मुंबईतील अंधेरीत सापडली तीन फुटांची मगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

crocodile_1  H

जुन्या विहिरीत मगरीचा वावर 


मुंबई (प्रतिनिधी) - अंधेरी परिसरातील एका विहिरीत सोमवारी तीन फुटांची एक मगर आढळून आली. वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांनी या मगरीला विहिरीबाहेर काढले. त्यानंतर वन विभागाच्या मदतीने या मगरीची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. 
 
 
 
 
मुंबईतील पवई, विहार आणि तुळशी तलावामध्ये मोठ्या संख्येने मगरींचा अधिवास आहे. मात्र, अधूनमधून मुंबईतील जुन्या विहिरी किंवा बांधकामासाठी खणलेल्या खड्यांमध्ये मगरीचा वावर आढळून येतो. अशाच प्रकारे अंधेरीतील मरोळ परिसरात सुरू असलेल्या बांधकामास्थळी एक विहरीत मगरीचा वावर आढळून आहे. विहिरीत तीन फुटांच्या मगरीचे वास्तव्य होते. सर्प-इंडिया या वन्यजीव बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी या मगरीला विहिरीबाहेर काढले. यामध्ये सर्प-इंडियाचे स्वयंसेवक अरबाज खान, शेल्डोन डिसुजा, मितेश सोळंकी आणि उन्मेश यांचा सहभाग होता. मगरीला विहिरीबाहेर काढल्यानंतर पशुवैद्यक डाॅ. सुनेत्रा वाडके यांच्याकडे मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मगरीची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली. 
@@AUTHORINFO_V1@@