आता चौकशी यंत्रणांवर सीसीटीव्हीची नजर : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020
Total Views |

SC CCTV_1  H x
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यापैकी एक म्हणजे देशातील सर्व तपास यंत्रणावर तसेच, पोलिसांवर आता सीसीटीव्ही लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सीबीआय, एनआयए, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स आणि सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस यांच्या कार्यालयात आणि चौकशी केल्या जाणाऱ्या सगळ्या बंद खोलींमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
 
 
 
 
या आदेशांमध्ये सर्व राज्यांच्या पोलीस स्टेशनमध्येही ऑडिओ रेकॉर्डिंगसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनचे प्रवेश आणि निर्गमन द्वार, लॉक अप, कॉरिडोर, लॉबी एरिया, रिसेप्शन एरिया, सब इन्स्पेक्टर आणि इस्पेक्टर यांचे रुम, स्टेशनच्या बाहरेचा परिसर, वॉशरुमच्या बाहेरचा भाग इत्यादी भागांतही कॅमेरे लावण्यात यावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढच्या १८ महिन्यांपर्यंत उपलब्ध असायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@