थॉट्स ऑन पाकिस्तान- डॉ. बी. आर. आंबेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2020
Total Views |

Babasaheb_1  H
 
 
 
 
केवळ दलितोद्धाराचाच नव्हे, तर समग्र मानवमुक्तीचा लढा हेच आपले जीवनोद्दिष्ट मानून अत्यंत समर्पित जीवन जगलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे आपल्या समाजावरील प्रेम फार मोठे आहे. गरीब, वंचित, उपेक्षित आणि दलित समाजबांधवांचे सर्वांगीण उन्नयन या एका ध्यासासाठी त्यांनी आपली सारी शक्ती, बुद्धी आणि कर्तृत्व पणाला लावले. त्यांच्या त्या साऱ्या कर्तृत्वावर विलक्षण बुद्धिमत्ता, सखोल -गंभीर चिंतन अध्ययन, विवेकपूर्ण कर्तव्यबोध आणि कट्टर देशनिष्ठ यांचे भक्कम अधिष्ठान होते, म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकाळातील देशासमोरच्या सर्व महत्त्वपूर्ण समस्या आणि विद्यांचे सूक्ष्म अध्ययन केले आणि त्यावरील उपायांच्या बाबतीतही सुस्पष्ट, नेमकी आणि देशहिताची भूमिका मांडणारे प्रतिपादन, लेखनही केले. जगभरातील विचारविश्वाला थक्क करून सोडणारा त्यांच्या बुद्धीचा आवाका त्यांच्या वाङ्मयातून प्रत्ययाला येतो. या त्यांच्या वाङ्मयातील एक प्रख्यात उदाहरण म्हणजे ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ.
 
 
ज्या काळात ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ निर्माण केला गेला, त्या दिवसांची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. १९४१ साली बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. दुसरे महायुद्ध अद्याप संपुष्टात आलेले नव्हते. या युद्धाने ब्रिटिशांसमोर एक जटील आव्हान निर्माण केले होते. एक प्रकारे कोंडी झालेल्या स्थितीत अडकलेल्या ब्रिटिश साम्राज्याने वसाहतींवरील आपला ताबा सोडून देण्याचा निर्णय केला होता, तो जाहीरही केला होता. दुसऱ्या बाजूने भारतातील राजकीय पक्षांना सैन्यभरतीत सहभागी होऊन युद्धाच्या मोहिमेत इंग्लंडला साहाय्य करण्याचे आवाहनही केले जात होते. या एकूण परिस्थितीचा फायदा घेण्याचा पवित्रा तत्परतेने धारण करून बॅ. महंमद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लीगने आपली स्वतंत्र देशाची मागणी अधिक बुलंद करण्यास प्रारंभ केला होता. २३ मार्च, १९४० रोजी लाहोर येथे झालेल्या परिषदेत मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीविषयीचा प्रस्ताव संमत केला. त्याआधी दहा वर्षे-१९३०च्या परिषदेतील सर महंमद इक्बाल यांच्या (कु)ख्यात भाषणापासूनच द्विराष्ट्र सिद्धान्ताची चर्चा मुस्लीम लीगतर्फे प्रसारित केली जात होती. १९४०च्या लाहोर परिषदेत ब्रिटिश भारताच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत आणि बंगाल या पाच मुस्लीमबहुल प्रातांचा मिळून एक स्वतंत्र मुस्लीम देश आकारला आणला जावा, अशी स्पष्ट आणि सविस्तर मागणी प्रस्तावित केली गेली. प्रत्यक्ष कृती आणि आंदोलनाच्या स्तरावरही मुस्लीम लीग पुरेशा आक्रमक पावित्र्यासह सक्रिय झाली होती आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही या स्थितीचा पुरेपूर गैरफायदा घेत आपल्या ‘फोडा आणि झोडा’ नीतीच्या अवलंबाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खच्चीकरण करण्यास प्रारंभ केला होता. या साऱ्या प्रक्षुब्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांन ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या अभ्यासपूर्ण प्रबंधाचे लेखन केले.
 
 
 
जवळपास ४०० पृष्ठांच्या (नेमके सांगायचे तर ३९६ पृष्ठांच्या) या ग्रंथाचे प्रत्येक पान बाबासाहेबांच्या विवेचनाच्या मर्मग्राहीपणाची साक्ष आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अत्यंत ज्वलंत बनलेल्या या समस्येचे बाबासाहेबांनी केलेले विवेचक विश्लेषण आणि उलघडून दाखविलेले मर्म याचे सम्यक स्वरूप एखाद-दुसऱ्या लेखात समाविष्ट होण्यासारखे नाही. त्यासाठी मूळ ग्रंथाचे पुन्हा पुन्हा वाचन करणेच आवश्यक आहे. मात्र, त्यांनी या ग्रंथातून प्रतिपाक्षी केलेल्या पैलूंची समावेशकता आणि व्यापकता लक्षात घेतली तर वाचनपूर्तीची योग्य मनोभूमिका तयार होण्यास नक्कीच मदत होईल. तेवढ्यापुरताच केलेला एक प्रयत्न याच दृष्टिकोनातून या लेखाकडे पाहावे ही विनंती. १९४१ साली बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक लिहिले, तर पुढे १९४५ साली याच पुस्तकाच्या आधारे ‘पाकिस्तान-पार्टिशन ऑफ इंडिया’ या ग्रंथातून अधिक विस्तृत स्वरूपात या विषयाचा आढावा घेतला, दरम्यानच्या तीन/चार वर्षांत १९४२ ची असहकार चळवळ, आझाद हिंद सेनेचा प्रयोग, सर स्फोर्ड क्रिप्स यांच्या योजनेमार्फत ब्रिटिशांनी तयार केलेला सत्तेच्या हस्तांतराचा प्रस्ताव आणि या प्रस्तावाच्या योजनेद्वारे पाकिस्तानच्या निर्मितीला दिले गेलेले सुप्त; पण सशक्त समर्थन इत्यादींमुळे एकूण परिस्थिती भारत-विभाजनाच्या दिशेनेच टोकदार बनत गेली होती. या साऱ्या खळबळजनक घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारताचे विभाजन आणि पाकिस्तानची निर्मिती या प्रक्रियेचे सूक्ष्म, वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकांमधून केले. निखळ संशोधक-अभ्यासक दृष्टींचा समतोल आणि समस्येचे अचूक आकलन यांचे जसे स्पष्ट दर्शन या विश्लेषणातून होते, तसाच बाबासाहेबांच्या भारतनिष्ठ दृष्टिकोनाचाही प्रत्यय त्यातून सतत येत राहतो.
 
 
 
या ग्रंथात एकूण १५ प्रमुख प्रकरणे आणि प्रत्येक प्रकरणात सरासरी पाच उपविभाग यातून विषयाचा विस्तार केला गेला आहे. या प्रकरणाची तसेच उपविभागांची केवळ शीर्षके पाहिले तरी एकूण मांडणीची व्यापकता आणि समर्पकता यांची कल्पना येते. मुस्लीम लीगने अंगीकारलेला द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त आणि त्याआधारे लोकसंख्येच्या सांप्रदायिक/धार्मिक स्वरूपाच्या आधारावर केलेल्या स्वतंत्र्य पाकिस्तानच्या मागणीचे सविस्तर आणि मीमांसक विवेचन बाबासाहेबांनी केले आहे. या मागणीचे समर्थन आणि खंडन करणाऱ्या दोन्ही अनुक्रमे मुस्लीम आणि हिंदू समुदायांचे आपापल्या भूमिकेमागील तर्कही त्यांनी सविस्तर मांडले आहेत. विषय प्रवेश करतानाच बाबासाहेब म्हणतात, “विभाजनाच्या मुस्लीम (लीग)प्रणित मागणीवरील प्रतिक्रिया सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या आहेत. एक - ही मागणी मुस्लीम समुदायाच्या तत्कालीन स्वरूपात उपेक्षित केल्या गेलेल्या भावनेतून जन्माला आली असून काळाच्या प्रवाहात तिची धार सौम्य होत जाईल आणि दुसरी प्रतिक्रिया : या मागणीमागील प्रेरणा केवळ तात्कालिक स्वरूपाची नसून, तिला विशिष्ट मुस्लीम कडवेपणाच्या मानसिकतेचा भक्कम आधार आहे.” प्रतिक्रियांचे हे दोन्ही प्रकार सांगून आपल्या स्वतःचे मत मांडताना बाबासाहेब असे लिहतात की, “माझे स्पष्ट मत सांगायचे तर ही मागणी तात्कालिक नव्हे, तर मुस्लीम मानसिकतेत प्रयत्नपूर्वक रुजविल्या गेलेल्या फुटीर आणि कडव्या या दोन्ही समुदायाकडून व्यक्त होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांवर अवलंबून राहील.” हिंदू सामुदायाकडून पाकिस्तानच्या पयार्र्याने देशातल्या फाळणीच्या निर्मितीला होणाऱ्या विरोधाची मीमांसाही बाबासाहेब करतात. या विभाजनामुळे राष्ट्रीय एकात्मतेला खिंडार पडेल, देशाच्या सीमांविषयी घातक संभ्रमाची स्थिती निर्माण होईल, एकूणच राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यवस्थेची समस्या जटील बनेल, सर्वच लष्करी दले आणि संरक्षण सामग्रीच्या विभाजनाचाही प्रश्न गुंतागुंतीचाच बनेल. प्रत्यक्ष विभाजन आकाराला येण्यापूर्वी दोन-तीन वर्षे बाबासाहेब हे विश्लेषण करीत होते, त्यातील प्रत्येक मुद्दा केवळ फाळणी होतानाच नव्हे, तर आजच्या स्थितीतही किती समर्पकपणे लागू होतो, याचा अनुभव आपण घेतच आहोत.
 
 
 
सामाजिक स्थितीविषयक चर्चा आणि त्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांमधील सामाजिक प्रश्नांविषयीचे तौैलनिक विवेचन डॉ. बाबासाहेबांच्या मांडणीत असे स्वभाविक होतेच, हिंदूंपेक्षा मुस्लीम समुदाय पर्यायाने पाकिस्तान म्हणून आकाराला येऊ पाहणारा देश सामाजिकदृष्ट्या अधिक भागात पुराणतवादी आणि सामाजिक दोषांनी डेलळरश्र र्एींळश्री ग्रस्त आहेत. असे स्पष्ट प्रतिपादन ते या संदर्भात करतात. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मुस्लीम अधिकच परंपरावादी आणि परावृत्त आहेत. त्यांच्यात राजकीय आणि राष्ट्रीय निष्ठांचा अभाव आहे. याचाही स्पष्ट उल्लेख बाबासाहेब करतात. व्यक्तिगत कायद्यांमध्ये (PERSONAL LEWS) कालसुसंगत सुधारणा दुरुस्ती स्वीकारण्याच्या संदर्भात पुढील काळात हिंदू समाज किती समंजस राहील आणि मुस्लीम समाज अजूनही किती कट्टरतेच्या विळख्यात अडकलेला आहे, याचाही पुरेसा अनुभव सर्वांनीच घेतला आहे. डॉ. बाबासाहेबांचे विश्लेषण कसे अचूक आणि भविष्याचा वेध घेणारे होते हेच यावरून दिसते. एकूण फाळणीविषयक चर्चेदम्यान त्या काळात विभाजनाला विरोध करणाराही एक राष्ट्रीय मुसलमान म्हणविणारा गट काँग्रेसमध्ये सक्रिय होता. हिंदू समुदाय तर (काँग्रेस हिंदू महत्म या दोन्ही राजकीय पक्षातील तसेच पाहता राजकीयदृष्ट्या सक्रिय सक्षम नसणाराही) विभाजन टाळावे, अशाच मताचा जोरदार पुरस्कार करीत होताच, या दोन्ही समुदायाकडून पाकिस्ताननिर्मितीला पर्याय या नात्याने ज्या योजना सादर केल्या जात होत्या, त्यांची चिकित्सा बाबासाहेबांनी या पुस्तकात केली. त्याचबरोबर दोन्ही महायुद्धांच्या परिणामातून जगात अन्यत्र देश विभाजन आणि वेगळ्या देशांच्या निर्मितीच्या ज्या प्रचित्या घडत होत्या, त्यांचाही डोळस परामर्श बाबासाहेबांनी घेतला आहे. ऑटोमन साम्राज्यातून तुर्कीची, तर ऑस्ट्रिया, हंगेरी आणि स्लोवाक प्रजासत्ताक यांच्या उदाहरणांची चर्चा त्यांनी केली.
 
 
 
एकूण एवढ्या व्यापक आणि सखोल चिकित्सेच्या पृष्ठभूमीवर पाकिस्तान अस्तित्वात यावे काय? देशाचे विभाजन अपरिहार्य आहे काय? सांप्रदायिक धार्मिक पक्षपाताच्या ज्या तक्रारींच्या फाळणीच्या समर्थनार्थ उल्लेख करण्यात येतो, त्यांचे निवारण करता येण्याचा अन्य काही मार्ग नाही काय, दोन्ही हिंदू-मुस्लीम समुदायांमधील साम्यस्थळांवर भर देऊन भेद कमी करता येणार नाहीत काय? असे प्रश्न त्यांनी निर्माण केले आहेत. एकूण त्यांच्या मांडणीतून असे दिसते की, त्यांच्यातले देशहित मनभावनेच्या पातळीवर देश विभाजन होऊ नये, अशीच ग्वाही देत होते. परंतु, प्रश्नांची उत्तरे मात्र ते बुद्धीच्या आणि व्यवहार्यतेच्या आधारावर शोधत होते. अस्सल संशोधक प्रत्यक्ष व्यावहारिक स्थितीचे अचूक आकलन असणारे मुत्सपद्दी आणि वास्तववादी विचारवंत या नात्याने ते पाकिस्तान निर्मितीच्या मागणीकडे पाहत होते. तद्वतच या मागणीला आणि त्यातून निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला ब्रिटिश काँग्रेस आणि हिंदू-मुस्लीम समुदाय कसा सामोरा जात आहे, याचाही व्यवहार्य मागोवा बाबासाहेबांच्या विश्लेषणात दिसतो. फाळणी मान्य करावी की नाही, याबद्दलचा आपल्या मताचा कौल व्यक्त करण्यात ते संकोचही करीत नाहीत आणि त्या दृष्टीने आवश्यक आपल्या मताचा कौल व्यक्त करण्यात ते संकोचही करीत नाहीत आणि त्या दृष्टीने आवश्यक तर्क प्रस्तुत करीत असतानाच त्या (फाळणीच्या) प्रक्रियेबाबतच्या सल्लावजा सूचनाही स्पष्टपणे नमूद करतात.
 
 
 
एकदा विभाजन होणार ते काही प्रमाणात अपरिहार्य आहे आणि मुख्य म्हणजे, स्वतंत्र भारताची सूत्रे हातात घेण्यासाठी उत्सुकतेने पुढे सरसावणारे काँग्रेसचे नेतृत्त्वही विभाजन स्वीकारण्याच्या मनःस्थितीत आले आहे, याचा अंदाज बाबासाहेबांना आला होता. त्यामुळे हे टाळण्याविषयी भाबडी चर्चा करण्यात कालापत्यव्य करण्यापेक्षा जे व्हायचे ते त्यातल्या त्यात सुरळीपणे आणि देशहिताच्या दृष्टीने सोयीचे कसे होईल, याबाबत अधिक गंभीरपणे विचार करण्याकडे त्याचा कल होता, हे त्यांच्या मांडण्यातून स्पष्ट होते. “दोन्ही देशांदरम्यान सीमांची निश्चिती आणि लोकसंखेची बदलाबदल याबद्दलचे प्रश्न सविस्तरपणे सोडविले पाहिजेत,” असा आग्रही सल्ला देतानाच ते हे लिहितात की, “त्या समस्या सोडविणे अशक्य नाही, त्या सोडविण्यासारख्या (SOLVABLE) आहेत, त्यांना आपल्याला रोखू, अडवू देता कामा नये,” एकूण फाळणीची योजना कशा पद्धतीने आकाराला यावी याबाबतच्या सूचना करताना ते म्हणतात, “पंजाब आणि बंगाल या दोन्ही प्रांतांचे विभाजन होणे आवश्यक आहे. ते आपण स्वीकारले पाहिजे. तसेच ही फाळणी धर्माच्या संप्रदायाच्या आधारेच होत आहे हे मान्य करण्यासही संकोच करता कामा नये. त्यामुळेच वेगळे दोन देश निर्माण करताना लोकसंख्याची अदलाबदल करणेही आवश्यक आहे. हेही त्यांनी सूचित केले आहे. हिंदू राज्य (सांप्रदायिक देश-सत्ता या अर्थाने) निर्माण करणे सर्वथा टाळलेच पाहिजे.” हे स्पष्टपणे नमूद करीत असतानाच, “पाकिस्तान जन्माला घालणे हाच त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे काय?” असा परखड सवालही त्यांनी उभा केला आहे. “मुसलमान समुदाय खरोखरच आणि मनापासून उत्कटपणे स्वतंत्र देशाची इच्छा बाळगत असेल, तर त्यांची ती इच्छा पूर्ण करायला हवी,” अशा शब्दात त्यांनी प्राप्त परिस्थितीत भारताच्या विभाजनाला अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, याबरोबरच, “बॅरिस्टर महंमद अली जिना आणि महात्मा गांधी यांच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची मुत्सद्देगिरी आपणाला हवी आहे,” अशी स्पष्टोक्ती करण्यातही त्यांनी संकोच केला नाही.
 
 
 
या पुस्तकातील अखेरचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे, मुख्य विवेचनाला जोडणारी परिशिष्टे आणि आकडेवारीची कोष्टके. प्रतिपादित केलेल्या प्रत्येक बाबीला भक्कम आधार देणाऱ्या या परिशिष्टांद्वारे पुणे करार, क्रिप्स योजना, फाळणीशी संबंधित राज्यांच्या लोकसंख्येची वर्गवारी, त्यातील अल्पसंख्य समुदायांची एकूण स्थिती (सिंध, पंजाब या प्रांतासंदर्भात तर प्रत्येक जिल्ह्यातील आणि मोठ्या शहरांमधील लोकसंख्येचे वर्गीकरण करणारी कोष्टके सादर केली आहेत.) मोर्ले-मिंटो सुधारणांच्या योजनेद्वारे मुस्लीम समुदायाला करण्यात आलेले आवाहन आणि मुसलमान समुदायाने त्याला दिलेला प्रतिसाद यासारखा तपशील देणारे मूळ दस्तावेज बाबासाहेबांनी सादर केले आहेत. याशिवाय प्रांतिक, कायदेमंडळातील विधिमंडळामधील प्रतिनिधित्वाचा तपशील, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या महसुलाचे प्रमाण, हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही प्रस्तावित भूभागांकडे उपलब्ध होणाऱ्या साधन संपत्तीची (resoervces) माहिती इत्यादी तपशीलही पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. लोकसंख्येतील मुस्लीम समुदायाचे एकूण तसेच राज्यवार प्रमाण, हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समुदायांमधील बालविवाहित महिलांची आकडेवारी, सैन्यदलातील मनुष्यबळाची जातीय/धार्मिक परिस्थिती आणि केंद्रीय कायदेमंडळातील लोकप्रतिनिधींची संबंधित आकडेवारी अशा अनुषंगिक आणि महत्त्वपूर्ण माहितीने हे पुस्तक समृद्ध आहे. एकूणच एका जटील भासणाऱ्या विषयाचा उद्बोधक उलगडा करणारे सखोल संशोधनपर लिखाण कसे असावे, याचा उत्कृष्ट नमुना याही ग्रंथाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी निर्माण करून ठेवला आहे. पाकिस्तान हा विषय त्याच्या जन्मापासूनच भारतासाठी आणि भारतीयांसाठी अनेक अर्थाने कायमच महत्त्वपूर्ण राहिला आहे. आगामी काळातही तो तसाच राहणार आहे. या विषयाचे सूक्ष्म नि सूक्ष्म कंगोरे स्पष्टपणे उलगडून दाखविणारा, त्या देशाच्या जन्मापूर्वीच निर्माण केलेला एक पथदर्शक दस्तावेज या नात्याने ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ समतल जिज्ञासा आणि अभ्यासकांना दीर्घकाळ मार्गदर्शन करीत राहील.
 
 
- अरुण करमरकर
@@AUTHORINFO_V1@@