सुपरस्प्रेड: सांताक्लॉजने १५७ जणांना दिला कोरोना भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2020
Total Views |

superspred_1  H


बेल्जियम :
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात सर्व देशांनी सॅन उत्सव साजरे करण्यावर, गर्दी करण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांताक्लॉजने १५७ लोकांना कोरोना बाधित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे प्रकरण बेल्जियमच्या मोल शहरातील एका केअर होममधील आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सांताक्लॉज आपल्या सहकाऱ्यांसह दोन आठवड्यांपूर्वी बेल्जियमच्या केअर होम येथे दाखल झाला. या केअर होममध्ये, कोरोनाची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर, तेथे राहणाऱ्या सर्व लोकांची आणि काळजी घेणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली. येथे १५७ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तेथील स्थानिक महापौर विम कीयर्स म्हणाले की, पुढील काही दिवस खूप कठीण जाणार आहेत. केअर होमसाठी हा वाईट काळ आहे. यापूर्वी महापौरांनी सांताक्लॉजच्या केअर होमला भेट देताना हे नियम पाळले जात असल्याचे विधान केले होते. तथापि, केअर होमची फोटो पाहिल्यानंतर महापौर म्हणाले की, येथे नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच, या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, केअर होमने निष्काळजीपणा केला आहे.


वयोवृद्धांचे मनोबल वाढवायचे होते

अहवालानुसार बेल्जियमच्या अँटवर्प येथील केअर होममधील कर्मचार्‍यांना तेथील वयोवृद्ध व्यक्तींचे मनोधैर्य वाढवायचे होते. म्हणून त्यांनी सांताक्लॉजच्या हस्ते वृद्धांना भेटवस्तू देण्याची योजना आखली.


सांताक्लॉज 'सुपरस्प्रेडर' झाला

केअर होममध्ये, अनेक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्यानंतर, तेथे राहणारे सर्व लोक आणि त्यांची काळजी घेणारे सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा तेथे १५७ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. तेव्हा सांताक्लॉजच स्वतःच एक सुपरप्रेडर म्हणून आल्याचे लक्षात आले. ख्रिसमसच्या एक दिवस आधी आणि ख्रिसमसच्या दिवशी पाच जणांनी आपले प्राण गमावले. आतापर्यंत केअर होममधील १८ जणांनी आपला जीव गमावला. काही लोकांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
@@AUTHORINFO_V1@@