आदित्य ठाकरेंच्या बैठकीत मुंबई-ठाण्यातील कांदळवनांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020
Total Views |
mangrove _1  H

कांदळवनांना 'राखीव वन' म्हणून अधिसूचीत करण्याबाबत आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगर परिक्षेत्रातील कांदळवने अधिसूचीत करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कांदळवने 'राखीव वन' म्हणून अंतिम अधिसूचित करण्याबाबत सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच महसूल विभागाच्या ताब्यात असलेले राखीव वन तातडीने वन विभागास हस्तांतरीत करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. 
 
 
  
मुंबई महानगरातील कलम ४ अंतर्गत 'राखीव वन' म्हणून अधिसूचीत झालेल्या कांदळवन जमिनींवरील नागरिकांच्या हरकती आणि दाव्यांची चौकशी १५ जानेवारी, २०२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील कांदळवन संवर्धनासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून गुरुवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, प्रधान सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (पर्यावरण) मनिषा म्हैसकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) विरेंन्द्र तिवारी, विभागीय आयुक्त (कोकण विभाग) अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर) मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी (ठाणे) राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी (पालघर) अतिरिक्त जिल्हाधिकारी (रायगड), मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे, उपवनसंरक्षक (कांदळवन कक्ष, मुंबई) निनू सोमराज उपस्थित होते. 
 
 
या बैठकीत ठाकरे यांनी महसूल विभागाच्या ताब्यात असलेले 'राखीव वन' तातडीने वन विभागास हस्तांतरीत करण्याची सूचनाही दिल्या. याव्यतिरिक्त एम.एम.आर.डी.ए., म्हाडा, एम.आय.डी.सी., सिडको इत्यादी यंत्रणेच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र महसूल विभागास हस्तांतरीत न करता परस्पर वन विभागास हस्तांतरीत करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांनी आवश्यक सूचना जारी करण्यास सांगितले. विभागीय आयुक्त यांनी शासनास अंतिम अधिसूचनेसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करुन अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) यांना दिले. या व्यतिरिक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचीत करण्यास व वन विभागास हस्तांतरीत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त (कोकण) यांना दिले. तसेच अधिसूचीत व हस्तांतरीत कांदळवन क्षेत्राचे आकड्यांचे ताळमेळ महसूल व वन विभागाने करुन घेण्यासही सूचीत केले. वन विभागास हस्तांतरीत कांदळवनाचे संरक्षणासाठी उपाययोजना करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले. 

@@AUTHORINFO_V1@@