संवाद आपुलकीचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Ashok Patil_1  
 
  
कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्टींबरोबरच नागरिकांना गरज होती ती मानसिक व भावनिक आधाराची. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या सर्वसामान्यांना नैराश्याकडे नेणारी होती. अशावेळी आपल्या प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती करत, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणारे ‘कोविड योद्धे’ भाजप नेते अशोक पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 

अशोक भाऊसो पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : मा. सभापती, नवी मुंबई महानगरपालिका
प्रभाग क्र. : १५, ऐरोली
संपर्क क्र. : ९९६७९ ६७७५५

‘कोविड-१९’ म्हणजेच, कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातले. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर भारतात होत असल्याने देशात सर्वत्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईतदेखील परिस्थिती काही वेगळी नव्हती. अशावेळी नागरिक व सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून जात नागरिकांना धीर देण्याचे काम ऐरोली प्रभागातील भाजप नेते व माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी केले.
 
नवी मुंबईच्या ऐरोली प्रभागातील नागरिकांमध्येही कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. परिसर ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी पाटील यांनी सर्वप्रथम प्रभागातील कुटुंबांची आपल्या परिवारासारखी काळजी घेत संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करून घेतला. त्यांनी स्वतः उपस्थित राहत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करून मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. एवढेच नाही, तर प्रभागात घरोघरी जाऊन मोफत तपासणी करून ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळली, त्यांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, याकरिता प्रभागातील कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन ‘आर्सेनिक अल्बम- ३०’ या गोळ्यांचे मोफत वाटप केले. सुरुवातीच्या काळात प्रभागातील कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उपाय म्हणून हे सर्व उपक्रम राबविण्यात आले, ज्याचा पाटील यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
मात्र, ‘लॉकडाऊन’ महिनाभरानंतरही कायम राहिल्याने हातावर पोट असणाऱ्या वर्गाला आर्थिक प्रश्न भेडसावू लागले. काम बंद झाल्याने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची चणचण नागरिकांना भासू लागली. त्यामुळे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने आधार म्हणून घरोघरी जाऊन अन्नधान्य व इतर गरजू वस्तूंचे वाटप केले. आपल्या प्रभागातील सर्कशीत काम करणाऱ्या कामगारांनादेखील पाटील यांनी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. याकाळात अशोक पाटील हे २४ तास प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते. नागरिकांची रुग्णालयात होणारी फसवणूक, रुग्णालयात बेड मिळवून देणे, अ‍ॅम्ब्युलन्स मिळवून देणे, यासाठी पाटील यांनी एक हेल्पलाईन नंबर जारी केला व त्यामार्फत ते नागरिकांच्या समस्या सोडवत होते. या काळात नागरिकांना जलद उपचार मिळावे, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यांनी प्रभागात ‘मास स्क्रीनिंग कॅम्प’देखील आयोजित केला होता. जेणेकरून सर्दी, पडसं यांसारख्या लक्षणांवर त्वरित उपचार मिळू शकतील. अपंग व दिव्यांग नागरिकांची काळजी घेत, त्यांनादेखील धान्यवाटप करण्याचे काम पाटील यांनी केले.
 
 

Ashok Patil_1   
 
 

"सर्व तळागाळातील कार्यकर्ते हे कोणतेही सामाजिक काम असो, धार्मिक काम असो, राजकारण बाजूला ठेवून एक समाजाचा भाग म्हणून पूर्णत्वास नेण्याची शिकवण आम्हाला गणेश नाईक साहेबांनी दिली. त्यांच्या या शिकवणीचा आम्हाला आमच्या समाजकार्यात नेहमीच फायदा झाला आणि त्यांची हीच शिकवण डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहोत. हे कार्य असेच पुढेदेखील सुरू राहील."

 
 
कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नव्हते. तसेच या काळात लोकप्रतिनिधींनाही आपल्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधणे शक्य होत नव्हते, दवाखाने बंद असल्यामुळे नागरिकांना इतर उपचार घेणेही शक्य होत नव्हते. अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, तसेच योग्य उपचार पद्धती काय, याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळविण्यासाठी अशोक पाटील यांनी ‘संवाद आपुलकीचा’ या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी डिजिटल माध्यमांतून संवाद साधला. नागरिकांना मार्गदर्शन केले. या काळात छोटे-मोठे भाजीविक्रेते यांना विक्रीसाठी तर नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यात अडचणी येत होत्या, अशावेळी यामध्ये दुवा साधण्याचे काम पाटील यांनी केले. त्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेत शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट नागरिकांच्या घरी पोहोचविण्याचे मोलाचे काम केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात दुसरा फटका नागरिकांना बसला तो वाढीव वीजबिलांचा, याविरोधातदेखील त्यांनी आवाज उठवत सरकारला जाब विचारला. ऐरोली सेक्टर १५, सेक्टर १६ येथील स्कायवॉक जवळील रिक्षाचालकांना स्वखर्चाने पाटील यांनी सुरक्षा किटचेही वाटप केले. आपल्या प्रभागात कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे कामही त्यांनी केले.
 
स्थानिक नगरसेविका संगीता पाटील, कैलास गायकर, नामदेव कुंभार, प्रसाद शिंदे, हरीश पुजारी यांसह सातत्याने ५० ते ६० कार्यकर्ते रात्रंदिवस या कार्यात मोलाचे योगदान देत होते. या संपूर्ण मदतकार्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे मोठे सहकार्य पाटील यांना लाभले. भाजप नेते गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांचे पाटील यांना मार्गदर्शन लाभले. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात भाजपच्या सर्व नगरसेवकांना, तळागाळातील कार्यकर्त्यांना आपल्या परिसरातील नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शन केले जात होते. तशा सूचना वरिष्ठांकडून मिळत होत्या, त्यानुसार पाटील व कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते.
 
पाटील यांनी कोरोनाकाळात आपल्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिक, भाजीविक्रेते, तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने झटत राहिले. केवळ जीवनावश्यक व आरोग्य सुविधाच नव्हे, तर या काळात नागरिकांचे भावनिक मुद्दे समजून घेत अनेक कुटुंबांना त्यांनी आधार दिला. यावेळी आलेल्या अनेक अनुभवांनी व नागरिकांच्या छोट्या-छोट्या समस्यांनी त्यांना जिद्दीने काम करण्याची त्यांना आधार देण्याची प्रेरणा दिली. त्यापैकी काही प्रसंग जसे की, काही विधवा महिला होत्या, ज्यांच्या घरात कोणी कर्ता पुरुष नाही, काही गरीब कुटुंब ज्यांचे हातावर पोट आहे, अशा नागरिकांना या काळात खरी मदतीची गरज होती. अशांना दिलासा देण्याचे काम अशोक पाटील यांनी केले. “आदरणीय गणेश नाईक यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या जोरावर लोकहिताच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असे पाटील म्हणतात. भविष्यात प्रभागाचा अधिकाधिक विकास साधण्यासाठी, सर्वसामान्यांना उदरनिर्वाहाची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@