गवा आला रे ! ज्ञानगंगा अभयारण्यात प्रथमच गव्याचे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020
Total Views |
indian gaur _1  

वाघानंतर गव्याचे आगमन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये प्रथमच रानगव्याचे दर्शन घडले आहे. रविवारी वन गस्तीदरम्यान कर्मचाऱ्यांना गव्याचा वावर आढळून आला. त्यामुळे या अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे नवीन पाहुण्याचे दर्शन होणार आहे. 
 
 
बुलडाणा जिल्ह्यात १९९७ साली ज्ञानगंगा अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर रोजी सी-वन-टी-वन नामक वाघाने टिपेश्वर ते ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत १ हजार ३०० किमीचे स्थलांतर केले. जगातील सर्वात मोठ्या व्याघ्र स्थलांतराची ही नोंद आहे. या वाघाचे वास्तव्य आजही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आहे. आता अभयारण्यात रानगव्याच्या रुपाने नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रविवारी जंगलात गस्तीसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना उत्तर देव्हारी वनपरिक्षेत्रातील बोथा येथे अचानकपणे गव्याचे दर्शन घडले. शेषराव कांडेलकर यांनी गव्याचे छायाचित्र मोबाई टिपले. हा रानगवा नेमका कुठून आला असावा, याबाबत वनकर्मचाऱ्यांकडून शोध घेण्यात येणार आहे. 
 
 
 
यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे. या कालावधीत बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व परिसारचे व्यवस्थित नियोजन केल्याने फार मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी म.द.सुरवसे यांनी दिली. या गवताची उंची सुमारे ९ ते १० फूट असून त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या वन्यजीवांना संचार करण्यासाठी पुरेपुर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. 

@@AUTHORINFO_V1@@