'प्रभू श्रीरामचंद्र शौर्याचे प्रतिक,माझे विधान मी मागे घेतो' : सैफ अली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

saif_1  H x W:



मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान दिग्दर्शक ओम राऊत याच्या आगामी बिग बजेट 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. याबद्दल मुलाखत देताना म्हणाला की, " रावण हा खलनायक नव्हता.". त्याच्या या वक्तव्यावरून सोशल मिडियावर वाद उफाळल्यानंतर त्याने आपलं विधान मागे घेतले आहे.“कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागतो आणि माझं विधान मागे घेतो”, असं सैफ अली खान म्हणाला आहे.


‘व्हारल भयानी’ने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर सैफचे स्पष्टीकरण शेअर करताना म्हंटल की,"माझ्या एका मुलाखतीदरम्यान एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, याची मला जाणीव झाली आहे. माझा तसा हेतू कधीच नव्हता किंवा तसा अर्थ नव्हता. मी सर्वांची मनापासून माफी मागू इच्छितो, मी माझं विधान मागे घेतो. प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी नेहमीच नीतीवान आणि शौर्याचे प्रतीक राहिले आहेत. आदिपुरुष म्हणजे वाईट गोष्टींवर मिळालेल्या विजयाचा उत्सव साजरा करणे. कोणतीही विकृती न करता महाकाव्य सादर करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र काम करत आहे.



सैफने सीताहरणबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी देखील इशारा दिला. या सर्व घडामोडीनंतर सैफने आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.


सैफ वादग्रस्त वक्तव्य काय?


'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये सैफ अली खान 'लंकेश' म्हणजे रावणाची भूमिका साकारणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हंटले की “रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे.”


@@AUTHORINFO_V1@@