायझर व औषध फवारणीला सुरुवात केली. त्यांनी स्वतः या कार्यात उतरत महानगरपालिकेच्या मदतीने प्रभागातील सर्व इमारती सॅनिटाईझ करून घेतल्या. नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जावी, याकरिता महानगरपालिकेच्या सहकार्याने ठिकठिकाणी ‘मास स्क्रीनिंग कॅम्प’ आयोजित केले. या कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली गेली. सर्दी, ताप यांसारखी प्राथमिक लक्षणे असणार्‍या नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप प्रभागातील कुटुंबांना पाटील यांनी सहकार्‍यांच्या माध्यमातून केले. कोरोनाकाळात मास्कचा वापर बंधनकारक आहे, त्यामुळे आपल्या भागातील चार हजार कुटुंबांना घरपोच मास्कचे वाटप केले. एखाद्या परिसरात कोरोना रुग्ण आढळल्यास आजूबाजूचे नागरिक घाबरून जात, रुग्ण आढळलेल्या कुटुंबांना चुकीची वागणूक दिली जाऊ नये, याकरिता सर्व सोसाट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविली. काही भागात पाटील यांनी स्वतः या जनजागृती कार्यात उतरत नागरिकांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले.
 
 

Suraj Patil 1_1 &nbs 
 
 
 

"माझे वडील, आदरणीय गणेश नाईक साहेबांचे कार्यकर्ते होते. २००८ साली गणेश नाईक साहेबांनी मला पद दिले. २०१० सालच्या निवडणुकीत सभागृहात जाण्याचा मान मला नागरिकांनी दिला. सातत्याने दहा वर्षे माझी पत्नी व मी, मागील टर्मपर्यंत नगरसेवक म्हणून कार्यरत होतो. आजही आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतो."

 
 
 
रेशन किटच्या माध्यमातून कुटुंबांना धान्यवाटप तर होतंच होते. मात्र, मजूर, गरीब यांच्यासाठी शिजविलेले अन्न मिळेल यांची सोय पाटील यांनी केली. ‘कच्छ युवा वाकड सेवासमिती’च्या समन्वयाने शिजविलेले अन्नदान करण्यास सुरुवात केली. दिवसातून २५० ते ३०० लोकांना याचा लाभ मिळत होता. त्यानंतर ‘दर्शन दरबार’ या गुरुद्वाराच्या समन्वयाने ३०० ते ४०० लोकांसाठी जेवणाची सोय पाटील यांनी सातत्याने उपलब्ध करून दिली. परराज्यात जाणार्‍या मजुरांचा आणि पोलिसांचा समन्वय घडवून आणत, मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यास सहकार्य पाटील यांनी केले. आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या सूचनेनुसार, पाटील यांनी आपल्या प्रभागात ‘२४ X ७’ ही सुविधा सुरू केली. या सुविधेच्या माध्यमातून आठवड्यातील सात दिवस २४ तास नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या. ज्या रुग्णांना बेड मिळत नव्हते, काहींना रुग्णवाहिका मिळत नव्हत्या, अशांना तत्काळ सुविधा मिळाव्यात यासाठी एक संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला. कोरोना रुग्णांची फसवणूक होत होती, त्यांना अधिकची बिले देण्यात येत होती. त्यात अनेक नागरिकांची रुग्णालयाचे बिल भरण्याची आर्थिक क्षमता नव्हती. मग अशांचे बिल माफ करून देणे यासाठी नागरिकांना या सुविधेचा लाभ झाला. आजही ‘२४ X ७’ ही सुविधा सुरूच आहे. खासगी रुग्णालयात अनेक नागरिकांना पाटील यांनी मोफत उपचार मिळवून दिले. आर्थिक परिस्थिती नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात अडथळे येत असलेल्या काहींना पाटील यांनी तातडीने उपचार मिळवून दिले. अशा पाच ते सहा गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात पाटील यांनी मोफत उपचार मिळवून दिले, याचे पाटील समाधान व्यक्त करतात.
 
 
 
आज ‘लॉकडाऊन’ शिथिल होत असताना, अनेकांना रोजगार मिळावा, याकरिता पाटील पाठपुरावा करत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक पालकांना ‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांची फी भरण्याची सध्या क्षमता नाही, अशा पालक आणि शाळांमध्ये समन्वय साधत पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पाटील करत आहेत. फीबाबत सूट देणे, तसेच काही भरण्याचा अवधी वाढवून देण्याबाबत शाळांकडे पाठपुरावा करण्याचे कामही पाटील करत आहेत. महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका नागरिकांना बसला. याविरोधात मोठे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाटील यांनी केले. अनेक नागरिकांची बिलं महावितरणकडून दुरुस्ती करवून घेतली. केवळ आपल्या प्रभागातच नाही, तर पाटील यांनी नवी मुंबईतील सीबीडी, सानपाडा या भागातील नागरिकांनाही मदतीचा हात दिला.
दीपक पाटील, नृपेश पाटील, यशवंत तांडेल, सुवर्ण मेहेर, दीपक म्हात्रे, स्मिता म्हात्रे, सीमा चौधरी यांच्यासह जय गजानन मित्रमंडळातील कार्यकर्ते रात्रंदिवस पाटील यांच्यासमवेत या मदतकार्यात उतरले होते.
 
 
 
आमदार गणेश नाईक व नेते संदीप नाईक यांचे मार्गदर्शन या काळात सातत्याने सुरू होते. त्यांच्याकडून येत असणारे धान्य, रेशन किट यांचे वाटपही पाटील यांनी केले. आजही पाटील यांच्या कार्यालयातून दिवसभर दोन कार्यकर्ते फोन करून नागरिकांशी व रुग्णाशी संपर्क साधत असतात. त्यांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीविषयक माहिती घेत आहेत. नगरसेवक सुजाता पाटील व नगरसेवक जयश्री ठाकूर यादेखील वैयक्तिक स्वरूपात नागरिकांची मदत करत आहेत. प्रभागातील नागरिकांसाठी सुरज पाटील यांनी एका वेबिनारचे आयोजनदेखील केले होते. या वेबिनारच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली. या सर्व मदतकार्यात या कठीण प्रसंगात केवळ पाटील यांचेच नाही, तर सर्वच कार्यकर्त्यांचे कुटुंबीय पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कोणीही अडवणूक केली नाही. हे मदतकार्य करत असताना, सुरज पाटील यांना कोरोनाची लागण झाली, त्यांच्या कुटुंबीयांनाही बाधा झाली. मात्र, अनुभवाची शिदोरी व सर्वांचे आशीर्वाद याच्या जोरावर पाटील कुटुंबीयांनी कोरोनावर यशस्वी मात केली. पुन्हा मदतकार्यात उतरत असताना सुरज पाटील दुप्पट ऊर्जेने या मदतकार्यात उतरले. आजही सुरज पाटील यांचे मदतकार्य अविरतपणे सुरूच आहे. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ व सफाई कामगार यांचा सन्मानदेखील सुरज पाटील यांनी केला.
@@AUTHORINFO_V1@@