सकारात्मक दृष्टिकोन आणि रोगप्रतिकारक शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020
Total Views |

rog_1  H x W: 0
 
 
 
रोगप्रतिकारक शक्ती सशक्त करण्यासाठी केवळ शारीरिक पातळीवर प्रयत्न करून चालत नाही, तर मानसिक पातळीवर जोपर्यंत बदल घडत नाहीत तोपर्यंत रोगप्रतिकारकशक्ती शक्तिशाली होत नाही. जसे आपण पाहिले की मानसिक स्थितीचा शरीरातील संप्रेरकस्राव व रक्ताभिसरण यांच्यावर सततचा परिणाम होत असतो. माणसाच्या भावनिक बदलांमुळे व ताणतणावामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होत असतो. मानसिक ताणतणाव हा किचकट प्रकार आहे व तो समजावून सांगणेही फार कठीण आहे. कारण, एखाद्या माणसासाठी तणावदायक स्थिती ही दुसऱ्या माणसासाठी सहजस्थिती असू शकते. तसेच एखाद्या माणसाला मोठा वाटणारा ‘प्रॉब्लेम’ हा दुसऱ्यासाठी अतिशय क्षुल्लक असा असू शकतो. बरेचदा ताणतणाव हा रोगप्रतिकारक शक्तीचा संबंध जाणून घेण्यासाठी आपण सहसा जुने ताणतणाव शोधत राहतो. पण आपण ‘इंटर पर्सन रिलेशनशिप’ (IPR )चा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याशिवाय परस्पर संबंधांचा अभ्यास करणे कठीण होते. हे परस्पर संबंध कौटुंबिक असू शकतात किंवा व्यावसायिक असू शकतात. सकारात्मक दृष्टिकोन हा यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. ताणतणाव हे सर्वच लोकांना असतात. परंतु, ते आपण कसे हाताळतो, हे फार महत्त्वाचे असते. सकारात्मक दृष्टिकोन हा भावनिक, वैचारिक व आध्यात्मिक पातळीवर असणे फार गरजेचे असते. भावनिक ताण चांगल्याप्रकारे हाताळणे उपयुक्त ठरते.
 
 
बौद्धिक पातळीचे विचार हे नेहमी भावनिक पातळीवरील विचारांपेक्षा वरचढ असले पाहिजेत. परमेश्वराने माणसाला सद्सद्विवेकबुद्धी दिली आहे. या बुद्धीचा योग्यप्रकारे वापर करुन त्यांच्याद्वारे कुठलेही आव्हान पेलण्याची ताकद मानवी मनामध्ये आली पाहिजे, तरच माणसाची सहजता टिकून राहते व माणसाला ’ऊळी-शरीश’ म्हणजेच आजार होत नाहीत. कारण, जेथे ’शरीश’ म्हणजे सहजता निघून जाते तो ’ऊळी-शरीश’ म्हणजेच म्हणजे आजार.
 
 
याच सद्सद्विवेकबुद्धीने आपण-
 
१. परिस्थितीचा नीट अंदाज घेऊ शकतो.
 
२. आपली ताकद व प्रतिकार करण्याची क्षमता ओळखू शकतो.
 
३. कुठल्या तणावपूर्व परिस्थितीत कसे निर्णय घ्यावे व वागावे, हे समजून घेऊ शकतो.
 
४. कुठल्याही गोष्टीतील न्यूनता व कुठल्याही गोष्टीतील अतिरेक टाळू शकतो.
 
 
५. बौद्धिक पातळीवर विचार केल्याने आपण प्रतिकुल परिस्थितीवर मात करु शकतो. जसे क्रिकेटमध्ये तिसरा पंच (थर्ड अम्पायर) तटस्थ पद्धतीने अचूक निर्णय देतो, त्याचप्रमाणे जर आपल्या भावनांना, विचारांना व विकारांना बुद्धीच्या हवाली केले की, आपला ताण आपोआपच कमी होतो. जसे अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण जर विचार व विकारांच्या दोऱ्या बुद्धीच्या हातात दिल्या, तर आपल्या शरीरात सकारात्मक बदल होऊन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते व पर्यायाने कुठल्याही आजाराला शरीरात येऊ न देण्याचे महत्त्वाचे काम ती करत असते.
 
- डॉ. मंदार पाटकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@