व्हाट्सएपचं ‘हे’ नवीन फिचर तुम्हाला माहित आहे का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020
Total Views |
app_1  H x W: 0





ट्रेन प्रवासाची माहिती,
पीएनआर स्टेटस आता व्हाट्सएपवर



नवी दिल्ली: आता ट्रेनच्या पीएनआर स्टेटस व लाईव्ह स्टेटससह ट्रेन उशिरा असल्यास त्याची माहिती देणारं एक नवं फीचर ‘रेलोफाय’ नावाच्या मोबाईल ऍपमध्ये जोडण्यात आलं आहे. मुंबई बेस्ड स्टार्टअपने बनवलेल्या रेलोफाय ऍपच्या मदतीने प्रवासाचं तिकीट काढण्यापूर्वी तिकीटाच्या किंमतीची इतर पर्यायासोबत तुलना करता येणार आहे. तसंच कोणामार्फत केलेल्या प्रवासासाठी किती वेळ लागेल, हेसुद्धा यात समजणार आहे.

 
 

प्रवाशांना पीएनआर स्टेटसविषयी माहिती मिळत राहण्यासाठी ‘९१- ९८८११९३३२२’ या नंबरवर १० अंकी पीएनआर नंबर शेअर करावा लागेल. त्यानंतर सदर व्यक्तीला रेग्युलर पीएनआर स्टेटसबाबत, ट्रेनचं तिकीट वेटिंगवर आहे की कन्फर्म ही माहिती मिळू शकते. तसंच प्रवासी ट्रेनमध्ये असल्यास त्याला पुढील स्टेशन, मागील स्टेशन आणि इतरही माहिती मिळू शकते.

 
 

रेलोफायने केलेल्या दाव्यानुसार दर महिन्याला ६० लाखाहून अधिक प्रवासी, ट्रेनसंबंधी माहितीसाठी गुगलवर विश्वास ठेवतात व त्यावरच अवलंबून राहतात. परंतु त्यांना ट्रेनच्या लाईव्ह स्टेटसची योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे आता रेलोफायच्या मदतीने प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुसह्य होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

@@AUTHORINFO_V1@@