जनतेचा आधारवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

more_1  H x W:



कोरोना व ‘लॉकडाऊन’ काळात गरीब, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यावच्या पाठीशी उभे राहत महाराष्ट्र भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे आणि त्यांच्या मातोश्री माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका शैलजा अविनाश मोरे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, च्यवनप्राश, आयुर्वेदिक काढा, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य ठिकाणीही केली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


अनुप अविनाश मोरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षप्रभाग
क्र. : १५, पिंपरी-चिंचवड मनपा
संपर्क क्र. : ९८२३०४०६४०


मार्च महिन्याच्या २३ तारखेला ‘लॉकडाऊन’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि सर्वांची पळापळ झाली. अशातच कोरोना विषाणूसारख्या रोगाला टक्कर देताना सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे गरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनाच. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न उभा राहिला. अशावेळी समाजबांधवांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी पुढाकार घेऊन समाजाप्रतिची सेवा देण्यासाठी विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली समाजसेवा केली. यामध्ये त्यांच्या मातोश्री माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांची साथ मिळाली.


‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचे दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत होते. अशावेळी त्यांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था मोरे यांच्यातर्फे करण्यात आली. प्रभागातील गरजू लोकांना तांदूळ, गहू, तेल, तूरडाळ, हरभरा, मसाले आणि कडधान्य हे सर्व प्रकारचे धान्यवाटप करण्यात आले. यामध्ये ७५० लोकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांच्या प्रभागाव्यतिरिक्त इतर गरजू लोकांनाही गहू व तांदूळ वाटप करण्याचे ठरवले आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते पूर्णत्वास आणले. प्रभागांमध्ये ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये सर्व खबरदारी घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर करून त्यांनी सामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. स्वस्त दरात भाजीपाला व फळे घरपोच पोहोचविण्याची व्यवस्थाही अनुप मोरे आणि टीमने केली. या सर्व कामांमध्ये नगरसेविका शैलजा मोरेही सक्रियपणे सहभागी होत्या. अनुप मोरे यांनीही वैयक्तिकदृष्ट्या सर्व मदतकार्यांत लक्ष घालून प्रभागातील सोसायट्या व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये सॅनिटायझर वाटप केले तसेच औषध फवारणीही करून घेतली. एखादा कोरोना रुग्ण सापडला, तर त्या सोसायटीमध्ये दोन वेळा औषध फवारणी करून घेतली, जेणेकरून त्या परिसरामध्ये अधिक रुग्ण सापडू नयेत, याची खबरदारी पूर्णपणे घेण्यात आली. पुणे असो अथवा पिंपरी-चिंचवड येथील विविध प्रभागांमध्ये कामानिमित्ताने आणि शिक्षणाच्या निमित्ताने शहराबाहेरचे लोक येत-जात असतात. पण, ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना आपल्या गावी, आपल्या शहरात परतणे अशक्य होते. अशावेळी मोरे यांनी त्यांची व्यवस्था करून दिली. त्यांना ई-पास महानगरपालिकेकडून मिळवून दिले. जवळपास २०० नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी मदत केली. तसेच प्रभागामधील निगडी पोलीस स्टेशन व निगडी वाहतूक विभागामधील सर्व पोलीस कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर व कोरोनापासून बचावासाठी आरोग्यदायी साहित्याचे वाटपही करण्यात आले. त्यांच्या जेवणाची व नाश्त्याचीही सोय सर्व कार्यकर्त्यांनी करून दिली. ‘लॉकडाऊन’मुळे अनेक वयस्कर लोक घरीच होते. त्यांना बाहेर फिरण्यास सक्त मनाई होती. अशा वेळेस त्यांची औषधे पोहोचविण्याची व्यवस्थाही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभागांमध्ये केली. प्रभागांमध्ये ज्या लोकांना गरज पडेल, त्या ठिकाणी कार्यकर्ते सर्व खबरदारी घेऊन मदतीला धावून येत होते. प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले नियमावली पत्रक सर्वत्र वाटप करण्यात आले.


more_1  H x W:



गरीब, वंचित, शोषित व सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन समाजाप्रतिची सेवा देण्यासाठी मी व माझी आई नेहमीच तत्पर व सक्षम राहू. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना आपलंसं करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू.

प्रभागातल्या अनेक सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करून त्यांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. जवळपास अशा १५ हजार गोळ्यांचे वाटप करण्यात आले, तसेच आयुर्वेदिक काढा व तो किती प्रमाणात घ्यावा, याविषयीही योग्य त्या सूचना देण्यात आल्या. याच काळामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना, सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने सावरकर भवन येथे रक्तदान शिबीर आयोजित केले व जवळपास ५० कार्यकर्त्यांनी मिळून रक्तदान केले व ज्यांना गरज असेल त्या ठिकाणी ते पोहोचविण्याची व्यवस्थाही केली. याच काळामध्ये प्रभागांमध्ये एखादा कोरोना रुग्ण आढळल्यास, त्याला रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी मोरे यांनी प्रयत्नही केले. डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णाची विचारपूस केली. रुग्णाच्या संपूर्ण कुटुंबाला आधार देऊन त्यांच्या घरामध्ये रेशन भरून दिले. कोरोना व्यतिरिक्त प्रभागांमध्ये कचर्याडची समस्या, ड्रेनेजची समस्या, रस्ते, पाणी या विषयांसह अनेक प्रश्न सोडविले गेले आहेत, तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रमही प्रभागांमध्ये घेतले जातात. महाराष्ट्राचे भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे व मातोश्री नगरसेविका शैलजा मोरे यांनी पर्यावरणरक्षणासाठी १०० झाडांचे वृक्षारोपणही प्रभागामध्ये केले आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस समारंभाचे आयोजनही मोरे यांच्यातर्फे करण्यात येते. तसेच विविध विषयांसंबंधी समाजप्रबोधनही केले जाते. नुकतेच पिंपरी-चिंचवड शहरामधील संत ज्ञानेश्वर चौकामध्ये भाजपच्यावतीने चिनी बनावटीच्या वस्तूंचेही दहन करून नागरिकांना चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नये, असे आवाहनही त्यांनी केले व स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केले.
अनुप मोरे आणि शैलजा मोरे यांना मदतकार्य करताना गरजूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यांच्या मनात आपल्यासाठीही कोणीतरी झटत असल्याचा विश्वास निर्माण झाला. असा हा कोरोना आपत्तीचा काळ कोणीही विसरू शकत नाही. मात्र, यात समाजातील माणुसकीचे दर्शन झाले व ही माणुसकी यापुढेही दिसली पाहिजे, असे मोरे म्हणतात. हे सर्व काम करत असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, तसेच आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे मोरे सांगतात. ते म्हणतात की, “कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास एका फोनवर त्यांचे मार्गदर्शन सर्वांना मिळत होते. खरं तर हे काम एकट्याचे नसून, सर्व कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांचे आहे. या सर्व कामांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी निःस्वार्थीपणे समाजाप्रतिची सेवा दिल्यामुळे मदतकार्य शक्य झाले.”
@@AUTHORINFO_V1@@