सरनाईकांच्या १०० कोटींच्या नोटीशीला सोमय्यांचे खणखणीत उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2020
Total Views |
Kirit_1  H x W:


 

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने चौकशी केल्यानंतर सरनाईक आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे कोल्डवॉर सुरूच असूनही सोमय्या यांच्या वकिलांनी सरनाईक यांच्या भ्रष्ट प्रतापांचा पुनरुच्चार केला. प्रताप सरनाईक यांनी १०० कोटींचा भरपाईचा दावा ठोकत पाठवलेल्या नोटीशीला सोमय्या यांनी वकिलांमार्फत खणखणीत उत्तर पाठविले आहे.
 
 
 
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या १०० कोटीच्या नोटीशीनंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे वकील सॉलिसिटर ध्रुव लीलाधर कंपनीने सडतोड उत्तर दिले आहे. आ. प्रताप सरनाईक यांनी १३ माळ्याच्या दोन अनधिकृत इमारती बनविल्या त्यांच्या इमारतीला ओसी मिळालेली नाही. प्लॅटधारक हैराण असल्याचा पुनरूच्चार केला. एनएसईएल घोटाळ्यात प्रताप सरनाईक आणि त्यांचे भागीदार सहभागी होते.
 
 
 
एनएसईएल घोटाळ्याच्या पैशातून टिटवाळा येथे प्रताप सरनाईक आणि मोहिते अग्रवाल यांच्या विहंग आस्था हौसिंग लि. ने ११२ मिळकती, जमिनी विकत घेतल्या. एमएमआरडीच्या १७५ कोटी टॉप सेक्युरिटी घोटाळ्यात सरनाईक परिवारांची तपासणी ईडीद्वारे चालू आहे. आ. प्रताप सरनाईक यांनी ज्या गोष्टीवर आक्षेप घेऊन १०० कोटीची नोटीस पाठविली होती. त्या नोटीसला दिलेल्या उत्तरात त्याच आरोपांचा पुनरुच्चार करण्यात आला. सरनाईक यांचे वकील ऍड. अशोक कुलकर्णी यांनी पाठविलेल्या १७ डिसेंबरच्या नोटीसला ध्रुव लीलाधर आणि कंपनीने उत्तर देत आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा शिवसेना आ. सरनाईक आणि भाजप नेते सोमय्या आमनेसामने येण्याची शक्यता आहे.





@@AUTHORINFO_V1@@