वन्यजीवांना ओलांडण्यासाठी महामार्गावर बांधला पूल; हे प्राणी करत आहेत वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020
Total Views |

overpass_1  H x


'ओव्हरपास' वरुन वन्यजीवांचा वावर

मु्ंबई (प्रतिनिधी) - अमेरिकेतील युटा शहरातील महामार्गावर खास प्राण्यांसाठी बांधण्यात आलेल्या पुलावरुन वन्यजीवांचा वावर सुरू झाला आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या वन्यजीवांचा विचार करुन येथील सहा पदरी महामार्गावर हा पूल बांधण्यात आला होता. या पुलावरुन आता विविध प्रजातीचे वन्यजीव ये-जा करत असल्याचा व्हिडीओ युटा वन्यजीव विभागाने प्रसिद्ध केला आहे.
 
 
युटा देशातील साॅल्ट लेक शहरामधील इंटरसेट ८० महामार्ग हा जंगलाला छेदून जातो. या महामार्गावर २०१६ ते २०१७ या एका वर्षात १०६ वन्यजीवांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यामध्ये ९८ हरिण, तीन मूस, दोन रकून्स, दोन एल्क आणि एक कुगरचा समावेश होता. वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन २०१८ साली येथील वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक विभागाने महामार्गावरुन जाणारा पूल बांधला. ५० फूट रुंद आणि ३२० फूट लांबीचा हा पूल तयार करण्यात आला. प्राण्यांनी या पूलावरुनच जाण्यासाठी महामार्गाला फेन्सिंग लावण्यात आली. त्यानंतर येथीव वन्यजीव विभागाने पुलावर वन्यजीवांना पूरक असा अधिवास निर्माण केला आणि पुलावर कॅमेरा ट्रॅप लावून त्यावरुन जाणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. 
 

wildlife _1  H  
 
गेल्या दोन वर्षांमध्ये वन्यजीवांना या पुलाचा वापर केला आहे. वन्यजीव विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या पुलावरुन कुगर, मारमोट्स, हरिण, मूस, अस्वल आणि साळींदरसारखे प्राणी ये-जा करत असल्याचे व्हिडीओ टिपण्यात आले आहेत. अशा प्रकारे महामार्गांवर वन्यजीवांचा विचार करुन बांधण्यात येणाऱ्या पुलांना आॅव्हरपास म्हटले जाते. कॅलिफोर्निया येथे बांधण्यात येणारा जगातील सर्वात मोठा 'आॅव्हरपास' हा पुढल्या वर्षी खुला होणार आहे. येथील सॅन्ट मोनिका माऊंट्न्स परिसरातील '१०१ फ्रीवे' या दहा पदरी महामार्गावर १६५ फुट रुंद आणि २१० फूट लांबीचा 'आॅव्हरपास' बांधण्यात येत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@