रानडे, गांधी, जिना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

Ranade Gandhi Jinna_1&nbs


 
 
 
‘रानडे, गांधी, जिना’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. १८ जानेवारी, १९४३ साली ते प्रकाशित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानडे यांनीच इ. स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. त्यात रानडे, गांधी आणि जिना या त्रिसूत्रींचे विवेचन केले आणि तेच पुढे ‘रानडे, गांधी आणि जिना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तिमत्त्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. बाबासाहेब म्हणतात, “व्यक्तिपूजा चांगली गोष्ट नाही. कारण, ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते.”
 
 
 
 
बाबासाहेबांची मतं, भाषणं आणि लेखन हे तसे कालातीत आहे. महामानावाने एखादे वक्तव्य त्या काळात केले ते भविष्याचा वेध घेऊनच, महादेव गोविंद रानडे, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि मोहनदास करमचंद गांधी तसे ते त्या काळातील आपापल्या क्षेत्रातील दिग्गज माणसं, खरेतर मोहम्मद अली जिना आणि गांधी हे बाबासाहेबांचे समकालीन, तर रानडे (१८४२ ते १९०१) हे तसे बाबासाहेबांच्या अगोदरच्या काळातील. परंतु, बाबसाहेबांनी रानडेंच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि विचारसरणीचा अभ्यास नक्की केलेला होता. खरेतर जे काही ‘डेक्कन’मध्ये भाषण झाले त्याचा गाभा हा आदर्श नेता कोण असू शकतो, हा आहे. बाबासाहेब म्हणतात, “ज्याला नेतृत्व करावयाचे आहे. त्याचा सत्यावर प्रचंड विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तींची सत्यनिष्ठा जर डळमळीत असेल तर तो आदर्श नेता होऊ शकत नाही आणि सत्य हे त्रिकालाबाधित सत्य असते.
 
 
 
 
आंबेडकरांनी पुढे या भाषणात असेही म्हटले आहे की, आपल्या सत्यनिष्ठेचा तो कधीही गाजावाजा करीत नाही किंवा त्याला त्या सत्यनिष्ठेचा गर्वही नसतो ना यावर तो काही प्रतिक्रिया देतो. पुढे एके ठिकाणी म्हणतात, ज्याला महान म्हणायचं अथवा ठरवायचं आहे, त्याचं नैतिक, सामाजिक आणि चरित्र्यात्मक जीवन शुद्ध असलं पाहिजे. पराक्रमाबरोबर चारित्र्य असलेला नेपोलियनसुद्धा महान ठरू शकतो. महानतेचा निकष ठरविताना काही कसोटी नक्की ठेवावी लागते आणि ती कसोटी सामाजिक स्तरावर असावी जी व्यक्ती आपल्या उन्नतीबरोबर समाजाचीसुद्धा प्रगती आणि उन्नती करू शकली पाहिजे, महानता नाही, सत्यनिष्ठा, अभ्यास, सामाजिक भान आणि चारित्र्य हे महानतेचे निकष आहे आणि यामध्ये जिना, गांधी आणि रानडे यामध्ये रानडे तसे उजवे ठरतात, खरेतर रानडे हे नेमस्त आणि मवाळवादी नेते होते. परंतु, महानतेचा निकषात जे चपखल बसतात असे तर्क बाबासाहेबानी मांडले आहेत.
 
 
 
 
अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. परंतु, त्याचा समाज सुधारणा आणि परिवर्तन यावर भर असे विचार करूया, तशी तर गांधी आणि बाबासाहेब यांच्या कार्यपद्धतीत आणि विचारांमध्ये काही परस्परपूरकता होती तर काही ठिकाणी प्रचंड विरोधाभास, अगदी गांधींच्या वक्तव्यावर लगेच सहमती व्हावी, असे कधी नव्हते, याला इतिहास साक्षी आहे. अगदी वानगी दाखल द्यायचे म्हटल्यास ज्येष्ठ अमेरिकन लेखक एलिअनॉर यांनी १९७२ साली एक लेख लिहिला आणि तीच भूमिका प्रा. एस. एम. दहीवेल आणि गेलं ऑमवेट आणि प्रतिमा परदेशी यांनी मांडली. गांधींच्या जातिनिर्मूलनाला आणि सुधारणा वादाला मर्यादा होत्या, ते बाबासाहेबांचे प्रयत्न तसे पायाभूत होते.
 
 
 
 
कदाचित काही बाबींमध्ये या दोन्ही मते भिन्न टोकाची होती जसे गांधी वर्णाश्रम धर्माचे समर्थक होते. अस्पृश्यता निवारण करून हिंदू धर्मावरील कलंक मिटू शकतो, असे गांधींना वाटे तर केवळ अस्पृश्यता संपून जातीव्यवस्था मिटणार नाही तर जातिनिर्मूलन झाले पाहिजे किंवा गांधी हे भूतदयावादी होते तर बाबासाहेबांना दया नको, हक्क हवा होता. गांधींचा ‘खेड्यांकडे चला’ हा नारा होता, तर महामानवाला वाटे की, शहरातून प्रगती लवकर सहज साध्य होऊ शकते किंवा गांधींना जातीचा प्रश्न हा धार्मिक प्रश्न वाटे, तर बाबासाहेबांना तो प्रश्न राजकीय प्रश्न होता. गांधी स्वतःला सनातनी म्हणवत तर आंबेडकरांनी सारा भारत बुद्धमय करीन, असा नाराच दिला होता.
 
 
 
 
तसेच काही परस्परपूरकतादेखील दिसून येते. जसे की, ‘पुणे करार.’ पुणे करार हा वसाहत स्वातंत्र्याचा एक भाग होता. त्यात राखीव जागेचा मुद्दा असू देत की, दलित-शोषित अवर्ण लोकांना आत्मसन्मान आणि हक्काचा आग्रह धरला. हे असू दे किंवा काही वेळेला तर गांधींचे विचार हे आंबेडकरांच्या आकलनाने बदलल्याचे उदाहरणदेखील आहेत. जातीव्यवस्थेविषयी काहींचे मत असेच काहीसे आहे. गांधी हे प्रामाणिक होते. सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. सामाजिक जाणीव प्रचंड होती. समाज परिवर्तनाचा ध्यास होता. राष्ट्र उभं करण्याचा उद्देश होता. परंतु, गांधी हे वादापासून दूर राहू शकले नाहीत आणि म्हणून की काय महानतेचा निकषांमध्ये रानडे हे सरस ठरले.
 
 
 
 
यात तिसरा घटक हादेखील महत्त्वाचा आहे. खरेतर बाबासाहेब आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे समकालीन आणि दोघांचे आपल्या समाजासाठी असलेले योगदान हे सर्वश्रुत आणि उल्लेखनीय आहे. खरेतर जिना हे बदनाम व्यक्तिमत्त्व आहे, असे म्हटले जाते. परंतु, कार्यकर्तृत्वाचा आणि चारित्र्याचा अभ्यास करायचा म्हटल्यास समकालीन लोकांबरोबर जिनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. खरेतर आंबेडकर आणि जिना याचा काँग्रेसशी संबंध सारखाच आला, असं म्हणण्यास हरकत नाही. १९०६ साली मुस्लीम लीग स्थापन झाली. परंतु, जिना मात्र लिगपासून हातभर अंतर राखूनच होते. तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांची वागणूक ही बाबासाहेब आणि जिनांना काँग्रेसपासून दूर घेऊन गेली.
 
 
 
 
खरेतर बाबासाहेबांची आणि जिनाची व्यथा एकच होती. बाबासाहेब इंग्रज गेल्यावर दलितांना शासन, सुरक्षा आणि संसाधनात भागीदारी आणि जिनांना मुस्लीम समाजाला काय मिळणार याच विवंचनेत होते. बाबासाहेबांचा अभ्यास खोलवर होता, तर जिनांचा उथळ आणि त्यांचा स्वभाव हा सामंजस्यापासून दूर घेऊन गेला. बाबासाहेबांनी दलितांना जाणीव करून दिली ती ज्या जमिनीवर आपण वास्तव करतो, त्या जमिनीवर आणि ज्या आभाळाखाली झोपतो ते आभाळ यात आपली भागीदारी आहे. परंतु, जिना हे करण्यात कमी पडले.
 
 
 
खरेतर बाबासाहेबांनी दलित राष्ट्र न मागता याच राष्ट्रात अधिकार मागितले तर जिनांना सरळ सरळ द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला. खरेतर सत्यनिष्ठा, समाजमनाविषयी असलेले प्रेम, समाज प्रगतिपथावर जावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न, राष्ट्र उभारणीची मानसिकता, अभ्यास सारे काही असूनदेखील जिना मात्र दोषाला पात्र ठरले. यात उजवे ठरले, रानडे! त्याला कारणही तसेच होते. उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थतज्ज्ञ, द्रष्टे पुरुष, शांत, सहिष्णु, उदार, निरंहकारी वृत्ती, चारित्र्य, समाजाविषयी आपुलकी, राष्ट् उभं करण्याची ताकद आणि मनोभूमिका शीलसंपन्न, सत्यवादी या सर्व बाबतीत रानडे हे उजवे होते.
 
 
 
 
अंधश्रद्धेच्या बंधनातून मानवाची बुद्धी मुक्त केली पाहिजे. मानवाची व्यापक नैतिक मूल्ये, विवेक, बुद्धीनेच निश्चित होतात. अशा विचारांची मालिका म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि म्हणून विचारांती जिना आणि गांधी यांच्यांशी तुलना करता बाबासाहेबांच्या मते रानडे हे महान होते.
 
 
 - रवींद्र पाटील 
@@AUTHORINFO_V1@@