कल्याण : बनावट प्रवाशांना घेऊन फिरणाऱ्या रिक्षाची पोलखोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2020
Total Views |


Auto  fff _1  H 

 
 
 
कल्याण : रिक्षांच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग फासलेला असून ही रिक्षा प्रवाशांना घेऊन फिरतोय ही माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. रिक्षा चालविणारा तसेच रिक्षातून प्रवासी म्हणून फिरणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क चोरटे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. कल्याण पश्चिमेकडील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठया इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात दुकान फोडी झाली होती. त्या दुकानातून महागडी वायर चोरीस गेल्या होत्या.
 
 
 
स्थानक परिसराला लागून असलेल्या या मार्केटमध्ये रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण बानकर यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी दीपक सरोदे यांना दिला. काही दिवसात एका माहितीदाराने पोलिसांना माहिती दिली की रात्रीच्या वेळी एक रिक्षा फिरते. तिच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग फासला आहे. पोलिसांनी ही माहिती मिळताच त्या रिक्षाचालकांचा शोध घेतला. त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या रिक्षाचालकांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
रिक्षा चालकासह रिक्षात प्रवासी म्हणून बसणारे दुसरे तिसरे कोणी नसून चोर होते. रात्रीच्या वेळी चोरीचा काम करीत होते. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजीत बहिरे आणि एक अल्पवयीन तरूण आहे. अल्पवयीन चोरटयास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अन्य तीन आरोपींना न्यायलयात हजर केले असता त्यांना न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या चार जणांनी मिळून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले होते. त्यांच्याकडून तब्बल सव्वा दोन लाखांचा चोरीस गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@