शिवसेना आणि अधिका:यांनी उद्योगांना अडचणीत आणण्याचे धंदे बंद करावेत- प्रदीप पेशकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020
Total Views |
bjp padniyakati photo_1&n
 

 


डोंबिवली : शिवसेनेच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर उद्योगांना साथ दिली पाहिजे. उद्योगांच्या हितासाठी आणि तरूणांना रोजगार मिळायला हवा असेल तर उद्योगांना जपले पाहिजे. खोटय़ा केसेसमध्ये अडकवून आणि वेगवेगळ्य़ा प्रकारच्या नियमावली करून हे सरकार उद्योगांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. हे अत्यंत कठोर शब्दांत बोलावे लागत आहे. पण सरकार आणि अधिका:यांनी उद्योगांना अडचणीत आणण्याचे धंदे बंद करावेत असे खुले आवाहान उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी केले आहे.
 
 
 
 
भाजपा कल्याण जिल्हातर्फे पदनियुक्ती कार्यक्रमाचे कामा असोसिएशनच्या कार्यालयात बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेशकर बोलत होते. भाजपतर्फे आज २२ जणांना पदनियुक्ती पत्र देण्यात आली. या तरूणांमुळे पक्षाचे काम अजून तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे. पर्यायाने पक्षाला बळकटीसाठी फायदा होणार आहे. उद्योग मित्र संस्था आज ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशन आणि कल्याण अंबरनाथ मॅन्युफक्चुरींग असोसिएशन यांच्याशी जोडली गेली आहे. उद्योजक एकत्रित आल्यावर त्यांच्या समस्या सरकार्पयत पोहोचविणो सोपे होते.
 
 
 
 
त्यामुळे उद्योजकांमध्ये संघटन असणो गरजेचे आहे. संघटनामुळे त्यांच्या समस्या लवकर सुटतात. यावेळी आयमा एमएसएमइ अध्यक्ष अविनाश दलाल, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, महिला ग्रामीण मंडळ अध्यक्ष मनीषा राणो, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, भाजप उद्योग आघाडी सहसंयोजक जयेश बारोट, भाजप उद्योग आघाडी संयोजक आणि कामा अध्यक्ष देवेन सोनी, सूत्र संचालक बाबजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पेशकर म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली आहे. ती सर्व महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम करीत आहे. या संकल्पनेत प्रत्येक सेक्टर आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे. ही संकल्पना काय आहे हे जर उद्योजकांनी वाचले नाही तर त्यांना त्यांचा उपयोग होणार नाही. केवळ बॅकेतून लोन घ्यायचे एवढे हे छोटे नाही. मोदींनी हा संकल्पन उद्योगाच्या भरवश्यावर केला आहे. उद्योजकांनी या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. मोदींनी पुढील 25 पिढय़ांसाठी योजना करून ठेवली आहे.
 
 
 
 
चीनी वस्तू स्वस्त मिळत असल्याने सर्व त्याकडे ओढले गेले होते. चायना वस्तू बंद झाले तर आपण तापावरील इंजेक्शन देखील बनवू शकणार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी उद्योगांना सुरूवात केली पाहिजे. आत्मनिर्भर भारतासाठी उद्योगांनी उत्पादन स्वादेशी बनावटीचे केले पाहिजे. उद्योगांनी प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर भारत आता सेक्टरप्रमाणो आहे पुन्हा ते उत्पादनाप्रमाणो होईल. उद्योजकांना काय हवे आहे हे विचारण्यासाठी मोदी सरकार तयार आहे. फक्त उद्योजकांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे सांगितले.
 
 
 
 
शशिकांत कांबळे म्हणाले, कोरोना काळात अनेक जण अडचणीत असताना उद्योजकांनी समाजाला मदत केली. उद्योजक मजबूत असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था देखील मजबूत असते. राजकीय पक्षांनी उद्योजकांना बळकट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. एखाद्या कंपनीतून धूर निघाला की लोक लगेच तिकडे पळतात. वर्षानुवर्ष त्यासाठी काम करावे लागते तेव्हा तो उद्योग उभा राहत असतो. उद्योजकांना गरज लागेल तेव्हा अनेकांना रोजगार मिळेल. भाजपा समाजातील सर्व घटक मजबूत होण्यासाठी काम करीत असते.
 
 
 
उद्योजक सामाजिक कामातून शहराचे रूप पालटण्याचे काम करतात. समाजासाठी या उद्योजक संस्था मदत करीत असतात. कामाने घरडा सर्कल जवळील परिसराचे रुपडे पालटले आहे. देवेन सोनी सारख्या लोकांमुळे आपल्याला काम मिळाले असे बोलले पाहिजे. हे काम लोकांर्पयत पोहोचले पाहिजे.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील प्रत्येक घटकांर्पयत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वजण संघटित असेल तर त्यांच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्यामुळे लोकांना आपल्याशी जोडण्याचे काम केले पाहिजे. उद्योजकांच्या पाठीशी भाजप उभे आहे, असे ही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
नंदू परब म्हणाले, कोरोनाच्या काळात ७५ टक्के लोकांच्या नोक:या गेल्या आहेत. उद्योजकांनी अनेकांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा. आमच्याकडे खूप बायोडेटा आले आहेत. एखाद्या नोकरी देणो हे चांगले काम आहे. कारण त्यांच्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. भुकलेले अन्न तसे कामगाराला काम देण्याची गरज आहे. आपण एक रोजगार मेळावा आयोजित करूया असे ही ते म्हणाले.





@@AUTHORINFO_V1@@