या आज्जींना करायची आहे सर्व संपत्ती मोदींच्या नावावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020
Total Views |
modi_1  H x W:
- 
 
 
 
नवी दिल्ली : प्रत्येक राजकीय नेत्याच्या प्रसिद्धीचे दोन पैलू असतात, एक म्हणजे त्याला स्वीकार्यता आणि दुसरी लोकप्रियता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षात या दोन्ही गोष्टींवर पकड घट्ट केली आहे. जागतिक नेतृत्त्वाबद्दल असो किंवा देशांतर्गत नेत्यांमध्ये मोदींची विशिष्ट शैली अनेकांना भावते. असेच एक उदाहरण देणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या ८५ वर्षीय आज्जींनी आपली संपूर्ण संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे करण्याचा निर्धार केला आहे. त्याबद्दलचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये राहणाऱ्या ८५ वर्षीय बिट्टन देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुलं आणि सुना आहेत. मात्र, चौघेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. बिट्टन देवी म्हणतात, कित्येक दिवस झाले मात्र, त्यांनी त्यांच्याबद्दल काहीच जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. केंद्र सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या पेन्शनवर त्यांचा उदारनिर्वाह चालत आहे. त्याचसाठी त्यांच्याजवळची दोन बिघा जमीन त्या मोदींच्या नावे करू इच्छीत आहेत.
 
 
 
गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर झालेली फरफट सांगितली आहे, त्यांची मुले त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. पेन्शनवर घर चालत आहे. त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानांना आपली जमीन त्यांच्या नावे करून देणार आहेत. त्यांनी आपली ही इच्छा मैनपुरी तहसील अधिवक्ता कृष्ण प्रताप सिंह यांच्या कार्यालयात सांगितली होती.
 
 
 
त्यांच्या नावे १२ बिघा जमीन आहे ती मोदींच्या नावे करण्याची इच्छा त्यांची आहे. त्यांची ही मागणी ऐकून सुरुवातीला सर्वांना धक्का बसला. अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या ऐकल्या नाहीत. त्या आपल्या मागणीवर ठाम आहेत.
त्यानतंर अधिवक्त्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांशी ते या संदर्भात चर्चा करतील. त्यानंतर काहीशा त्या ऐकण्याच्या मनस्थितीत आल्या. अधिवक्त्यांनी त्यांच्याकडे दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र, आज्जींच्या या मागणीमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा होत आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@