औद्योगिक घराण्यांना बँक परवान्याच्या निर्णयावर गव्हर्नर म्हणतात....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020
Total Views |
RBI_1  H x W: 0
 



मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी औद्योगिक घराण्यांना बँकींग परवाने देण्याच्या शिफारसींवर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेला निराधार म्हटले आहे. तसेच आरबीआयने अद्याप इंटर्नल वर्कींग ग्रुपतर्फे आलेल्या शिफारसींवर अद्याप निर्णय घेतले नसल्याचे बोलले आहे. ते म्हणाले, "इंटर्नल वर्कींग ग्रुपच्या अहवालावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. औद्योगिक घराण्यांना बँकींग परवाने देण्याच्या निर्णयासंदर्भात संबंधित पक्षांच्या विचारानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
ग्राहक हित समोर ठेवूनच निर्णय
 
 
 
देशातील बँकांमधील औद्योगिक घराणी उतरल्यास खुली स्पर्धा असेल. चांगली सेवा देण्यासाठी चुरस ही ग्राहकांच्या हिताचा निर्णय ठरू शकतो. आकर्षक व्याजदर आणि अन्य सुविधाही ग्राहकांना मिळू शकतात, अशी शक्यता आहे. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र, या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली होती. जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे गुणोत्तर कमी असूनही वरच्या पातळीवर आहे. औद्योगिक घराण्यांना परवाने देण्याच्या निर्णयामुळे काही मोजक्या धनाढ्य लोकांच्या हाती देशाच्या बँकींग व्यवस्थेच्या नाड्या राहू शकतात, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@