गोधडी-गादी ते फिल्म पाहण्याची सोय, वाचा! कसे सुरू आहे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

k4_1  H x W: 0
 
 



नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघु बॉर्डरवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आपल्या मागण्या आणि आंदोलनाची जागांवर ठाम आहेत. करनाल महामार्गावर जिथवर नजर जाईल तिथवर ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर ट्रॉलींच्या रांगा आहेत. शेतकरी इथे पोहोचून नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. देशभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. दररोज आंदोलन मजबूत होताना आणि दिवसेंदिवस संगठीत होताना दिसत आहे.
 
 
डॉक्टरही सेवेला 

सुरुवातीचा काही काळ ट्रॅक्टर-ट्रॉली आणि गाड्या अस्ताव्यस्त पडून होत्या. शेतकऱ्यांच्या गटातटातही ताळमेळ दिसत नव्हता. एक कुठलाही ठोस असा मंच दिसत नव्हता, आयोजकांच्या गैरसोयींमुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. मात्र, आता जसजसा आंदोलनाला पाठींबा मिळू लागला तसतशी ही व्यवस्थाही चोख ठेवण्यात शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना यश मिळत आहे.
 
 
 
k4_4  H x W: 0
 

 
 कृषी विषयक चित्रपट, डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन  
 
 
पंजाबच्या शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीपेक्षा दैनंदिन व्यवस्था अधिक बऱ्या झाल्याचे सांगण्यात आले. पोटभर जेवणाची सोयही करण्यात आली आहे. तसेच २४ तास डॉक्टरही उपलब्ध आहेत. रुग्णांवर इलाजही मोफत केला जात आहे. सकाळी उठल्यावर पूजा अर्चा करण्यासाठी साधना करण्यासाठी जागा आहे. त्यासोबतच दिवसभर आंदोलनानंतर रात्री मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचीही सोय करण्यात आली आहे. सर्व शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे. संघर्ष आहे. मात्र, त्या संघर्षामध्येही एक उत्साह दिसत आहे.
 
 
 

k4_3  H x W: 0
 


 
झोपण्याची व्यवस्था  
 
 
 
आंदोलनाच्या सुरुवातीला काही शेतकरी लहान लहान गाड्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था करत होते. झोपण्याची व्यवस्थाही नव्हती. थंडीत कुडकुडत रहावे लागत होते. मात्र, आता साऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. आता आंदोलनात स्त्रीयाही सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांना रात्री झोपण्यासाठी गाद्या आणि उशांची सोय मदत करणाऱ्यांनी केली आहे.
 
 
खासगी संस्थांचे पाठबळ 
 
पंजाबमधून आलेले शेतकरी पूर्वीपासून आपली सामग्री घेऊन आले आहेत. तर ज्यांच्या जवळ वस्तू नाहीत त्यांना गुरुद्वारा आणि खासगी संघटनांनी मदत करून उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे मोठा जमाव एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी कृषी संघटनांनी चिकित्सालय सुरू केली आहेत. फार्मासिस्टसह डॉक्टरही उपलब्ध आहेत. डॉक्टर शेतकऱ्यांवर मोफत उपचार करत आहेत. तसेच औषधेही मोफत दिली जात आहेत.
 
 

k4_2  H x W: 0  
 
लंगरमध्ये विद्यार्थी बनले सेवेकरी 
 
 
लंगरच्या बाबतीतही अशीच सोय आहे. शेतकरी इथे येऊन आपापल्या माणसांच्या सोयीसाठी लंगर लावत आहेत. देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या शेतकऱ्यांच्या जेवण पद्धतीतही विविधता आहे. काही विद्यापीठातील विद्यार्थी लंगरमध्ये सेवा देत आहेत. मुस्लीम कृषी संघटना शेतकऱ्यांसाठी बिर्याणीही बनवत आहेत.
 

 
ऑनलाईनही कनेक्ट 
 
शेतकऱ्यांमधील आपापसातील संवाद आणि संचारही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. शेतकरी पूर्वी प्रत्येक सूचनेवर प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून होते. आता शेतकऱ्यांचा स्वतःचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला आहे. शेतकरी आंदोलनाने आता एक औपचारिक स्वरुप घेतले आहे. संध्याकाळी होणारी सभाही शिस्तबद्ध होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत संवादही आपोआप विनाअडथळा पोहोचत आहे. इकडे सिंघु बॉर्डरवर कित्येक किमी दूर मागे हरियाणाच्या सीमेवर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन उभे आहेत.
 
 

k4_1  H x W: 0  
 
 
 
प्रदर्शन केंद्रावर दिनक्रमही ठरलेला आहे. पेट्रोल पंपाजवळ पाण्याचे टँकर उभे आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या अंघोळीची व्यवस्था केली जाते. कपडे सुकवण्यासाठी दोऱ्या, दिनचर्या आटोपण्यासाठी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सायंकाळी मोठ्या स्पीकरवर गुरुवाणी ऐकवली जाते. सायंकाळी लंगर आटोपल्यावर मोठ्या स्क्रीनवर शेतकरी, शेती आदी विषयांवर डॉक्युमेंटरी आणि चित्रपट दाखवले जात आहेत.
 

देशभरातून संघटनांचा पाठींबा 
 
 
शेतकरी आंदोलनाच्या सुरुवातीला असे वाटत होते केवळ पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सामील आहेत. मात्र, आता हा अंदाज लावण्यात प्रसिद्धी माध्यमे कमी पडली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील कृषी संघटना इथे पोहोचत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा आदी ठिकाणचे शेतकरी प्रमुख आहेत. महाराष्ट्रातील काही संघटनांनीही आंदोलनाला हजेरी लावली आहे.


 पंजाबच्या शेतकऱ्यांमुळे आवाज मिळाला ! 
 
 
पंजाबच्या शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावर आम्हालाही हिंमत मिळाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातून सातशे शेतकरी एकत्र आले आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याचे कारण दिल्ली जवळ आहे. पंजाबचे शेतकरी जास्त असण्याचे कारण म्हणजे दिल्लीपासून कमी असलेले अंतर पथ्यावर पडत आहे.


पोलीसही कर्तव्यावर 


पोलीसांनीही आंदोलकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुभा दिली आहे. कायदा सुव्यवस्था पाळून आंदोलन करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने केली आहे. सुरुवातील दोघांमध्ये तणाव दिसून येत होता मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीसांपुढे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनचर्येत खंड पडू न देण्याचे आवाहन आहे. पोलीसांनीही मवाळ भूमीका घेत आंदोलकांच्या कुठल्याही अंतर्गत गोष्टींमध्ये न पडण्याचा निर्णय घेतला आहे. 



@@AUTHORINFO_V1@@