भावनिक तणावाचा ‘रेड सिग्नल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020
Total Views |

Mental Stress_1 &nbs
 
 
 
बऱ्याचवेळा अमुक असा शारीरिक आजार नसताना अनेक शारीरिक लक्षणे व्यक्तीला जाणवतात. कितीही तपासण्या केल्या तरी नक्की व्याधी काय आहे, हे कळत नाही. अशावेळी या समस्या मानसिक तणावाशी निगडित असतात.
 
 
 
अलीकडे आपण अनेक अशा घटना पाहत असतो, ज्या आपल्याला हादरवून सोडतात. आजकाल प्रत्येक गोष्ट आपल्याला अतीव नाराज करताना दिसते. आपल्याला कोविडच्या या महामारीत आरोग्याची चिंता वाटते, आपल्या प्रियजनांची चिंता वाटते, अनेक लोकांवर होणाऱ्या अन्यायाचा राग येतो, निरागस लोकांच्या खूनाचा संताप येतो, निसर्गाच्या कोपात देशोधडीला लागलेल्या लोकांबद्दल मन भरुन येते. या सगळ्या गोष्टींचे काय करायचे त्यांना कसे रोखायचे, हेच आपल्याला कळत नाही. मनात अशा पद्धतीने भावनांचा कोंडमारा होतो, तेव्हा खरेतर सांगता येत नाही आणि सहन होत नाही, अशी आपली स्थिती होते. अशा प्रकारचं भावनिक थकणं बऱ्याच वेळा अनेकांना सहन होत नाही, त्यातून आपण बाहेर येऊ शकणार की नाही, याची खात्री भल्याभल्यांना देता येत नाही. मनाची ताकद जणू संपल्यातच जमा होते. आता या अफाट विश्वात आपले काही खरे नाही, हा विचार मनात थैमान घालतो. सगळे आता आपल्या आवाक्याच्या बाहेर जात आहे, या जाणिवेने माणसं खचून जातात.
 
 
 
आपल्या मनात उदासीन छाया डोकावणं किंवा काहीतरी वाईट नकळत होईल याची चिंता सोकावणं किंवा आपण कुठला निर्णय घेऊन या भावनिक कल्लोळातून हरवून जाणं, या गोष्टी अमुक दुर्दैवी लोकांच्या बाबतीतच होतात, असे नाही. त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी होतात. किंबहुना, त्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत हे खरे. पण, कधी कधी या गोष्टी आपल्या गळ्याशी येतात तेव्हा जाणवतं की, या यातनांमधून कशीबशी सुटका करुन घ्यायलाच हवी, हे सगळं खरंतर असाहाय्य आहे. अशावेळी लक्षात घ्यायला पाहिजे की, आपलं मन सुटकेसाठी धडपडत आहे. अर्थात, महत्त्वाचा घटक या आक्रंदणाऱ्या अनुभवात आपल्याला होणारा हा त्रास किती आहे, याची जाणीव असण्याचा हा त्रास किती तीव्र आहे, किती काळ तर आपल्याबरोबर असणार आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनात किती दूरवर परिणाम होणार आहे, हे पारखणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात या उद्वेगामुळे होणारे परिणाम आपल्याला ओळखता आले, तर उत्तम! जसं उच्च रक्तदाब वा मधुमेह या जीवनशैलीविषयक आजारात आपल्याला या आजाराच्या तीव्रतेची लक्षणे ओळखणे आवश्यक आहे, तसेच आपल्याला होणाऱ्या मन:स्तापाची लक्षणे ओळखता आल्यास आपण उपाययोजना करु शकतो. मन:स्तापात जर वाहत गेलो, तर एकवेळ अशी घातक असते की व्यक्तीचा जीवन संपवून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे वाटतं. अर्थात, अथक समस्येवरही पर्याय असतात व त्यासाठी मदतीची गरज असते. खालील काही लक्षणे आपण ओळखायला हवीत.
 
 
 
झोपेची तक्रार ही अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला झोप येत नाही वा सतत झोपून राहावे असे वाटत असेल, इतर काही आजार नाही, पण मन:स्ताप आहे, तर आपल्याला हा ‘रेड सिग्नल’ असतो. मन:स्ताप आहे तर आपल्याला हा ‘रेड सिग्नल’ असतो. मन:स्ताप आपली सीमारेषा पार करुन आपल्या अस्तित्वावर घाला घालत आहे, ही जाणीव माणसाला लगेच व्हायला हवी. ज्या क्षणांना आपण निद्रेच्या आहारी बिनधास्त जात असू ते क्षण आता तितके मैत्रीपूर्ण वाटत नाहीत. रात्र वैऱ्याची वाटू लागते. तेव्हा आपल्याला मन:स्तापाचे काहीतरी नियोजन करायला हवे हे खरे.
 
 
भावनिक ताणाचे आणखी अतिशय महत्त्वाचे लक्षण म्हणजे आपल्या भुकेवर होणारा आघात. आपली भूक कमी होते किंवा वाढते, त्यानुसार वजन घटते किंवा अती वाढते. भुकेत आणि वजनात होणारी वाढ किंवा घट हे ‘डीप्रेशन’चे महत्त्वाचे लक्षण आहे, याची वेळीच दखल घ्यायला हवी.
 
 
बऱ्याचवेळा अमुक असा शारीरिक आजार नसताना अनेक शारीरिक लक्षणे व्यक्तीला जाणवतात. कितीही तपासण्या केल्या तरी नक्की व्याधी काय आहे, हे कळत नाही. अशावेळी या समस्या मानसिक तणावाशी निगडित असतात. यामध्ये डोकेदुखी, पोटदुखीसारख्या समस्या असतात. पण, त्यामुळे आपलं दैनंदिन जगणं समस्यापूर्ण होतं. आपण बऱ्याचवेळा असंही पाहतो की, आपल्या भावना आपल्याला पेलायला जमत नाही. आपल्याला प्रचंड राग येतो, चीड येते. आपण आपल्या नेहमीच्या प्रियजनांशी वा मित्रमैत्रिणीशी जमवून घेता येत नाही. शेवटी ती मंडळीसुद्धा वैतागतात, चिडतात, अशी परिस्थिती जी तुमच्यासाठी धोकादायक आहे. तुमच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी घातक आहे. कारण, अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला काबूत ठेवू शकत नाही आणि टोकाचे निर्णय घेता. जवळच्या व्यक्तीही दूर निघून जातात व तुम्ही एकटे पडता. एकूण मनस्ताप हा जितक्या लवकर आवरता येईल तितक्या लवकर आवरला पाहिजे. पुढची लक्षणे पुढच्या लेखात पाहू.
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@