कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी

    07-Dec-2020   
Total Views |

Prakash More_1   
 

 
 
प्रकाश मोरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : ५८
संपर्क क्र. : ९८२०१ ७४८०६

 
 
कोरोनामुळे सामान्य नागरिक, छोटे व्यापारी तसेच अनेक गटांची दैना उडाली. परंतु, या कोरोनासारख्या भीषण महामारीसमोर एक भिंत बनून नागरिकांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या जनतेच्या प्रतिनिधीने आपल्या नागरिकांना कोरोनाच्या राक्षसाशी लढण्यास मदत केली. त्यांना धीर दिला आणि सर्वोपरी साहाय्यही केले. तेव्हा, जाणून घेऊया नवी मुंबई प्रभाग क्रमांक ५८चे माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या कोरोना लढ्याबद्दल...
 
 
 
जगामध्ये कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला. व्यावहारिकदृष्ट्या नवी मुंबईला एक वेगळी ओळख आहे. त्यामध्ये प्रभाग ५८ मध्ये एपीएमसी मार्केट असल्याने सुरुवातीला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका येथील नागरिकांनाही बसला. यावेळी प्रभागाचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक प्रकाश मोरे हे नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात स्वच्छ करणे, तसेच श्वासापासून पसरणाऱ्या या रोगापासून वाचण्यासाठी ‘मास्क’ हे केंद्र, तसेच राज्य प्रशासनाने अनिवार्य केले होते. परंतु, या गोष्टींचा तुटवडा आणि भाववाढ यामुळे नगरसेवक प्रकाश मोरे यांनी प्रभागामध्ये सर्वप्रथम मास्कवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण परिसरामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले.
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने परिसरामध्ये मूलभूत गरजांचा तुटवडा जाणवू लागला. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर याचा होणारा परिणाम बघता, प्रकाश मोरे यांनी प्रभागातील गरजू कुटुंबांना मोफत भाजीपाला आणि धान्यवाटपाचा कार्यक्रम राबविला. यावेळी केंद्र तसेच राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत त्यांनी अनेक गरजू लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्याचे काम केले. यामुळे रोजंदारीवर रोजगार असणाऱ्या कामगार गटाचा चांगला लाभ घेतला. यामध्ये त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका शिल्पा प्रकाश मोरे यांनीदेखील प्रभागातील नागरिकांची मदत केली. अनेक ठिकाणी भाजीपाला स्वस्त दरात उपलब्ध करत काही सेंटरदेखील चालू केले.
 
 
प्रभागामधील किराणा दुकानांच्या मालकांशी संवाद साधून अन्नधान्य, तसेच कडधान्य माफक दरात उपलब्ध करून दिले. नागरिकांना किमान नेहमीच्या वापरातील सर्व गोष्टींचा पुरवठा होत राहील, तेही नियमांतर्गत याचीदेखील त्यांनी काळजी घेतली. त्यानंतर जनतेच्या मागणीनुसार प्रभागातील संपूर्ण सोसायटी, पार्किंग लॉट आणि आजूबाजूच्या परिसराचेदेखील स्वखर्चातून निर्जंतुकीकरण केले. सफाई कर्मचाऱ्यांनादेखील सुरुवातीच्या काळामध्ये ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनामुळे पोटाची खळगी भरण्यास हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यांच्या कुटुंबासाठी प्रकाश मोरे यांनी मोफत अन्नधान्य वाटप केले.
 
 
नगरसेवक म्हणून प्रभागाची मदत करताना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनीदेखील मार्गदर्शन केले. गणेश नाईक यांच्यासमवेत प्रकाश मोरे यांनी कोरोनासारख्या कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांना कोरोनाशी लढण्याचे एक बळ निर्माण करून दिले. आयुष मंत्रालयाने परवानगी दिलेल्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे दोनदा वाटप करण्यात आले. यावेळी पहिल्यांदा पाच हजार, तर दुसऱ्यांदा चार हजार नागरिकांपर्यंत या गोळ्या पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. या गोळ्यांमुळे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरिकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवली. एवढेच नव्हे, तर अनेक वेळा लोकांमध्ये कोरोनाची जी भीती बसली होती, ती दूर करण्याचेदेखील काम त्यांनी यावेळी केले.
 
 

Prakash More 1_1 &nb 
 

"कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे प्रभागातील नागरिकांची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे त्यांनी मला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर माझे हे कर्तव्य आहे की, मी या संकटकालीन परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत उभे राहावे. याशिवाय नागरिकांची चांगली साथ आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी, माझे कर्तव्य पार पाडत राहीनच!"

 
 
 
प्रभागामध्ये एक ‘कोविड सेंटर’ उभारले गेले होते. तिथे दररोज नवीन रुग्ण भरती होत होते. ज्यांचा परदेश प्रवासाचा इतिहास होता, त्यांनादेखील सुरुवातीला या सेंटरमध्ये ठेवण्यात आले. कोरोना रुग्णांना कोणत्याही व्यक्तींना भेटण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे त्यांचे नातेवाईक चिंतेत असायचे. अशा वेळेस ‘कोविड सेंटर’मध्ये भरती झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामधील दुवा म्हणूनदेखील काम केले. नवीन रुग्णांना रुग्णालयात भरती होण्यापासून त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या देखभालीबद्दल सतत चौकशी करणे, ही जबाबदारीदेखील त्यांनी पार पाडली. संपूर्ण नवी मुंबईचे रुग्ण हे या ‘कोविड सेंटर’मध्ये भरती होत असल्याने त्यांची सेवा करण्याचीदेखील संधी त्यांना मिळाली. यामध्ये स्थानिक नागरिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
 
 
एवढेच नव्हे, तर सुरुवातीला प्रभागामध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून येत होते. यावेळी सर्वांसमोरच गंभीर परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळेस उपचार घेता यावे, यासाठी प्रकाश मोरे यांनीदेखील प्रयत्न सुरू ठेवले. नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘कोविड सेंटर’ अथवा रुग्णालय किंवा रिलायन्स, अपोलो, फोर्टिससारख्या खासगी रुग्णालयांत रुग्णांना योग्य उपचारांसाठी प्रवेश मिळावा, यासाठीही त्यांनी मदत केली. तसेच, परिसरामध्ये काही ज्येष्ठ नागरिकही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले होते. अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रकाश मोरे यांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहनाचा बंदोबस्त करण्यापासून ते प्रवेश मिळवून देण्यापर्यंत सर्व मदत केली. काही रुग्णांना एक कर्तव्य म्हणून आर्थिक सहकार्यदेखील केले. काहींचे बिल कमी करून देण्यासही त्यांनी मदत केली.
 
 
प्रभागामध्ये ‘एपीएमसी’ मार्केट असल्यामुळे तिथेदेखील कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव होता. तेथील व्यापाऱ्यांना, नागरिकांनादेखील योग्य मार्गदर्शन आणि मदतीची गरज होती. यावेळी प्रकाश मोरे यांनी यासंदर्भाचा आढावा घेत, कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे म्हणून प्रयत्न केले. रुग्णालयात भरती करण्यासाठी स्वतःहून हातभार लावला.
 
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रकाश मोरे यांना, कार्यकर्त्यांसह प्रभागातील सर्व जनतेने सहकार्य केले. यावेळी परिसराची स्वच्छता राखली जाते आहे की नाही, हे पाहण्यापासून ते कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वत्र नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही, यावर त्यांचे लक्ष होते. शिवाय, अधूनमधून ते लोकांशी डिजिटल मीडियाद्वारे संवादही साधत होते. ‘लॉकडाऊन’ काळामधील नागरिकांच्या काय समस्या आहेत, हेदेखील ते वेळोवेळी जाणून घेत होते. भाजप, नवी मुंबईने आयोजित केलेल्या ‘संवाद आपुलकीचा’ या ऑनलाईन संवाद कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रभागातील डॉक्टरांशी तसेच नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी कोरोनापासून मुक्त होण्यास मदत केलेल्या रुग्णांनी प्रकाश मोरे यांचे आभार मानले. शिवाय, कोरोनाबद्दल जनजागृती करण्याचेदेखील कार्य या कार्यक्रमामार्फत केले.
 
 
नगरसेवक प्रकाश मोरे, त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका शिल्पा मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीदेखील लोकांकडून मिळत होती. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, तसेच लोकांच्या सेवेला सदैव तयार राहणे, हेच भविष्यातील त्यांचे धोरण आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अभिजित जाधव

मुंबई विद्यापीठातून मास मीडियामध्ये पदवी शिक्षण. पुणे विद्यापीठातून मास मीडिया आणि जर्नालिझममध्ये पदव्युत्तर शिक्षण. ब्रॉडकास्ट जर्नालिझम आणि फिल्म प्रोडक्शनमध्ये डिप्लोमा. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहे.