युवराजच्या वडिलांचे हिंदूंबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2020
Total Views |

Yograj Singh_1  
 
 
नवी दिल्ली : गेले काही दिवस नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. यामध्ये आता वादग्रस्त विधान करून अडचणीत येणारे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. सोशल मिडियावर वायरल झालेल्या व्हिडियोमध्ये ते आंदोलनात 'हे हिंदू गद्दार आहेत, शंभर वर्षे त्यांनी मुघलांची गुलामी केली' असे विधान केले. यावर आता सोशल मिडियावर त्यांना अटका करण्याची मागणी होत आहे.
 
 
 
 
 
 
हे हिंदू गद्दार आहेत, असे समाजामध्ये फूट पाडणारे वक्तव्य योगराज यांनी केले. योगराज यांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. योगराज यांचे भाषण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. या आंदोलनामध्ये भडकावू भाषण करून योगराज यांना आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर काही कारवाई होते का? किंवा या वक्तव्याबद्दल योगराज सिंग काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@