मदतकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020   
Total Views |

Amit Medhkar 1_1 &nb
 
 
 
कोरोनाच्या प्रादुर्भावाने नवी मुंबईमध्ये थैमान घातले असताना, अनेक नागरिकांना ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागला. कित्येकांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली. अनेकांना रोजगार गमवावे लागले. या सगळ्यांच्या मदतीसाठी धावून आले ते कोविड योद्धे. या कोरोनायुद्धात नागरिक आणि कोरोनामध्ये ढाल बनून उभे असलेल्या माजी नगरसेवक अमित मेढकर यांच्या कार्याचा हा आढावा...


अमित मेढकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
कार्यक्षेत्र : प्रभाग क्र. ७१
संपर्क क्र. : ९८१९८ ७९४९४

 
दि. २२ मार्च, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. बाहेरील देशांप्रमाणे भारतातही कोरोनाचा प्रसार होऊ लागला होता. यामुळे राज्याराज्यांत कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. अनेक जण बेरोजगार झाले. अन्नधान्याची गैरसोय होऊ लागली. हातावर पोट असणार्‍या कामगारांना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली. अशामध्ये नागरिकांची आणि गरजू व्यक्तींची मदत करण्यासाठी नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक अमित मेढकर यांनी पुढाकार घेतला. प्रभाग ७१ हनुमान नगर, तसेच प्रभाग ६९ आणि प्रभाग ७३ मधील नागरिकांची मदत केली. यामध्ये त्यांचे सहकारी समाजसेवक गणेश मेढकर आणि अंकुश मेढकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांचीही मोठी साथ लाभली. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाने मास्क वाटपापासून नागरिकांना अन्नधान्याची सोय करून देण्यापर्यंत सर्वतोपरी मदत त्यांनी केली. आपल्या प्रभागातून कोरोनाचा नायनाट व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. जाणून घेऊया त्यांच्या या कार्याचा लेखाजोखा...
 
 
 
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अमित मेढकर यांनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये कोरोनाबद्दलची जनजागृती सुरू केली. कोरोना विषाणूचा प्रसार हा तोंड आणि नाकावाटे होतो. तसेच, सुरुवातीच्या काळात बाजारामध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असल्यामुळे अनेक नागरिकांना मास्क उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे प्रथम प्रभागानुसार त्यांनी घरोघरी मास्कवाटपाचा कार्यक्रम राबविला. यावेळी प्रभाग क्रमांक ६९, इंदिरानगरमध्ये तीन हजार मास्कवाटप केले. त्यानंतर प्रभाग क्रमांक ७१, हनुमाननगरमध्ये पाच हजार, तसेच प्रभाग क्रमांक ७३ तुर्भे नाका येथे जवळजवळ सात हजार मास्कवाटप केले. त्यानंतर आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून होमियोपॅथिक औषधाला परवानगी दिली होती. याचे फायदे लक्षात घेता, अमित मेढकर यांनी तिन्ही प्रभागांमध्ये तीनवेळा ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे वाटप केले. यावेळी प्रभाग क्रमांक ६९ मध्ये २,५०० कुटुंबांना, प्रभाग ७१ मध्ये तीन हजार कुटुंबांना, तर प्रभाग क्रमांक ७३ मध्ये ४,५०० कुटुंबांना या औषधाचे वितरण मोफत करण्यात आले. याव्यतिरिक्त संपूर्ण प्रभागामध्ये आठवड्यातून एकदा जंतुनाशक फवारणी करण्याचे कामदेखील त्यांनी योजून दिलेले आहे.
 
 

Amit Medhkar_1   
 
 
 

"कोरोनाची महामारी आणि ‘लॉकडाऊन’मुळे प्रभागामध्ये अनेक कुटुंबं रस्त्यावर आली होती. त्यामुळे या प्रभागाचा एक प्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी काम करणे हे माझे कर्तव्य होते. यामागे कोणीही उपाशी झोपू नये, तसेच कोरोनापासून सर्वाधिक कुटुंबांचा बचाव व्हावा, हेच यामागचे उद्दिष्ट होते."

 
 
 
‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाची महामारी, यामुळे अनेक लोकांना कामधंदा मिळणे कठीण झाले होते. खासकरून हातावर पोट असणार्‍या मजुरांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अतोनात हाल झाले होते. यावेळी अमित मेढकर यांनी कार्यकर्ते आणि सहकार्‍यांच्या साहाय्याने तिन्ही विभागांमध्ये दोनवेळा मोफत भाजीपाला आणि फळवाटप घरपोच करण्यात आले. यावेळी अंदाजे तीन हजार कुटुंबांना मोफत भाजीपाला देण्यात आला. ज्या गरजू कुटुंबांमध्ये लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, अशा अंदाजे दोन हजार कुटुंबांमध्ये भाजीपाल्यासह मोफत फळवाटपही करण्यात आले. याव्यतिरिक्त गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल ७०० गरजू कुटुंबांना तयार जेवण देण्याचेदेखील काम त्यांनी प्रभागांमध्ये केले आहे. यामध्ये भाजप आमदार गणेश नाईक यांचे मोठे सहकार्य लाभले. तसेच समाजसेवक गणेश मेढकर आणि अंकुश मेढकर यांचीदेखील चांगली साथ लाभली. प्रभागांमध्ये आपल्या उपक्रमांचा फायदा पोहोचावा, यासाठी अमित मेढकर यांच्या साथीला कार्यकर्त्यांच्या मेहनतीची चांगली जोड लाभली होती.
 
 
 
माजी नगरसेवक अमित मेढकर यांच्या पाठपुराव्यानंतर त्यांच्या प्रभागापासून नवी मुंबईत ‘मास स्क्रीनिंग’ तपासणी शिबिराला सुरुवात झाली. ‘मास स्क्रीनिंग’ला सुरुवात झाल्यानंतर सर्व नागरिकांची तपासणी ही एका शाळेमध्ये करण्यात आली. प्रभागातील सर्व नागरिकांची तिकडे तपासणीसाठी गर्दी होऊ लागली. यामुळे परिसरामध्ये ‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका वाढण्याची शक्यता होती. हा धोका लक्षात घेता, अमित मेढकर यांनी पुढाकार घेत कार्यकर्ते, आशा सेविका आणि काही डॉक्टर यांच्या टीम करून घरोघरी जाऊन ‘मास स्क्रीनिंग’ करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी काही डॉक्टर्स आणि परिचारिका, काही आशा सेविका आणि काही स्थानिक कार्यकर्ते अशी ३० जणांची टीम तयार केली आणि घरोघरी ‘मास स्क्रीनिंग’ करण्यात आले. प्रभागामध्ये झोपडपट्टीचा भाग असल्याने तिथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जात नव्हते. सुरुवातीला काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले. काही ‘हॉटस्पॉट’ लक्षात आल्यानंतर त्या भागामध्ये कोरोनाबाबत आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांबाबत जनजागृतीचे काम केले. कोरोना झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, म्हणून वेळेस विलगीकरण करण्यात आले. अशाप्रकारे दोन वेळा ‘मास स्क्रीनिंग’ करण्यात आले. याशिवाय त्यांनी ‘५० प्लस मास स्क्रीनिंग’ हा उपक्रमदेखील राबविला. ५० वर्षीय व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह किंवा अशा प्रकारच्या काही ‘हाय रिस्क’ रुग्णांवर जास्त काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांनीदेखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
 
 
 
अमित मेढकर यांनी प्रभागाचे पालकत्व घेत, तेथील नागरिकांनी कोरोनाच्या या संकटात योग्य काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रभागामध्ये जे कोरोना रुग्ण आढळून आले, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी मदत केली. अमित मेढकर यांनी फक्त कोरोना रुग्णांसाठीच नाही, तर इतर कोणत्याही रुग्णांसाठी आणि गरोदर महिलांसाठी २४ तास रुग्णवाहिका सेवा चालू केली आहे. सुरुवातीला काही रुग्णालयांनी प्रमाणापेक्षा जास्त बिल आकारण्याचे धोरण चालू केले होते. यावेळी अमित मेढकर यांनी रुग्णांना बिलाची वाढीव रक्कम कमी करून देण्यातही मदत केली. तसेच, प्रभागातील काही गरोदर महिलांना प्रसूतीसाठी नवी मुंबईतील काही रुग्णालयांत भरती करून घेतले जात नव्हते. यामुळे त्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता. यावर अमित मेढकर यांनी नवी मुंबईतीलच रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांचे उपचार व्हावेत, अशी मागणी केली. तसेच, प्रसूती रुग्णालयात आयसीयू आणि एनआयसीयूमधील बेड्सची संख्या वाढवावी, अशीदेखील मागणी केली होती. भाजप, नवी मुंबई आयोजित ‘संवाद आपुलकीचा’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर, स्थानिक नागरिक तसेच कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांशीदेखील संवाद साधला. माजी नगरसेवक अमित मेढकर यांच्या या कामगिरीमुळे समाजभान राखत संकटसमयी प्रभागाचे नेतृत्व करणारा नेता कसा असावा, याचा आदर्श डोळ्यांसमोर उभा राहतो.
 
@@AUTHORINFO_V1@@